sarika k Aiwale

Drama Tragedy

4  

sarika k Aiwale

Drama Tragedy

अबोली

अबोली

5 mins
239


अग्नीकडे एकटक पहात होती

ठाऊक होते तीला ती काय करते

अग्नी त्या स्वप्नांना,1 फेरी पूर्ण.

अग्नी त्या श्वासांना, 2फेरी पूर्ण.

अग्नी त्या इच्छांना, 3 फेरी पूर्ण

अग्नी त्या सगळ्या आठवणींना, 4 थी फेरी पूर्ण.

अन् थबकली स्वत:च...

पुढे अपेक्षित वेध नक्कीच होइल...

पुन्हा...

अग्नीची फेरी मारायला सज्ज.

5 वी फेरी पुन्हा परतून न येण्याची,

6 वी फेरी जिवंत असण्याची सगळी लक्षणं मारुन जगणार.

7 वी फेरी सुरवात आहे शेवटचं पानं.."""


बस खूप काही प्रोब्लेम नाही येणार हं. म्हणत तिने सात वचनं दिली होती. त्याला नाही, तर अग्नीला.. हसतच मनात बोलली खुश न.. जाळ आता काय ते मी तर कधीच मेलीये. आता नाही ना तुला काहीच म्हणायचं की अजून ही बाकी आहे काही? पुन्हा भानावर येत सेजल अश्रू नाहीतच उलट खूपच आनंदित होती सेजल आज. तिच्या कथा तिने जशीच्या तशी घडत आहे हे पाहून मनोमन मात्र निर्विकार होत थोडी स्थिरावली.

झालं लग्न?

😢एकदमच...!!

सर्वांनीच भरभरून आशीर्वाद दिले....

अपेक्षितच होते, कोणालाही उसंत नाही तिच्याशी बोलून!... निदान निरोपाचे दोन शब्द !!

स्वतःशीच हसत स्वतःलाच समजावे लागणार तू तर शहाणी न!

मगाशीच तिलांजली दिली होती. आठवून. एक उसासा टाकत मन घट्ट केले न घेतलेल्या निर्धार पक्का लक्षात ठेव सेजल!

स्वतःच स्वतःला सांगत ती..!


लग्न झाल्यावर सगळे तिला भेटायला येऊ लागले त्यात तिचा "फ्रेंडसचा ग्रुप". तसे सगळेच मनमिळाऊ. पण आज कोणास ठाऊक पुढे यायला विचार करताना पाहून तिने मैत्रिणीना खुणावले. सर्वांना एक फोटो घेऊ या ना. प्लीज! तसे सगळे चालले म्हणून फोटो काढून घेत होते. तिरक्या नजरेत काहीतरी शोधते नजर तसे त्याने तिला हटकलं सेजलला समजलं की मंथनला बहुदा काहीतरी बोलायचंय! ती विचारणार तोच पुढून शमिका बोलली अगं काल सकाळी आला तो दिल्ली टूर होती ना आणि तसे तुझी पत्रिका पहिल्यापासून काही बोलतच नाहिये. आजही आमच्याही अगोदर आलाय म्हणे!..

तसे सेजल हसत हसत... बोल रे काय आज नंतर नाही बोलायला भेटायलाही मिळणार नाही ना बोलून घ्या हं एकमेकांशी, तसेही...


ना बोलताच त्याला कळलं होतं. काहीतरी बिनसलंय मॅडम सांगणार नाहीत... खूप वेळ सगळे चिडीचूप होते एव्हाना क्षितिज बोलला काय रे सेजल उद्या ठेवायचंस की लग्न. म्हणजे मंथन अणि तुझ्या लग्नाचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करता आला असता...

मंथन- राहू दे रे आपल्याशी तिला आता काहीच बोलायचं नसणार बघ ना एखादी अॅडव्हान्स विशिंग करते पण..

सेजल उच्चारली काय मग कसं वाटलं "बर्थ डे गिफ्ट".

नसेल आवडलं तरी हेच तुझं गिफ्ट आहे.

सेजल नावाचं वादळ संपलं एकदाचं. अन् रुममध्ये निघून गेली...

तसे सगळेच धावत रूममध्ये आले. सगळ्यांना वाटलं ती रडते की काय? कसली रडते ती असे शाब्दिक खेळ अन् न पेलवणारे प्रसंग अनेक होते त्याच्यासाठी सेजल त्यांना एक कोडंच होती.. कधी ती जास्त बोलत नसे .. पण प्रत्येकाला छान ओळखत होती ती... मग आजच सेजल असे काही वागेल याचा अंदाज कोणालच नव्हता ती मात्र तिच्या पायात जोडवी रुतवत होती काहीतरी मनाशीच पुटपुटली अन् जणू काही त्याच्याशीच. कोणाच्याच लक्षात नाही आलं पण अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होती ती लपवत होती.


खुश असल्याचा फसवा प्रयत्न करत होती. पण मंथनला आता जणू काही तिने हे लग्न त्याला दाखवण्यासाठीच केले अस वाटू लागलं... त्याने जरा नजरेनेच सेजलला खुणावलं तिचा असं नको होतं तू करायला.. तसा तिचा बांध फुटला असता... सुमेधाने पुढे होत काय रे काय चाललंय तुम्हा दोघांचं. मंथन सगळे सासर आहे इथे.. तो सुमेधा लास्ट बोलायचंय गं बोलाव ना तिला बाहेर!


सुमेधा काहीतरी कारण करुन तिच्या जवळ जात तिला बाहेर बोलावू पाहणार तोच डबडबलेल्या नयनांनी तिने सांगितलेच त्याला. तसा त्याला बोध झालाच अणि पुन्हा एकदा हतबल झाल्याचं जाणवलं त्याला. सेजल असा काही निर्णय घेईल असे स्वप्नात ही नव्हते कोणाच्या तसे घरच्यापेक्षा मित्र मैत्रिणीतच जास्त रमायला आवडायचं सेजलला... जीवभावाच्या मैत्रिणी न मित्रही तसेच.. खूप अबोल असायची कमी बोलायची... तिला काय आवडतं काय नाही हेदेखील जास्त कोणाला माहीत नव्हते. असो..


सेजल अबोली अन् मंथन तिच्या उलट खूपच खेळकर.. पण कधीही विचारांचा कल्ला निघाला की हे दोघे मात्र एक बाजूला अन् पूर्ण पलटण दूसऱ्या बाजूला. आम्हा सगळ्यांना त्याच्याबाबत बऱ्याचदा शंका येत होती. शेवटी सेजलने या सगळ्या वावटळींना एकदमच निरोप दिला. तरीही तिचे ते सहजच पण खोचक बोल मंथनच्या मनातूनच जात नव्हते. असं कसं बोलली ती मुक्त आणि मी? नाही रे आपण सगळेच म्हणायचंय तिला काय आहे ना. लग्नावरनं परतताना सुमेधानी सगळंच सांगून टाकलं. काय आहे मंथन तिला मी, आम्ही चिडवायचो की तुझं आणि तिचं मैत्रीपेक्षाही पलीकडे नातं असावं असे... पण तसे काही नाही गं असे ती सारखं सांगायची पण आम्हीच विश्वास ठेवत नव्हतो.. तिला मला विश्वास द्यायचा होता की मी जे समजते ते चूक आहे. बघ ना रे तिने हे असं पाऊल उचललं. काय म्हणे ह्याशिवाय मला समजणारच नव्हते. हे मला तिने मगाशी लग्नसाठी तयार होताना बोलले रे.. मी खूप खजिल झाले खूप दुखावलं आहे ना तुम्हाला.. मलाच तुला सांगायची शिक्षा फर्मावलीये रे. तिच्या मनात तुझ्यासाठी तसे काही.. नव्हते...

ओहो... अगं तू मैत्रीण ना तिची, ती हळवी आहे एवढंही माहीत नाही तुला. सगळीच स्वप्न मारण्याचा चंगच बांधलाय तिने आता पीएच.डी.चं स्वप्नही तुझ्या ह्या वागण्यामुळे सोडलं असणार नक्कीच.. तरीच... मला त्रास... नको म्हणून नाही गं... तिने सगळ्यांच्याच तोंडचे शब्द खोटे पडावे म्हणून ही नाही... तर केवळ तुला सत्य पटवून देण्यासाठी पुन्हा एकदा काहीतरी वेगळं निर्णय घेतला... मला हे अगोदर कळायला हवे होते. मी पण. अगं शिकायला मिळेल पण कुठेही फिरणं मज्जा मस्ती डान्स गाणं ड्रॉइंग सगळंच तर तिने सोडलंच होत. आत्ता तुझ्या अशा वागण्यानं तिने आईचं घरही सोडलं. हे शहरही सोडलं. आता म्हणे आपण मोकळे... कोणालाच त्रास नको तिचा, आपण तिला खुशी नव्हतो देवू शकत ना, सुमेधा तर तिला जाम दडपण निर्माण करुन तिच्याकडे तू दुसरा मार्गच सोडला नाहीये ना..


अत्ता काय?.. आम्हा दोघांबद्दल तुम्हा सर्वांची भावनाच तर होती ती? खरंच इतकी डदडपणाखाली होती. तुला माहीतही नाही. काय ओळखतेस तिला पक्क्या मैत्रिणी होत्या म्हणे? मंथन खूपच चिडलेला होता आणि त्या आधी कधी इतकं अपसेट पाहिलं नाही... इकडे सेजलने या सगळ्या वावटळीपासून सुटण्याचा निःश्वास टाकला. भले तिला न पटणारे लग्न करावं लागलं होतं... सगळं कसं शांतपणे...

अबोली तू अबोलच रहा

फुलून येते पुन्हा बहरा तरी

अबोली तू अबोलच रहा गं

सांगते अबोली कथा जगली तिने... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama