बायको
बायको
बायको हा पुरुषांसाठी हास्यास्पद शब्द आहे, कोठेही दोन किंवा त्यापेक्षा पुरुष मंडळी जमली तेथे स्त्री चा विषय निघणार नाही असे फार कमी होते.त्यातही हा विषय निघाला म्हणजे हास्य विनोद करणारे नाहीत,हे होन शक्य नाही. अगदी हास्य कवी संमेलनाततही बऱ्याचदा याच विषयावर हास्य कविता ऐकायला मिळतात. हेही कमी झाले की काय तर प्रतीलीपिवर ही असच विषय की ज्याच्या मध्ये फक्त स्त्री आणि तीही चारीत्रहीनच आहे. हा विषय ही कदाचित वेगळ्या मार्गाने मांडता येत नसेल.पण असं स्त्री चा विषय नेहमी कानावर आला म्हणजे खरचं एवढेच महत्व आहे का एका परक्या घरातून सर्वस्व सोडून आलेल्या बायकांना एका नवरा म्हणून स्वीकारलेल्या पुरुषांच्या आयुष्यात. मला जे सुचलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला,काही चुकल्यास क्षमस्व. बायको साठी थोड......
"बायको ती असते जी आई वडिलांना सोडून येणारी,
बायको ती असते परक्याच्या घराला आपल घर मानणारी
बायको ती असते परक्या घरात आपल अस्तित्व निर्माण करणारी,
बायको ती असते नवरा म्हणून त्याने केलेल्या चुका पदरात घेणारी,
बायको ती असते जी प्रत्येक नवीन नातं जपणारी,
बायको ती असते नवऱ्यावर नितांत प्रेम करणारी,
बायको ती असते नवऱ्याच्या आरोग्याची काळजी घेणारी,
बायको ती असते जी नवऱ्यासाठी चविष्ट जेवण बनवणारी,
सासू - सासरे, नणंद, दिर या सगळ्यांसोबत मुलांची काळजी घेऊन घर सांभाळणारी.
कमी पैशातही घर खर्च चालवणारी
तरीही हास्याचा विषय ठरणारी, अशीच असते ती परक्याची लेक जी येते एका पुरुषाच्या जीवनात "बायको" म्हणून.
जी असते पुरुषाच्या आयुष्यातील मनशांती, आरोग्य, मांगल्य, सौख्य आणि यशाची सिक्रेट बायको.
..........🙂
