shiv gawade Jadhav

Romance

4.0  

shiv gawade Jadhav

Romance

अव्यक्त प्रेम

अव्यक्त प्रेम

4 mins
239


दुपारची वेळ होती.ऊन चटकत होत. जूनचा दुसरा आठवडा चालू होता. जमिनीला मोठ-मोठ्या भेगा पडल्या होत्या. जमिनीचा घसा कोरडाठण वाटत होता. जमिनीचे डोळे आकाशाकडे लागलेले होते.जमिनीसोबत उन्हाने सगळेच बेहाल झाले होते. घामाच्या धारांनी सगळेच चमकत होते. सगळेच राहून राहून आकाशाकडे बघत होते. सगळ्यांनाच पावसाच्या आगमनाची आतुरता लागली होती.सकाळपासून आकाशात हालचाल चालू होती.

                                    दुपारनंतर अचानक आकाशाचा कलर बदलला. आकाशातली हालचालीने आता चांगलाच जोम धरला होता.अंगाला सुखावणारा सोसाट्याचा वारा हलकाच स्पर्श करून जात होता. त्यानं अगदी स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटत होत.त्या सुखावणाऱ्या वाऱ्यासोबतच मातीचा गंध पसरलेला होता. दूरवर मोकळ्या पटांगणात वाऱ्याबरोबर धुळीचे कण आकाशाला भेटायला चालल्यासारखे वाटत होते. त्या मातीचा वास अगदी मन मोहून टाकणारा होता.त्या वासाने असं वाटत होत की खाली बसून दोन्हीही हातानी माती खावी. आता वाऱ्यानेही वेग पकडला होता.अचानक ते निसर्गाच रौद्र रूप पाहून मनात भीती वाटली पण आश्चर्यही वाटलं.

                                            मी असच बाहेर फिरायला गेलो होतो.आभाळ आता काळ्या ढगांनी भरलं होतं. जोराचा वारा आता जास्तच गार झाला होता. मला असं वातावरण खूप खूप आवडतं. माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. मी पक्क ठरवलं होतं आता पाऊस आला की मस्त भिजायचं. पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा.मनोमन ठरवून खूप खुशही झालो आणि दिवा स्वप्नात हरवलो पण अचानक ढगांची आकाशात टक्कर झाली. काआआआडकन आवाज झाला तसं मी भानावर आलो.

       पावसाचा एक टपोरा थेंब माझ्या अंगावर पडला मला इतका आनंद झाला की विचारूच नका.पावसाचे थेंब पडायला लागले की आसपासच्या लोकांची घाई सुरु झाली. जो तो पटपट पाऊल उचलायला लागला होता. मी मात्र गोगल गाईच्या मंद गतीने चालत होतो कारण मला पावसात भिजायचं होतं. आता मातीला महान करणाऱ्या पावसाने गर्जना करत मी येतोय हे दाखवलं होतं. आता मोरांचाही दूरवर ओरडण्याचा आवाज येऊ लागला होता. त्या ठिकाणी फक्त आम्ही तिघेच मी, जमीन आणि तो पलीकडे दूरवर ओरडणारा मोर पावसाच्या स्वागताला उभे आणि उतावीळ होतो.आता पावसाच्या सारी जोरजोरात कोसळून लागल्या घाई करणारे चक्क पाळायलाच लागले. मी दोन्ही हात पसरून आभाळाकडे पाहत होतो.माझ्या आनंदाला ठिकाणाच उरला नव्हता. आता ही घसा कोरडा झालेली धरणी माय घटाघटा पाणी घशात घेत होती. आता तो मातीचा वाऱ्यावर दरवळणारा मंद सुगंध गर्द होयला लागला होता.

मी मस्त पावसात भिजत होतो. बरेच लोक आडोशाला उभे होते. काहीजण आडोश्याला धावत होते. ही धरणीमाय आता हिरवी शाल पांघरणार होती. सगळीकडे हिरवळ चढणार होती. मी हळूहळू पुढे निघालो होतो. पण या पडणाऱ्या पावसाच्या टपटप आवाजात एक छुमछुम करणारा आवाज लक्ष्य वेधून गेला. या कोसळणाऱ्या सरींच्यात तो त्याचं वेगळपण साफ दाखवत होता.मी त्या आवाजाला आता शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. माझं लक्ष्य अचानक रस्त्याच्या पलीकडे गेलं. छोट्याश्या वडाच्या झाडाखाली 2-3 मुली उभ्या होत्या. एकीच्या हातात लेडीज सायकल होती. दुसरी मुलगी आपले हात एका दुसऱ्या मुलीला आवरत होते.ती मुलगी मस्तपैकी पावसाचा नाचून आनंद घेत होती आणि त्याच मुलीच्या पायातल्या पैंजणांचा आवाज येत होता. जो कोसळणाऱ्या सरींनाही भेदत माझ्या कानांवरती पडला होता. आता या पावसाचं स्वागत आम्ही तिघे नाही चौघे करत होतो. बास अगोदरच तिच्या पैंजणांच्या आवाजाने हृदय घायाळ झालं होत आणि जेव्हा तिला पाहिलं आता मी आणखीनच घायाळ झालो. पायात एक छोट्याश्या उंचीचा सैंडल होता. अंगावरती पिवळ्या रंगाचा कुर्ता, हिरव्या रंगाची लेहगिंज आणि हिरव्याच रंगाची ओढणी.पावसामुळे तिचे कपडे तिच्या अंगाला चिटकले होते. तिचे ते काळेशार केस ओले झाल्यामुळे चेहऱ्यावरती चिटकले होते.लाल आणि गोरे गोरे गाल अगदी टोमॅटोसारखे वाटत होते. ते इवलसं पण पोपटाच्या चोचीसारखं बाकदार नाक, गुलाबाच्या पाकळीसारखे लालबुंद ओठ आणि त्यावर ते गालावरून ओघळणारे पाण्याचे थेंब, मृगासारखे डोळे आणि थोडासा उभट चेहरा, उंचीपुरी. हृदयाचा ठोकाच चुकला. आणि एका क्षणात माझा जीव तिच्यावरती आला. मला प्रेम झाला की काय ? असं वाटायला लागलं.

                                        रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं मी तिच्याकडे पाहत होतो. तिला बघण्यात मग्नच होऊन गेलो. रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीने अंगावर पाणी उडालं आणि मी भानावर आलो. पण तिला पाहतच राहावं वाटत होत.पुन्हा मी तिच्याकडे पाहायला लागलो. तिझ्या मैत्रिणी वृषाली वृषाली बाआआस आता बास ओरडत होते. पण ती मात्र कोणाचंच ऐकत नव्हती.त्यातल्या एका मुलीचं माझ्याकडे लक्ष्य गेलं आणि ती मनातल्या मनात काहीतरी पुटपुटली ते मला अस्पष्टच ओठ हलल्यामुळे समजलं. तेव्हा वृषालीने माझ्याकडे पहिलं तिझ्या त्या भेदक नजरेने एखाद्या शिकाऱ्याच्या बाणाने हरीण घायाळ व्हावं तसा मी घायाळ झालो. तिझी आणि माझी नजरानजर झाली तशी ती थांबली पैंजणांचाही आवाज थांबला पण आम्ही आणखीनही एकमेकांकडे पाहतच होतो. तीही बेभान होऊन माझ्याकडे पाहत होती. तिझी ती गोरी कांती थोडीशी लाजेनं लाल झाली होती. पण भेदक डोळे मात्र माझ्या डोळ्यातच बघत होते. मीही अगदी वेड्यासारखं तिच्याकडे पाहत होतो.मी आता पुढे तिच्याकडे जाऊन मला तुझ्यावर पहिल्या नजरेतच प्रेम झालं असं सांगावसं वाटलं पण तिझ्या मैत्रिणी आता तिला पुढे ओढत होत्या.तिला पुढे ओढली तरीही ती माघे वळून माझ्याकडेच पाहत होती.मला आता काहीच समजत नव्हत. पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. मला तिझ्यावर पहिल्याच नजरेत, एका क्षणात प्रेम झालं होत.

               वृषालीला तिच्या मैत्रिणी ओढून घेऊन गेल्या. पण शेवटपर्यंत माझी नजर तिला आणि तिझी नजर मला शोधात होती. कोसळणाऱ्या पावसाच्या सऱ्यांमुळे तिची जाणारी आकृती अस्पष्ट दिसत होती. तरीही माझी नजर तिकडेच खिळून राहिली होती.वृषाली त्यांच्यासोबत निघून गेली आणि माझं प्रेम अव्यक्तच राहीलं.मनातलं प्रेम ओठांवरती येण्याअगोदरच ती निघून गेली. मन आता उदास झालं आणि तसाच मंद पावलांनी मी आत्याच्या घराकडे निघालो. मनात प्रश्नांचे काहूर होते. ती पुन्हा भेटल का ? आपलं प्रेम असच अबोल राहणार का ? हे नक्की प्रेमच झालं होत का ? अश्या प्रश्नांच्या काहुरात असतानाच कधी आत्याच्या घरी पोहोचलो ते समजलंच नाही. आत्याच्या आवाजाने मी भानावर आलो होतो.आत्या बॅग भरत होती कारण मी उद्या माझ्या गावी जाणार होतो.

    माझं प्रेम अव्यक्तच राहीलं. आणि आता कित्येक वर्ष झाली तरीही मी त्या आठवणींना आजही प्रत्येक पावसाच्या सुरुवातीला कॉफी घेत उजाळा देतो. आणि मनातली मनात दुःखी होतो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance