Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा

1 min
69


आदरणीय गुरुवर्य

दंडवत प्रणाम

सर्वप्रथम आपणास गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा


सर, आज मला माझ्या नेहरू हायस्कूल शाळेचा खूप आभिमान वाटतो . मला माझी शाळा दिसली की मी आजही शाळेला वंदन करते .

 सर्व शिक्षकांचे मला अनमोल मार्गदर्शन लाभले . त्यामुळे माझी पुढील वाटचाल खूप सुंदर बनली . 


सर्व शिक्षकांनी मज

दिले ज्ञानाचे भांडार l

कामी सर्व शिक्षण आज

लेखणीला टोकदार धार l


तुम्ही स्वतः चंदनासारखे झिजून आमच्या आयुष्याला जे वळण दिले . आम्ही शाळेत आलो तेंव्हा मातीचा गोळा होतो . तुम्ही आम्हाला ज्ञानाचे भांडार देऊन मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर घडा बनवले .


मातृ देवो भव पितृ देवो भव वेदांनी आरंभीच केला गौरव . परंतु तुम्ही आम्हाला लहानपणी चांगले संस्कार दिले . 


आमच्या शिरी होता

तुमचा वरदहस्त l

आयुष्य आमचे बनले

सुंदरच मस्त l


आम्हाला ज्ञान देताना तुम्ही काहीच राखून ठेवले नाही . सढळ हाताने भरभरून ज्ञान दिले . आमच्या आयुष्यातील आम्हाला लाभलेले आतापर्यंतचे गुरूजणवर्ग दिसला की आताही आमचा माथा त्यांच्यापुढे नम्रतेने झुकतो .आज गुरुपौर्णिमेच्या दिवसानिमित्त मी माझ्या शब्दरुपी भावना थोडक्यात मांडल्या त्याचा स्वीकार करावा .


Rate this content
Log in