Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

माझ्या शाळेतील प्रजासत्ताकदिन

माझ्या शाळेतील प्रजासत्ताकदिन

1 min
43


करुनी वंदन शूरवीरांना

झेंडा उंच उंच फडकवू

राष्ट्रगीत गावू भारताचे

आनंद उत्सव साजरा करू


माझी लहानपणीची शाळा नेहरू हायस्कूल सावखेडा येथे मी शाळेत होते.

माझ्या आठवणीतला प्रजासत्ताक दिन माझ्या आवडीचा दिवस होता .

शाळेतील शिक्षकवर्ग आम्हाला आधीच प्रभातफेरीत कोणत्या घोषणा द्यायच्या कोणती गाणी म्हणायची याचा आधीच आमचा सराव घ्यायचे.

आमच्या शाळेत P.T. शिकवायचे छान मजा यायची. सगळ्यांच्या दारात सकाळी छान सडा रांगोळी असायची.

सकाळी उठून निळा स्कर्ट आणि पांढरा पोलका या ड्रेसला इस्त्री करायची . सगळे सकाळचे वातावरण किती मंगलमय असायचे .

देशभक्तीपर गाणी ऐकत आम्ही शाळेची तयारी करत असत. मी आणि माझ्या दोन तीन मैत्रिणी जिथे झेंडा वंदन होईल तिथे

आम्ही पुढे जावून राष्ट्रगीत म्हणायचो.

 

प्रभातफेरी झाल्यावर सगळेजण शाळेत जमायचे.

शाळेत आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत व्हायचे.गावातील प्रमुख मंडळी सगळी उत्साहाने कार्यक्रमाला हजर राहायची.

संचलन करणारा विद्यार्थी प्रमुख पाहुण्यांना बोलावून ध्वजारोहण करून घ्यायचे. व राष्ट्रगीत, समूहगान व्हायचे.

 अध्यक्षपद स्वीकारणारे मान्यवर व्यक्ती व सर्व आदर्श शिक्षकांचे भाषण होत असे. लेझिम P.T. झाल्यावर गुणवंत विद्यार्थ्याचे गुणगान होत असे व घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस व प्रमाणपत्र वाटप होत असे.


नंतर आम्हाला पार्ले जी बिस्कीट व चॉकलेट खावू म्हणून मिळत असे. त्या खावूचा आनंद वेगळाच होता.


अशा प्रकारे आमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होत असे.


जय हिंद


Rate this content
Log in