STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

3  

Author Sangieta Devkar

Abstract Drama Inspirational

भागे रे मन

भागे रे मन

4 mins
175

कीती जीव लावला होता मी अर्चू ला.माझं प्रेम तिला समजलच नाही का? का मुद्दाम माझ्या भावनांशी ती खेळत होती.? का मी कुठे कमी पडलो तिच्या साठी..शेवटी प्रेमाचा शेवट हा दुःखदच असतो का.? केदार बेड वरून पडुन आपल्याच विचारात हरवला होता.

अर्चना त्याची गर्ल फ्रेंड त्याला अचानक सोडून निघून गेली.चार वर्ष एकत्र होते ते.तिच्या पासून दूर होऊन केदार खूपच दुखी झाला होता.तो खूप इमोशनल विचार करणारा असा आणि अर्चु मात्र प्रॅक्टिकल वागणारी.."प्रेम वैगेरे काही नसते रे असते फक्त अट्याच मेंट., अट्रॅकशन.नको इतके मनाला लावून घेवू".अर्चना म्हणाली होती.आता सगळ काही केदार च्या नजरें समोरून जात होत.

केदार विचारात गुंग होता तर बाहेर गल्लीत लहान मुलांचा दंगा,गोंधळ चालु होता." काय ना ही मुल पण मला एक तर त्रास होतोय आणि ही मात्र दंगा घालत बसलेत ." केदार पुटपुटत खिडकी जवळ आला.समोर कॉलनी च्या आतल्या रस्त्या वर काही मुल आणि त्यांच्या सोबत एक सुंदर तरुणी बॉल खेळत होते.ती त्या मुलां सोबत मस्ती करण्यात दंग होती.वाऱ्याने उडणारे तिचे सिल्की केस,सुंदर चेहरा, खळखळणारे हासू,केदार काही क्षण तिला बघत राहिला..मग त्याला आठवले तसा तो त्या मुलांना ओरडला..जणू त्याच्या प्रेमभंगाचे दुःख साऱ्या जगाने त्याच्या सोबत सेलिब्रेट करावे असे.


अहो,लहान मूल आहेत ती,ती दंगा नाही करणार तर काय तुम्ही करणार? हसत ती तरुणी बोलली.

मला तुमच्या आवाजाचा त्रास होतोय समजल.जा इथून.

केदार पुन्हा बोलला.

तुम्हाला त्रास होतोय तर दार खिड्कया बंद करून घ्या.चल रे रिंकू बॉल टाक..ती तरुणी बोलली.

केदार ने रागात खिडकी बंद केली.त्याच्या दुःखाची कोणाला पडलीच नव्हती.बिचारा एकटा देवदास बनून राहिला होता.

मावशी आहात का घरी..कोणी तरी केदार च्या आई ला आवाज दिला.तसा नुकताच अंघोळ करून आलेला केदार केस पुसत बाहेर आला त्याच्या बरोबर त्याच्या बॉडी जेल चा सुवास ही आला..कोण आहे? त्याने विचारत समोर पाहिले..दरात कालची बॉल खेळणारी मुलगी उभी होती..तुम्ही इथे?

हो,ते आम्ही नवीनच आलो आहोत कॉलनीत राहायला.आई आणि मी दोघीच.आज आमच्या कडे पूजा आहे सो आमंत्रण द्यायला आले होते.

अच्छा आई भाजी आणायला गेलीय मी देतो निरोप तुमचा..केदार म्हणाला.

तुम्ही पण या पूजेला..ती मुलगी बोलली.

आय डोन्ट लाईक..

ओके..येते मी.ती गेली.

किती खडूस आहे हा आणि आकडू पण..जरा पण हसत नाही.नुसते चेहऱ्या वर बारा वाजलेले..मुग्धा केदार चा विचार करत घरात आली.मुग्धा आई सोबत इथे राहायला आली होती.कॉलनीत सगळ्यांना पूजेचे निमंत्रण दिले.

केदार च्या घरा समोरच मुग्धा राहायला होती.रोज ऑफिस ला जाता येता मुग्धा त्याला दिसायची.नेहमी हसतमुख आणि संध्याकाळी कॉलनीतल्या मुलांशी गप्पा मारत येताना दिसत असे.सगळ्यांची चौकशी करत बोलत असताना दिसे.अधून मधून केदार च्या घरी ही येत असे. त्याच्या आई सोबत वेळ घालवत असे.कधी लोणचे,कधी काही स्पेशल भाजी घेऊन येत असे.हळूहळू मुग्धा केदार सोबत बोलू लागली.ती घरात आली की एक सकारात्मक वातावरण केदार अनुभवत असे. सतत बडबड करणारी हसणारी मुग्धा.केदार मात्र आपल्याच दुःखात बुडालेला.

गणपती जवळ आले होते कॉलनीत गणपती उत्सव मोठा साजरा होत असे .एखादे नाटक पण बसवले जात असे.मुग्धा सगळ्या कार्यक्रमात पुढे पुढे होती.

तिने केदार ला विचारले ,केदार तू नाटकात काम करशील का? मी करणार आहे .

मुग्धा मला त्या लव स्टोरीत आणि नाटकात अजिबात इंटरेस्ट नाही.तू कर. चिडून च बोलला तो

अरे इतका का चिडतोस,मी सहज विचारले .नाही इंटरेस्ट तर राहू दे.

आय एम सॉरी ..मला तसे नव्हते म्हनायचे.

केदार कशाने इतका डिस्टर्ब आहेस.बोल काही खुपते आहे का? मला मैत्रीण मानतोस ना मग बोल.मुग्धा म्हणाली.

केदार मुळातच हळवा , मुग्धा ने फुंकर घातली तसा सेंटी झाला.अर्चना आणि त्याच्या रिलेशन बद्दल त्याने सांगितले.ती कशी त्याला सोडून गेली वैगेरे.

हम्म..केदार आयुष्यात थोडस मना विरुद्ध झालं आणि तू एकदम कोलमडलास..याला दुःख नाही म्हणता येणार.

म्हंजे तुला काहीच वाटत नाही .. माझं प्रेम होत अगदी मना पासून अर्चना वर..ती सोडून गेली हे दुःख नाही अस तुला म्हणायचे आहे?

केदार इतकं पण मोठ दुःख नाही रे की ज्याला तू आयुष्य भर कुरवाळत बसणार आहेस.

मुग्धा तुला बोलायला सोप आहे,तू पाहिलेच नसशील दुःख कधी आयुष्यात म्हणून तर नेहमी हसत,आनंदात असतेस..तुला नाही समजणार माझं दुःख.

केदार ,खूप मोठा गैर समज आहे तुझा..ऐक.. माझं गेल्या दोन वर्षा पूर्वी लग्न झालं होत.

व्हॉट तुझं लग्न झालंय मुग्धा?

हो केदार..लग्न झालं.प्रसाद नाव त्याच.प्रेम आपलेपणा काय असते हे त्याच्या गावी ही नव्हते रे. सतत मला टॉर्चर करत होता .कधी कधी मारहाण पण.खूप विचित्र होता तो..घरात मला कैद करून ठेवले होते त्याने.शारीरिक ,मानसिक आणि लैंगिक अत्याचार खूप केला त्याने माझ्यावर शेवटी सहन नाही झाले.आई कडे माघारी आले आणि त्याला घटस्फोट दिला.एक वर्ष डिप्रेशन मध्ये होते.मग आई कडे बघून ठरवले बास आता रडत, दुख कवटाळत बसायचे नाही .जे झाले ते विसरून नव्याने आयुष्य जगायचे.प्रत्येक क्षण आनंदात जगायचा.तेव्हा पासून मी अशी हसत खेळत जगत राहते.आयुष्यात दुख आहे म्हणून जगणं नाही सोडायचे केदार..हे अनमोल जीवन पुन्हा मिळत नाही.याच्यावर भरभरून प्रेम करायचे असते .आपण ठरवायचे असते की आपल्याला कसे जगायचे आहे..सुखात की दुःखात.

मुग्धा इतकं सोसले आहेस तू,तुझ्या कडे बघून समजत ही नाही..केदार म्हणाला.

हेच तर गमक आहे माझ्या आनंदी राहण्याच.!!

मुग्धा आज पासून मी ही तुझ्या सारखं वागण्याचा प्रयत्न करेन.नक्की..हसत केदार म्हणाला.

मग चल नाटकाची प्रक्टीस सुरू करू.त्याचा हात धरत मुग्धा चालू लागली ..

केदार अनामिष नजरेने हसऱ्या मुग्धा कडे बघत राहिला.


समाप्त


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract