बाबा, हॅप्पी मदर्स डे
बाबा, हॅप्पी मदर्स डे


"पिल्लू थांब, भिजशील." नीरज आपल्या पाच वर्षांच्या खोडकर स्वरेशच्या पाठीमागे धावत तो भिजू नये म्हणून स्वतःचं जॅकेट काढून त्याला घालतो.
स्वरांगी गेल्यानंतर तोच आता बाबासोबत आई झाला होता. त्याची शाळा, अभ्यास, ऑफिस, जेवण, त्यात त्याच्या खोड्या यातच पूर्ण दिवस जाई.
मदर्स डेच्या दिवशी स्वरांगीच्या फोटोकडे पाहून त्याचे डोळे भरून यायचे. कितीही झालं तरी आपण स्वरेशला आईची माया देऊ शकत नाही म्हणून त्याला आजही गहिवरून आलं आणि अपराधी वाटू लागलं.
तितक्यात बाजूला झोपेतून उठलेला स्वरेश आपल्या बाबाला गोड पा देऊन "बाबा, हॅप्पी मदर्स डे" म्हणत त्याला मिठी मारतो.
अश्रूंवाटे त्याच्या अपराधी भावना निघून गेल्या आणि Mother's day साजरा झाला.