Lata Rathi

Drama

4.7  

Lata Rathi

Drama

बालविवाह

बालविवाह

3 mins
708


रेडिओ वर गाणं सुरू होतं....


मेरी छोटीसी उमरिया...

मत बांधो मेरे सर पर विवाह

की गठरिया......


आणि तेवढ्यात आमची कामवाली बाई रमा आली. आल्याआल्याच, "ताई आता मी आठ दिवस येणार नव्ह कामाला...”


मी- “का गं! काय झालं... एकदम आठ दिवसाची सुट्टी... (मला तर चक्करच यायला लागले.)

मागच्याच महिन्यात तू चार दिवसाच्या सुट्ट्या घेतल्यास, आता परत.... नाही.... अजिबात सुट्टी नाही मिळणार आता, अगं उद्या पाहुणे येणार आहेत... आणि तू म्हणते...”


रमा- "अवं ताई, ऐकून त घ्या माय म्हणणं... माया 'मीना'चं लगीन कराचं हाय यंदा.... त पाहुणे इउन रायले पवाले, म्हणूष्यान बाई... सुट्टी पायजे व्हती, पक्कच समजा....  तशी मी समाजसेविका आणि वरून ही अश्या गोष्टी करते....”


मी- “अग पण मीना तर खूप लहान आहे अजून, फक्त चौदा वर्षाची तर आहे ती. आणि लग्न करते म्हणतेस तीच.”


रमा- “अवं ताई, झाली की ती आता मोठी, सहा महिने झाले...”


रमा अन रघु यांना दोन मुली अन एक मुलगा. मोठी मीना चौदा वर्षाची, सुमी बारा वर्षांची, तर छोटू दहा वर्षाचा.  रमा धुणी-भांडी करायची, तर रघु रिक्षा चालवायचा. व्यसन वगैरे काही नाही, खाऊन-पिऊन सुखी कुटुंब होतं. 


मुली पण दिसायला देखण्या, अभ्यासात, घरकामात हुशार... 

नात्यातल्याच कुणीतरी सांगितलं, एक मुलगा आहे, चांगला सरकारी नोकरीवर आहे... कोर्टात चपराशी आहे... देता का पोरगी??

रमा, रघुने विचार केला... घरी चालून आलेलं स्थळ, आणि वरून सरकारी नोकरी... छानच की... 'उरकुन' टाकावे.


पण तो वयाने मोठा आहे म्हणजे तिच्यापेक्षा पंधरा वर्षाने मोठा...

सरकारी नोकर म्हणजे एवढी वर्षे लागतातच हो.... असं सांगून मीनाच्या आईवडीलांना तयार केलं लग्नासाठी. 


मी म्हटलं, अगं, पण "मीना" तिची इच्छा, तिची मतं... तिला विचारलं का तुम्ही?


रमा- “अवं बाई, तिले काय ईचाराच! आमाले समजते ना... रोज नव्या नव्या बातम्या ऐकतो, जीव लै घाबरतो बगा! एकदा का लगीन करून देल्ल, की जबाबदारी सुटलिया की आपली....”


मला कळुन चुकलं, हिला समजवण्यात काही अर्थ नाही... बोलायचं तर सरळ मीनाशीच...


ठरल्याप्रमाणे मीनाला पाहायला आले, पसंतीही झाली. 

मी तिला घरी बोलावलं, तिला विचारलं, "मीना, खरं खरं सांग! तुला हे लग्न करायचंय?" 


मीना-रडत रडत...

“नाही हो काकू... मला लग्न नाही करायचं, मला खूप शिकायचंय,

 नोकरी करून आपल्या पायावर उभं रहायचं आहे. दोघा बहीण भावास उच्च शिक्षण द्यायचं आहे. आई-बाबा आमच्यासाठी खुप कष्ट करतात, त्यांना उतारवयात खूप आराम द्यायचा आहे, त्यांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. खूप खूप स्वप्न आहेत हो माझी.... पण...

आई-बाबा ऐकतच नाही.”


खूप आश्चर्य वाटलं मला तिच्या बोलण्याचं.... इतक्या लहान वयात किती हा समजूतदारपणा, किती आत्मविश्वास...


मीना- “काकु तुम्ही समजवाना, आई- बाबांना... मी वाचलंय पुस्तकात, लहान वयात लग्न नाही करायचं, त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. 

पण आई ऐकतच नाही.”


मला कळून चुकलं, मीनाला लग्न करायचं नाही.

पण पोरगी उजवायची घाई होती तिच्या आईला.


दोन-चार दिवसांनी मी तिच्या घरी गेले. मीना, तिचे आई-बाबा आणि काही पाहुणे मंडळी घरी होती... कामाची लगबग सुरू होती. 


मला असं अचानकपणे घरी आलेलं पाहुन रमा थोडी गोंधळली..... “या या ताई.... बस ना...” समोरच्या खुर्चीवर मी बसले, आणि वेळ न दवडता सरळ मुद्द्यालाच हात घातला. 


“हे बघा... रमा, रघु मला माहिती आहे, तुम्हा दोघांनाही मीनाची काळजी आहे. तुम्ही जे मुलींसाठी कराल ते तुमच्या दृष्टीने नक्कीच योग्य असेल. 

पण.....

इतक्या लहान वयात, आणि तेही तिच्यापेक्षा पंधरा वर्षाने मोठ्या असलेल्या मुलासोबत तिचं लग्न!!!! 

कसं शक्य आहे? 

अहो, तिचं बालसुलभ वय... तिला उमलु द्या.... फुलु द्या....

तिचीही काही स्वप्न आहेत. ती पुर्णत्वास नेऊ द्या. 

अगं रमा, तू आई आहेस तिची, आणि मुख्य म्हणजे एक स्त्री आहेस. तू तिचं वर्तमान बघतेय, पण पुढच्या आयुष्याचा कधी विचार केलाय?

लग्न... नंतर मुलं.... सांसारिक जबाबदाऱ्या.... तेही इतक्या लहान वयात झेपेल का गं इतक्या लहान वयात तिला? 

खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्या कडेवर मुलं असेल. कोवळ्या वयात गर्भधारणा आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही गं. ती नुकतीच वयात आलीय... खूप धोका असतो जीवाला.... थोडी परिपक्वता येऊ दे तिच्यात. खुप हुशार आहे तुझी पोरगी.”


माझ्या परीने मी तिला बरंच समजावलं.... आणि थोडी आश्वस्त होऊन घरी आले.

विचार करतच झोपले.


सकाळी सकाळी दाराची बेल वाजली... दार उघडले... तर दारात रमा उभी. 

मी- “अगं रमा तू?”

रमा- “बाई, माफ करा! चुकले मी...

मी फक्त आजचा विचार करत होते... पण तुम्ही डोळे उघडलेत आमचे. शिकवीन मी पोरासनी....”


आज तिच्या चेहऱ्यावर आणि कामातही वेगळाच उत्साह होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama