STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Crime Inspirational

4  

Author Sangieta Devkar

Crime Inspirational

बदला

बदला

8 mins
341

 सिमा चल लवकर ग दुपार होत चालली बघ. हो ग आलेच गौरी म्हणत सिमा तिच्या मैत्रीणी ना बाय म्हणत आली. कीती वेळ लावतेस आपल्याला घरी जायला लेट होतो माहित आहे ना? हो ग चल आता नको बोलू म्हणत सिमा ने आपली सायकल घेतली. गौरी आणि सीमा सायकल वरुन घरी निघाल्या. त्यांच्या गावी दहावी पर्यंतच शाळा होती. पुढे कॉलेज साठी त्यांना तालुक्याला यावे लागत असे.दोघी यंदा बारावी मध्ये होत्या. गौरी मुळातच हुशार त्यामुळे पुढे शिकणयाचा हट्ट तिने घरी केला. आई तयार नव्हती तिची कारण तालुक्याला मुलगी जाणार रोज ती घरी येई पर्यंत आई चा जीव काळजीत असायचा. गौरी दीसायलाही छान नाजुक होती. लांब सड़क केस सावळा रंग पण आर्कषक बांधा होता तिचा. म्हणून आई ला जास्त चिंता वाटायची. पन गौरी चे बाबा म्हणाले की तिला शिकायचे तर शिकु दे. सायकल घेऊन देवू आणि जाईल ती कॉलेज ला. मग आई गप्प बसली. गौरी ला एक लहान भाऊ होता तो शाळेत जात होता.

चल गौरी मी जाते उद्या भेटु इथेच म्हणत सिमा तिच्या घरा च्या रस्त्या कड़े वळली. हा एक कॉर्नर होता जिथुन डाव्या हाता च्या रस्त्या कड़े सिमा चे घर होते आणि समोरच्या रस्त्या वरुन अजुन एखाद किलोमीटर वर गौरी चे घर होते. सीमा चा निरोप घेऊन गौरी निघाली. दुपार चा एक वाजत आला होता. रस्ता सुनसान होता एखादा कोणी सायकल किंवा ट्रैक्टर वाला जा ये त्या रस्त्याने करत होता. रस्त्या च्या दोन्ही बाजूला शेती होती. गौरी निघाली होती अचानक तिच्या समोर अंकुश येऊन थांबला. मग ती ही थांबली. त्याने त्याची बाईक बंद केली हाय जानेमन ,झाले का कॉलेज ? एकदम आयटम दिसते ग तू. अंकुश माझी वाट सोड मला जावू दे. माझ्या प्रश्नाच उत्तर दे लगेच जातो. आपल्याला लैई लैई म्हणजे लैई आवडते ग तू राणी अस बोलून अंकुश ने आपले बोट गौरी च्या चेहऱ्यावरुन फिरवले. तिने त्याला झिड़कारले. हे बघ अंकुश मी तुझ्या घरी येऊन तुझी तक्रार करेन. मला रोज तू असा त्रास देतोस हे सांगेन. मी त्रास देणार नाही तू मला हो म्हन. आणि माझी तक्रार करणार कोणा कड़े माझ्या बापा कड़े..तो गावचा सरपंच त्याला रोज रात्रि नवीन बाई लागते त्याला माझ नाव सांगणार... जा जा सांग म्हणत अंकुश मोठ्याने हासु लागला. आता सोडतो तुला राणी पन एक ना एक दिवस तुझा होकार मिळवल्या शिवाय राहणार नाही. असे बोलून अंकुश बाईके स्टार्ट करत निघुन गेला.

गौरी ही निघाली हा रोजच असा त्रास देतो काय करावे ? पोलिसांना कम्प्लेंट केली तरी पोलिस पुरावा दाखवा म्हणणार परत तो मलाच बदनाम करेल. घरी सांगावे तर कॉलेज बंद होईल काय करू मी असा विचार करत करत ती घरी आली. गौरी घाबरून गप्प बसनारी मुलगी नव्हती पण अंकुश एक वाया गेलेला उड़ान टप्पू मुलगा होता जो गावभर पोराना सोबत घेऊन मजा करत फिरायचा. त्या विरुद्ध बोलायची गावात कोणा कड़े हिम्मत नव्हती. गौरी ने हात पाय धुतले आणि जेवायला बसली. जेवनात ही तिचे लक्ष नव्हते. गौरी काय झाले कसला विचार करतेस? आई ने विचारले. काही नाही ग परीक्षा जवळ आल्या म्हणून जरा टेंशन येते. बर बाकी काही नाही ना आई बोलली. नाही नाही आई बाकी काही नाही. गौरी जेवन उरकुन तिच्या खोलीत गेली. आई कामात आहे बघून तिने सिमा ला फोन लावला आणि अंकुश बद्दल बोलली. सिमा बोलली तू घरी सांगून टाक. नको ग सिमा मग नक्की माझ कॉलेज बंद आणि शिक्षण ही बंद होईल. बघू काय करायचे आपण बोलू उद्या म्हणत सिमा ने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी गौरी कॉलेज ला निघाली. सकाळी शक्यतो अंकुश कधी तिच्या वाटेत येत नसायचा मात्र दुपारी घरी येताना तिला अडवायचा. आज ही सीमा तिच्या रस्त्याने घरी गेली आणि गौरी ही निघाली अंकुश भेटला तर काय करायचे या विचारात ती होती. पण आज अंकुश आलाच नाही गौरी ला जरा हायसे वाटले. असेच चार दिवस गेले अंकुश गौरीला दिसलाच नाही. गौरी मनातून खूप खुश होती. आज सीमा ला बाय करून ती आपल्या वाटेने घरी चालली. थोड्याच अंतरावर अंकुश उभा असल्याचे तिला दिसले. ती जवळ येताच त्याने तिला थांबवले म्हणाला, इतके दिवस झाले मी तुझ्या होकाराची वाट बघत आहे तुला सरळ सांगितलेले समजत नाही का ? हे बघ अंकुश हे असले प्रेम वैगेरे मला आताच नाही पडायचे यात मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे. तेव्हा माझा नाद सोडून दे. एकदा एखाद्या गोष्टीचा मी नाद केला की तो सोडत नसतो समजले असे बोलून अंकुश ने गौरी चा हात धरला आणि तिला ओढत शेता कडे घेऊन निघाला. अंकुश सोड मला नाहींतर मी ओरडेन गौरी म्हणाली. ओरड किती ओरडायचे तेवढ ओरड इथे कोणीच नाही तुझा आवाज ऐकायला . गौरी त्याला हिसका देत होती तसे त्याने तिला जोरात काना खाली दिली. तिला ओढत तो शेतात घेऊन गेला. त्याच्या बलदंड ताकदी समोर नाजूक गौरी चा प्रतिकार फोल ठरत होता. सोड अंकुश मला मी हाथ जोडते म्हणत गौरी गयावया करू लागली. पण आता अंकुश च्या अंगात राक्षस शिरला होता ही मला नाही म्हणते मग हिचा माज उतरवलाच पाहिजे असं त्याला वाटत होते. त्याने तिला खाली पडले तिच्याच ओढणी ने तिचे दोन्ही हात बांधले. अधाशा सारखा तो तिच्या अंगावर तुटून पडला. गौरी त्याला प्रतिकार करत होती पण हात बांधल्या मुळे ती असह्य होती. आपली विकृत वासना अंकुश ने पूर्ण केली. मग त्याने तिचे हात सोडले बघितलेस मला नकार देण्याचा परिणाम काय झाला ? हेच जर तू हा बोलली असतीस तर मी असा वागलोच नसतो अंकुश तिला म्हणाला. आता तू फक्त माझी आहेस गौरी समजले का? आणि तिला तसच सोडून तो निघून गेला. गौरी आपले डोळे पुसत उठून उभी राहिली. कपडे ठीकठाक केले . रस्त्यावर एक ही गाडी किंवा माणूस कोणीच नवहते. तिने सायकल घेतली आणि घर गाठले. घरी आली आणि आपल्या खोलीत बसून राहिली. आई तिला जेवायला बोलवायला गेली तेव्हा आई ला बघून तिचा मनाचा बांध फुटला आई म्हणत ती गळ्यात पडून रडू लागली. गौरी अग काय झाले का रडतेस अशी ? गौरी ने तिच्या सोबत घडलेला सगळा प्रकार आई ला सांगितला. अरे देवा आता काय करायचे म्हणून मी कॉलेज ला जायला नको म्हणत होते पण माझं ऐकत कोण ? आता काय करणार आपण सांग तो अंकुश सरपंचाचा पोरगा कोण आपल्याला दाद देणार आणि वर बदनामी होणार ती वेगळीच. गौरी झालं ये झालं आता तू बाहेर पडायचे नाहीस ते कॉलेज बिलेज राहू दे सगळं. आई पण शिक्षण अर्धवट राहील ग माझं. गौरी झाला इतका तमाशा बास झाला. आणि हे बघ यातला एक ही शब्द तुझ्या बाबाना कळता कामा नये. आपल्या गरिबांनाकडे फक्त इज्जत काय ते तेवढीच संपत्ती असते आता ती पण उरली नाही तेव्हा चुपचाप घरी बस. आई ने असे बोलल्यावर गौरी तरी काय बोलणार बिचारी गप बसली. आठवडा झाला गौरी कॉलेज ला गेली नवहती. सीमा ला तिने तब्येत ठीक नाही असे सांगितले होते. पण गौरी च्या मनातून तो प्रसंग जात नवहता. आपण का अन्याय सहन करायचा . गरीब असलो तरी आपल्याला इज्जत ,स्वाभिमान काहीच नसते का? कोणी ही यावे आणि आपल्याला वापरून फेकून द्यावे नाही मी असे होऊ देणार नाही. याचा बदला मी घेणारच असे मनाशी तिने ठरवले. दुसऱ्या दिवशी दुपारी गौरी आई ला म्हणाली . सीमा कडून नोटस घेऊन येते ती वाटेत भेटनार आहे मी घरी बसून अभ्यास करेन. आई ला हे कारण पटले जा आणि लवकर ये म्हणाली.गौरी त्याच नेहमीच्या रस्त्यावर अंकुश ची वाट पहात राहिली.

आज एक निश्चय करून ती आली होती. थोड्याच वेळात अंकुश तिथे आला. तसा तो रोजच या रस्त्याने जात असे कारण गौरी इथूनच जायची कॉलेज ला म्हणून तो तिच्या मागे असायचाच. गौरी ला थांबलेले बघून त्याला आश्चर्य वाटले तिच्या जवळ तो आला. काय ग कॉलेज ला जायचे बंद केलेस का? दिसली नाहीस आठ दिवस. नाही रे कॉलेजला जाणार आहे.. पण थोडा तुझा विचार करत होते इतके दिवस गौरी हसत म्हणाली. अंकुश ला हे ऐकून मनातच आनंदाच्या उकळया फुटल्या. माझा विचार कसला? हेच तुझे प्रेम आहे माझ्या वर मग मला तुझ्या सारखा दुसरा चांगला मुलगा मिळणार नाही. तुज्या सारखा आपल्या गावात कोणीच नाही. अंकुश भलताच खुश झाला. गौरी खर बोलतेस का ग? मला तर विश्वासच बसत नाही. हेच जर तू त्या दिवशी बोलली असतीस तर मी तुझ्या वर जबरदस्ती केलीच नसती. असू दे रे झालं ते झालं म्हणत गौरी ने आपले हात त्याच्या समोर पसरले म्हणाली एक मिठी मार मला मग तुला विश्वास बसेल. अंकुश खूप च आनंदी झाला आणि गौरी ला मिठी मारायला गेला गौरी ने ही त्याला जवळ घेतले आणि हळूच ड्रेस मध्ये लपवून ठेवलेली मिरची पावडर हातात घेतली. अंकुश भान हरपून तिला मिठीत घट्ट पकडून उभा होता. अंकुश सोड आता आपण रोजच भेटू म्हणत गौरी त्याच्या पासून बाजूला झाली आणि अंकुश ला काही समजायच्या आत त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. गौरी काय हे म्हणत अंकुश विव्हळत राहिला. पाणी दे मला लवकर काय केलेस हे मी सोडणार नाही तुला. अंकुश डोळे चोळत बोलत होता. मी पण त्या दिवशी तुझ्या कडे हात जोडले होते अंकुश मला सोड म्हणाले होते तू सोडलेस का मला. मग भोग आपल्या कर्माची फळ अस म्हणत आपल्या सोबत आणलेल्या कोयत्याने गौरी ने अंकुश च्या पाया वर सपासप वार केले. तो ओरडत खाली पडला. बाजूला असलेला एक मोठा दगड गौरी ने उचलला आणि त्याच्या पायावर जोरात आपटला. कट असा आवाज होत त्याच्या पाय गुढ्या पासून तुटला. लक्षात ठेव अंकुश एखादी मुलगी नाही म्हणते तर ते "नाही"च असते. ती नकार देते म्हणून तिच्या वर बलात्कार करणारी तुमच्या सारखी बांडगूळ अशीच ठेचायला हवीत. जा काय करायचे ते कर मी कोणाला भीत नाही.आणि परत कोणत्या मुलीला त्रास दिलास तर लक्षात ठेव ही गौरी अजून जिवंत आहे. अंकुश विव्हळत पडला होता. गौरी ने तो अंकुश ला मारायला घेतलेला दगड उचलला आणि बाजूला असलेल्या तळयात फेकून दिला.

सायकल घेऊन ती निघाली घरी आली तिने तो कोयता स्वच्छ धुतला. गौरी काय हे काय करून आलीस तू हा कोयता का धूतेस आई ने विचारले. आई त्या अंकुश ला धडा शिकवून आले. म्हणजे त्याचा खून बिन केलास का? नाही आई नुसते पाय तोडले त्याचे जेणेकरून परत तो कोणत्याच मुली कडे वाकड्या नजरेने बघणार नाही. अग पण पोरी तो पोलिसात जाईल. पैसेवाला आहे तो. आई आता मला कोणाची भीती नाही. एक मुलगी जर आपले शील लुबाडणाऱ्या नराधमाला शिक्षा देत असेल तर हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे. स्वहताचे रक्षण करायला एखाद्याचा खून जरी केला तरी तो गुन्हा नसतो. वा मुली मला तुझा खरच अभिमान वाटतो आहे. तू केलेस ते योग्यच आहे. अस म्हणत गौरी चे बाबा घरात आले त्यांनी त्यांचे बोलणे ऐकले होते. बाबा त्या अंकुश ने माझी.... बास गौरी नको बोलू पुढे. तो अंकुश कसा आहे मला माहित आहे. पण तू जे धाडस केलेस ते इतर मुलींनी ही दाखवले तर नक्कीच ही वासनांध राक्षस वृत्ती समाजातून लवकर नष्ट होईल. काही काळजी करू नकोस मी तुज्या पाठीशी आहे असं म्हणत बाबांनी गौरी ला जवळ घेतले आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime