The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Aditya Kulkarni

Romance

2.6  

Aditya Kulkarni

Romance

भेट (भाग -२ )

भेट (भाग -२ )

2 mins
16.4K


वादविवाद स्पर्धा संपली होती पण रिझल्ट 2 दिवसांनी लागायचा होता आणि दुसऱ्या दिवशी वक्तृत्व असल्यामुळे त्याचीही तयारी बाकी होती . 

संध्याकाळी सहज भटकायला म्हणून विद्यापीठाच्या आवारात मित्राबरोबर आलो होतो .

डिबेट चा संभाव्य निकाल काय असेल यावर आमची चर्चा चालू होती . तेवढ्यात ती समोरून येताना दिसली , तिच्याबरोबर तिची डिबेट पार्टनर होती . सकाळची ओळख ताजी असल्यामुळे एकमेकांना हात दाखवून हाय हॅलो करून झालं .

मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या . एकमेकांशी विद्यापीठं विचारून झाली .

' कधीतरी ये आमच्या गावाला , संत्री फार सुरेख मिळतात तिकडे ' ती .

" आता चिपळूण ते नागपूर एकूण प्रवास मोजला तर चिपळूणात संत्री स्वस्त मिळतात या टिपीकल " कोब्रा - देब्रा " विचाराने मी तो विचार तसाच बाजूला ठेवला .

मग आम्ही चौघे जणं एकत्रच फिरत होतो .

मधे आम्हाला सकाळच्या वाद-विवाद स्पर्धेचे परिक्षक भेटले .

त्यांनी डिरेक्ट रिझल्ट न सांगताही " तूम्ही आनंदाने घरी जाल , तुम्हाला पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करायला हवा " असं सांगत indirectly रिझल्ट सांगून टाकलेला होता .

पण नंतर ते परिक्षक फार बोर करायला लागले म्हणून आम्ही एकमेकांना खुणावत तिथून पद्धतशीरपणे सटकलो .

पुढचा बराच वेळ आम्ही एकमेकांशी बोलण्यात घालवला होता .

खरं सांगू , आजूबाजूला एवढे सगळेजण होते पण माझं पुर्ण लक्ष बाकीच्या फ्रेम्स ब्लर करून फक्त तिच्यावरच एकवटलं होतं .

तेवढ्यात तिच्या मॅडमनी त्यांना हाक मारली आणि ती तशीच निघून गेली .

रात्री दुसऱ्या दिवशीच्या वक्तृत्व स्पर्धेच्या तयारीपेक्षा " ***** लक्ष कुठं होतं तुझं , तिच्याशी बोलताना ? सर बघत होते आपल्याकडे ******* " या मित्राच्या शिव्या खाण्यातच जास्त वेळ गेला .

स्पर्धेची तयारी किती झाली माहित नाही पण झोपताना डोळे बंद केल्यावरही तिचाच चेहरा समोर येत होता.

आणि अखेर विरहाचा दिवस उजाडला .

क्रमशः


Rate this content
Log in