Samiksha Jamkhedkar

Children

3.0  

Samiksha Jamkhedkar

Children

बालपणीची आठवण

बालपणीची आठवण

2 mins
233


लहानपणी 1 मे ला शाळेत निकाल लागायचा आणि प्रगतीपुस्तक घ्यायला आम्ही विद्यार्थीनी जायचो तेव्हा एव्हडी स्पर्धा नव्हती ना टक्केवारीची बरोबरी ना कधी पालकवर्गाची मिटिंग, ना सोबत कधी आमचा निकाल घेण्यासाठी कुणी यायच प्रगतीपुस्तक Pass अस बघितल की आम्ही खुश तेंव्हा शाळेतच आम्हाला छान शिकवलं जायचं म्हणून कधी शिकवणी लावायची गरजच पडली नाही. 15 जूनला शाळा उघडायची त्याआधी कुणाचे जुने पुस्तक घायचे हे आधीच ठरलेलं असायचं त्याला कव्हर लावून नवीन करायची ,नंतर दप्तर त्याच काय असल तर ठीक नाहीतर कॅरीबॅग ठरलेली असायची, टिफिन नासायचाच कारण मधल्या सुट्टीत घरी येऊन जेवणावर ताव मारायचा ,आणि हो पावसाळ्यात शाळा असल्यामुळे कधी पाऊस आला तर जिवापेक्षा वह्या पुस्तकाला पाऊस लागू नये म्हणून जास्त मरमर असायची, छत्री तर तुरळक असायची नाहीतर गोनीच घोंगट ठरलेलं असायचं, चिखलात पाणी उडवत पच पच करत सगळे कपडे चिखलात भरवायचे, घरी आल्यावर ही ना कधी आई ओरडली, ना कधी बाबा रागावले


मनसोक्त पावसाचा आनंद घ्यायचो.तेव्हा ना कधी सर्दी झाली ना कधी ताप ,लहानपणी अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त लक्ष असायचे सागरगोटे, काचबांगडी, लगोरीचा, चोर पोलीस ,चंफुल, विटीदांडू,गोट्या, आम्ही मैत्रिणीपन विटीदांडू खेळायचो, चुकून विटी कोणाच्या डोक्यात बसली तर भांडणे झालीच हे अगदी ठरलेल.मग भांडणात मुलांसारखं काय विटी दांडू खेळायचं वगैरे वगैरे भांडणे तेवढ्यापुर्तीच मर्यादित परत थोड्यावेळाने जाऊन काकू जास्त लागलं का sorry म्हंटल कि काकू खुश, पण अभ्यासाच्या वेळेत पण अभ्यास मैत्रीण सोबत हसत खेळत फरक एवढाच कोणी मुळातच हुशार असल्यामुळे जास्त अभ्यास करावा लागत नसे थोडक्यात एकपाठी , शाळेत जाताना तर बोर ,चिंचा यांची पण कमी नसायची दिसल बोराच झाड कि मार दगड मग त्या दगडाने कोणाच डोके फोडले तरी चालेल 

अशी मजाच मजा असायची.गेले ते बालपण राहिल्या त्या आठवणी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Children