Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

भाड्याची सायकल

भाड्याची सायकल

1 min
54


लहानपणी आमच्या गावात सायकल भाड्याने मिळायची. तीन रुपयाला एक तास पैसे देवून रजिस्टर मधे नाव लिहून आम्हाला सायकल भाड्याने द्यायचे.तसे त्यांचे नियम पण पाळावे लागत असे.


सायकलची तोडफोड केल्यास, चाकाची हवा गेल्यास जास्त वेळ झाल्यास जास्त पैसे आकारण्यात येईल .या सर्व अटी मान्य करून सायकल ताब्यात यायची.


ती सायकल घेतल्यावर आपल्यासारखे श्रीमंत आपणच असे वाटायचे.

सायकल न येणाऱ्यासाठी आधी कैची सायकल शिकवण्यात येत असे. 

नंतर हळू हळू सीटवर बसून ऐटीत सायकल चालवायची.


सायकल खेळताना एका तासाचे भान रहावे म्हणून मधून वाढून सायकलच्या दुकानापासून चक्कर मारायची, म्हणजे आवाज दिला की समजायचं आपला एक तास झाला म्हणून.


नंतर नंतर एवढा सायकलचा सराव व्हायचा मग हात सोडून सायकल चालायची, सायकल चालवताना हात सोडून नमस्कार करायचा.


आम्ही मैत्रिणी पण सायकल घ्यायचो नवीन नवीन आम्हाला सायकल वर बसण्यासाठी उंच ओट्याचा सहारा घ्यावा लागत असे.

एकदा सायकल यायला लागली की, डबल शिट चालवण्यात मजा वाटायची हळू हळू मैत्रिणीला डबल शीट घेवून तिलाही संपूर्ण गाव फिरून आणायचं.


खूप सुंदर बालपण होते आणि खूप छान त्या आठवणी. 

आता कितीही मोठी गाडी असली तरी लहानपणाची ती सायकलच्या निरागस आठवणी कधीच विसरू शकणार नाही.


Rate this content
Log in