भेट ( भाग -३ )
भेट ( भाग -३ )
आज माझा फक्त वक्तृत्वाचा इव्हेंट असल्यामुळे मी तसा निवांत होतो . सकाळी 9.30 ला स्पर्धा सुरु झाली , 12 ला संपूनही गेली . ती ही स्पर्धेला आली होती . स्पर्धा संपल्यावर हसत खेळत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या . बोलता बोलता कळलं की ती आज रात्रीच निघून जाणार आहे . एकदा वाटलं सांगावं तिला की please जाऊ नकोस पण परत विचार आला आपण कोणत्या अधिकाराने तिला हे सांगतोय ?
या सगळ्या विचारात तिचा नंबर घ्यायचा राहूनच गेला.
पुढचे 3- 4 तास फार बेचैनीत घालवले .
संध्याकाळी आमच्या विद्यापीठाची एकांकिका असल्यामुळे त्याच्या तयारीला बाकीच्यांबरोबर गेलो .
वाटतं होतं या पुढे ती कधीच दिसणार नाही , भेटणार नाही .
एकदा तर मधेच सगळ्यांची नजर चुकवून तिला भेटून यावं असाही विचार आला मनात पण महत्प्रयासाने पुढच्या संभाव्य परिणामांचा विचार करून तो टाळला.
पण एकांकिका झाल्यावर सेट परत नेत असताना अचानक तिची हाक ऐकू आली .
वळून बघितलं तर ती माझ्याकडेच येत होती .
आदित्य , " मी आज रात्री चालल्ये " ...
परत कधी भेटणार ?
"माहित नाही ."
नंबर मिळेल का तुझा ?
हो ... पण कसा देऊ ? माझ्याकडे कागद नाहीये .
माझा पण फोन रूमवर आहे.थांब ... असं म्हणून मी बाजूला असलेल्या एका माणसाकडून पेन घेतल
ं आणि माझा डावा हात पुढे केला . ( कारण उजव्या हातात खांद्यावर मोडा पकडलेला होता )
तिने नंबर लिहीला आणि बाय ... बोलू फोनवर ..!! म्हणून निघून गेली .
तीची आणि माझी ती शेवटची भेट ....वर्ष 2012 ...
मी लिहीलेला नंबर पुसू नये यासाठी जमेल तसं एका हाताने मोडा उचलून आणला. विद्यापीठातून गुरुद्वारात आमच्या रुम मधे जाई पर्यंत किमान हजार वेळा तरी तो नंबर मनातल्या मनात म्हणला होता.
रूममधे आल्यावर डायरीत तो नंबर लिहून ठेवला आणि फोनमधे सेव्ह ही करून ठेवला.
आता ती कायम संपर्कात रहाणार या विचाराने फार शांत झोप लागली मला त्या रात्री ...
दुसऱ्या दिवशी सकाळी तिला फोन केला तर तिच्या आईने तो उचलला होता . मी त्यांना नमस्कार वगैरे करून ती उठल्यावर फोन करायला सांगा असा निरोप देऊन फोन ठेवून दिला .....
त्यानंतर आजपर्यंत आम्ही फक्त फोन वर बोललोय ....
भेटण्याची अनिवार इच्छा आहे , ओढ आहे पण मुहूर्त काही साधता आला नाहीये आतापर्यंत .... ना तिला ना ही मला .....
मध्यंतरी ब-याच गोष्टी होऊन गेल्या ....
असो ....
पण तिची आठवण आणि ती ..... तिला पहिल्यांदा बघितल्यापासून ते शेवटच्या भेटीपर्यंत अगदी आहे तशी मनात कोरली गेली आहे......
बघू ..... या पुढे काय होतं ते ....
क्रमशः