डायरी - तिची ती अबोल मैत्री
डायरी - तिची ती अबोल मैत्री


अबोल होती, ती मुकी नाही.. पण तरीही कायम गप्प.. कायम विचार चालूच असे तिच्या डोक्यात, कशाचं भान नसे... रस्त्याने जाताना मागून बस आज हॉर्न वाजवत होती. ती तिची ओढणी हाताभोवती गुंडाळून चालत होती. समोर येणाराही बाजू देत जात होता, जणू काही ती इतक्या रागात होती... की कोणीच तिच्या वाटेला जाऊ इच्छित नसावं.. वाराही नाही मग त्या बसवाल्या ड्रायव्हरला कोणी तरी थांब हं मी सांगते तिला... म्हणत खाली उतरत होती वैजा..
पुढे जाऊन तिने तिला खेचूनच रस्त्याच्या कडेला करत म्हटले, काय गं किती हॉर्न दिले काकांनी लक्ष कुठे तुझे?
तिने एकदा वैजाकडे पाहिलं आणि 2 पावलं पुढे जाऊन थांबली. वैजा तिथेच थांबून तिला पाहत होती..
काय गं सानु काय झालं तुला.. पुन्हा रात्रभर जागलली दिसते.. हो ना.. वैजा सानुला लहानपणापासून ओळखत होती..
सानुला बोलवंसं जास्त वाटायचं नाही.. पण जे वाटेल घडेल ते तिच्या मनावर कोरून राहायचे... कधी तरी तिच्या पेन्टिंग्स आणि डायरीत उतारवायची... मग सगळेच प्रश्न निर्माण होतात.. विचारत ती फक्त स्माईल करुन बोलणं नकोच.. अशा तोऱ्यात निघून जाई..
पण वैजाला आज काळजी वाटत होती तिची..
नक्कीच डायरीत नोंद असेल तिच्या... वाचू का? तिने मनाशी निर्धार केला...
दोघी गर्ल रुमकडे गेल्या. थोडा वेळ होता लेक्चरला अजू...न सगळ्या मैत्रिणी येणार होत्या..
वैजाला ठाऊक होतं डायरी तिच्या बॅगमध्ये मागच्या कप्प्यातच असे.. पण कधी अशी वाचली नाही.. सानु कधी सांगणार नाही पण वाचली तर तिची घालमेल तरी कळेल या मताने विचलित होत.. सानुचं लक्ष नाही बघत तिने डायरी काढून घेतली व अपल्या बॅगमध्ये ठेवणार तोच सानु बोलली वाच हो नक्की कळू देत तरी ही सानु कशी होती ते.. खूप काळजी वाटली ना माझी आज तुला हो ना...!
वैजाच बळ गळून पडलं, डोळ्यात पाणी दाटलं होतं..
एका क्षणात तिला समजलं की सानुने काय लिहुन ठेवलं असेल..
पण तरीही.. सानु तू बोलत नाही न गं.. काय करू..
सोडून देत जा मला माझ्या प्रश्नाबरोबर ज्या दिवशी उत्तर मिळेल न त्या दिवशी लिहायचं काय पेन्टिंग्सही बंद.. वैजा..
वैजाने ऐकलं.. तिने डायरी सानुला परत केली..
सॉरी सानु आम्ही तुझ्या या डायरीपेक्षा जास्त जवळच्या मैत्रिणी नाही होऊ शकलो यासाठी? sorry again..
वैजा काय हे तू मला ओळखतेस खूप छान..
मग असं काय आहे या डायरीत.. तू मला देणार नाहीस का वाचायला.. ऐक मला आपलं मानते न मग नको देऊस डायरी... सांग ना काय झालं ते, विचार घोळत असतो तुझ्या डोक्यात.. मन अस्वथ होतं या तुझ्या बेफिकीर वागण्यानं.. सकाळी नशीब काकाने तुला पाहुन बसने तुला cover करत होते नाही तर आज!...
नाहितर काय एखादी गाडी मला घेऊन गेली असती ना तिच्या छक खाली पडले असते रक्ताच्या थारोळ्यात.. तुझी वाट बघत...
ये गप हं.. सानु काळजी वाटते तुझी... अन तू..
हम्म कर खरं तुझंच पण एके दिवशी मी वाचणारच आहे ही तुझी सख्खी friend डायरी बरं का...
दोघी लेक्चरला जातात.. वेगवेगळ्या classroom होत्या..
वैजाने न कळत सानुची डायरी हातात घेतली आपल्या...
हे पाहुन...
न राहवत एक एक पान उलगडत वाचू लागली...
वाचताना डोळे गच्च पाणावले होते... आता डायरी पण भिजेल की काय?
किती तो सोस असतो एखादीच्या नशिबाला.. कोण म्हणेल की ही अशी अबोल पण इतकं सलग बोलते पानांवर शब्द जणू काही डायरीशीच बोलते ही.. खरंच.. या प्रश्नाची उत्तरं तर विचारणंही चूकच.. आता जर तिला विचारलं तर दोन दिवस मॅडम बोलणार नाहीत..
लास्ट लाईन, संपलं सगळं आज...
वाचुन वैजा हदरलीच... means..
सानु मी वाचवलं नाही तर आडवलं तुला? काय आहे हे?
सगळ्या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी तिच्या आगोदरच्या डायरी तिला वाचणे must आहे ना.. म्हणत तिने रविवारी घरी जाण्यचा विचार केला..
सकाळीच वैजाला फ़ोन आला अक्षताचा, अगं वैजा.. खूप वाईट बातमी आहे गं सानुने आत्महत्या केली गं.. काहीतरी विष घेतलं तिने...
वैजा स्तब्ध झाली होती.. लास्ट लाईनचा अर्थ समजून घेण्यात घाई केली असती तर.. बरं झालं असतं.. पण आता??
ती मुकी नव्हती पण ती अशी एक भावनिक मुलगी होती की कोणाला दुःख नको म्हणून आपले शब्द मनात ठेवायची..
न राहवून तिने ते डायरीत लिहिलेत.. मग संपवलं कशाला..
वैजाला खरं वाटत नव्हतं.. असे काय होतं... 2 आठवड्याने तिने तिच्या सगळ्या डायरी वाचायला घेतल्या..
तिला समजलं की सानु मनातून खूप एकटी होती पण..
तो असता तर.. पण दुसऱ्याच डायरीत तिला.. त्याचं वर्णन भेटल.. सानु काय... ते गणपती पुळेचं वर्णन समुद्राचं वर्णन.. होतं..
सागर...
हम्म...
व्यक्तीपेक्षाही या जीवंत भावना लगेच कशा आकर्षित करतात तुला..?
वैजा, कोणाला विचारु आता...
डायरीचं पान हवेने हलकेच हलले.. वाच म्हणजे तुझ्या साऱ्या प्रश्नाची उत्तर आहेत यात...
हो तिने सारं काही त्या डायरीत लिहिलं होतं..
समज गैरसमज, तिचं विश्व, तिच्या कल्पना, तिची स्वप्नं अन् नातीही.....
एक मुकी अबोल मैत्रिण... अन् तिची ती डायरी...