"अविरत यात्रा"
"अविरत यात्रा"
मानव जीवनाची अविरत यात्रा या जन्मात जीवन आणि यश यांच्या भोवती झुलतांना प्रथम आघाडी व पडतीचा विचार मनात यायला हवा असतो. प्रत्येकास उंच भरारी घ्यावे अस वाटत असते. पंरतू त्यामागे एक प्रकारची आराधणा असते.जीद्द असते.मनात उदासीनतेला शिरकाव करूच द्यायचा नाही. जे घडते आहे तेच बघत बसणे ,आणि आज मला काय करायचे आहे,हे सोडून इतरांशी तुलना करण्याला जास्त महत्व देणे,त्याच त्या गोष्टी त्याच बाबी, घेवून रहाने, अश्या गोष्टीने रूटीन असलेले कामे आव्हाने निर्माण करीत नाहीत.!
चांगल्या गोष्टींनी केलेली तुलना तुमच्यासाठी प्रोत्साहनही ठरू शकतात.परंतू बरेचदा तुलना केल्याने न्यूनगंडही निर्माण होवू शकतो.तुलना करणारा संशोधक वृत्ती गमावून बसतो.नवनविन कल्पनेशिवाय यश मिळविणे अवघडच असते. उद्याचा चांगला दिवस कधी उगवतच नाही. जेंव्हा येतो तो आज असतो. चांगल्या उद्याच्या शोधात आज गमवू नका.
आज काय करायला हवे,यावर लक्ष दिले तर रस्ता प्रशस्त होईल, आत्मचिंतन करायला स्वत:ला वेळ द्या. आत्मचिंतन करण्या ऐवजी दुसऱ्यांशी तुलना करु नका.यशस्वी होण्याकरिता तुलनात्मक विचार केला तर काही हरकत नाही.पंरतू ती अतीशयोक्ती होवू नये याची दक्षता घ्यावी.दुसऱ्यांच्या गाडीपेक्षा माझी गाडी सुंदर आहे,किंवा महाग आहे.माझा बंगला मोठा आहे.माझी मुल खुप हुशार आहेत किंवा आजूबाजूच्या बायकांपेक्षा माझी बायको खुप सुंदर आहे, म्हणुन स्वत:ला धन्य समजणाऱ्या महापुरूषाला तुलनात्मक महत्व समजवून सांगणे किती अवघड ठरेल! मेहनतीचे,सातत्याचे पर्यायाने यशाचे चांगल्या गोष्टींची केलेली तुलना तुमच्यासाठी प्रोत्साहनही ठरू शकेल.पर्यायाने आपला यशाचा आलेख तुलनात्मक घसरत जातो.स्वत:मध्ये बदल करावा.कधी बदल करण्याची कुवत रहात नाही. म्हणुन आपण नेहमी पर्यायाच्या शोधात असलो पाहिजे. जोपर्यंत निश्चित असा योग्य पर्याय सापडत नाही तो पर्यंत नेहमीचाच मार्ग पंरतू तो कायमस्वरुपी नसावा,काही काळापुरता मर्यादित असावा.
मेहनतीला पर्याय नसतो आणि नेमकी हीच गोष्ट लोक विसरतात.स्वप्न सत्यात आणण्याकरीता मेहनतीची गरज असते.नविन गोष्टींचा विचार करायला पाहिजे. प्रत्येकाने नव्या गोष्टीं शिकणे त्याचे कृतींमध्ये रुपांतरित करणे,अती आवश्यक असते ,ही क्षमताच स्पर्धेच्या युगात महत्वाची असते. बदल पाहिजे परंतू बदलांना आंनदाने समोरे जा. बाहयजगापेक्षा तुमच्या बदलाचा वेग कदाचीत कमी असेल तर तुमची पडती आलेली आहे असे समजावे.हार न मानता त्या पडत्या काळातून मार्ग प्रशस्त करणे हे आपल्याच जवळ असते रस्ता कधीच नसतो तो शोधावा लागत असतो. जेंव्हा विनोबा भावेजींची एक गोष्ट नेहमीच सांगतली जात असतेे. विनोबाजी दरदिवशी सुरगावला पवनारच्या आश्रमातून मैला सफाई करायला जात असायचे.ती सेवा भावनेतुन त्यांनी स्विकारली होती.संपूर्ण वर्षभरात चार दिवस ते जावू शकले नाहीत. विनोबाजींना त्याची सारखी रुखरुख वाटायची.ती अस्वस्थता त्यांनी आपल्या निकटच्या सहकाऱ्याला व्यक्त केली. मनातुन विनोबाजींना कामाचा ध्यास असायचा.ते कोणतेही काम लहान,मोठे किंवा हलके भारी मानायचे नाही.
त्यांचा सहकारी म्हणाला वर्षात तीनचार खंड म्हणजे काय खंड आहे. सर्वांना अनेक सुट्या असतात.सर्व कार्यालयात,शाळेत ,दुसऱ्याला, दिवाळीला,नाताळाला सुट्टया असतात.मोठ्या सुट्या परत वेगळ्या असतात. शनीवारची अर्धी रविवारची पूर्ण सुट्या सर्वांना असतात मग कोणत्याही कार्यालयात वर्षभऱ्यात आठ महिने काम करतात.बाकी दिवस सुट्या असतात.त्या तुलनेत आपल्या सारखा समाजशिक्षकने केवळ चार सुट्या घेतल्या त्यात खटकण्यासारख आहे तरी काय.? तेंव्हा विनोबाजीं म्हणाले ती काय माझा आदर्श आहेत कां.? माझ्या सुट्यांच उदाहरण देवून माझ्या तीन चार दिवसाच्या सुट्यांच समर्थन कसे काय होवू शकते.? असे असतात महात्मे. म्हणून समाजात त्यांच्या साहित्यातून आपण काही बोध घेवू शकतो.