और प्यार हो गया
और प्यार हो गया
निकी, चहा दे एकदम स्ट्राँग.घरात येता येताच राहुल म्हणाला.
हो करते.म्हणत निकिता ने त्याच्या हातून ऑफिस ची बॅग काढून घेतली .
चहा आणि नाष्टा डायनिंग टेबलवर तिने ठेवला.राहुल फ्रेश होऊन आला.
अहो,उद्या सई च्या शाळेत पालकांची मीटिंग आहे.दोघांना बोलवले आहे.
हे बघ,मला अजिबात वेळ नाही.तुला माहित आहे ना किती बिझी असतो मी.तरी तू का मला हे सांगत असतेस.अशा किरकोळ गोष्टी तू मॅनेज करत जा ना.
अहो, पण नेहमीच तर मी जाते,कधी तरी तुम्ही सई चे वडील म्हणून यायला हवे की नको.
निकी,मला जमत नाही.उगाच काही बोलू नकोस.आधीच ऑफिस च इतके टेन्शन असते.तू कशाच साठी माझ्या मागे लागत जावू नकोस.आता नवीन प्रोजेक्ट दिलाय मला,मला डोकं वर काढायला फुरसत नाही.
राहुल चहा घेवून बेडरूम मध्ये गेला .हे नेहमी चेच आहे.राहुल ला फ्कत काम आणि कामा चेच पडले असते.सई ची शाळा,अभ्यास,घरची कामं,किराणा आणणे,भाजी सगळ काही निकिता करत असे.राहुल फक्त पैसे देण्याचे काम करी.
रात्री सगळ आवरून,सई ला झोपवून निकिता बेड रूम मध्ये आली.राहुल अजून ही लॅपटॉप मध्येच घुसून होता.
जरा वेळ निकिता ने एक मासिक घेतले वाचायला.वाचत वाचत तिला झोप येवू लागली.तसे ती राहुल जवळ गेली, अहो,किती काम करता..मला झोप यायला लागली आहे.
अरे,मग तू जा ना झोपून.मला वेळ आहे अजून थोडा.
झालं निकिता मुकाट त्याच्या कडे पाठ करून झोपली.आपल्या काही फिलिंग,काही इच्छा आहेत याचे याला काही पडलेलेच नाही.नव्याचे नऊ दिवस संपले तसे राहुल कामाच्या रगाड्यात गुंतून गेला.कधी त्याच्या मनात आले की निकिता ला जवळ घ्यायचा आणि यंत्रवत सगळ उरकून झोपून जायचा.
सकाळी राहुल आवरून टिफीन घेईन ऑफिस साठी निघाला,निकी तू जावून ये सई च्या शाळेत.
हो जाते.आज टिफीन मध्ये तुमच्या आवडीच्या कोथिंबीर वड्या दिल्या आहेत,नक्की खा.कोणाला वाटत बसू नका.
हो खातो म्हणत राहुल बाहेर पडला देखील.
संध्याकाळी निकिता ने विचारले की वड्या कशा झाल्या होत्या.
छान, मला थोड्याच मिळाल्या.सगळ्यांनी हात घालून टिफीन मधून घेतल्या.
राहुलचं असच होत.तो ऑफिस आणि काम यात पूर्ण व्यस्त होता.घर बायको,मुलगी यांच्या साठी वेळच नसायचा त्याला. सुरूवातीला निकिता राहुल येण्याच्या वेळी छान साडी किंवा दुसरा ड्रेस घालून व्यवस्थित तयार असायची. पण राहुल...त्याच तर तिच्या कडे लक्षच नसायचे.मग कौतुक तर लांबच! मग निकिता ने ते सगळ सोडून दिले.घरच्याच अवतारात ती असायची. राहूल ला काही सोयरसुतक नव्हते.
नेहमी प्रमाणे राहुल ऑफिस वरून घरी आला,फ्रेश होऊन किचन मध्ये आला,आणि पाहतो तर चक्क निकिता छान साडी नेसून. केस क्लिप करून मोकळे सोडलेले,हलका मेकअप..आणि गाणं गुणगुणत होती.राहुल ला तिला असे बघून आश्चर्य वाटले.आज अचानक ही अशी तयार होऊन, गाणं वैगेरे..काही खास आहे का आज..आमच्या लग्नाचा वाढदिवस,किंवा निकिताचा वाढदिवस...नाही ..इतक्यात कोणाचा च वाढ दिवस नाही.न राहून मग त्याने विचारलेच,निकी कुठे बाहेर चालली आहेस का?
निकिता त्याच्या समोर चहा ठेवत म्हणाली,.नाही कुठे नाही जाणार.
मग अस रेडी का आज?
असच..म्हणत निकिता गाणं गुणगुणत बाहेर बाल्कनीत कपडे काढायला गेली.
परत दुसऱ्या दिवशी सेम असच..निकिता सकाळीच छान आवरून ,किचन मध्ये काम करत होती.एकीकडे रेडिओ ही सुरू होता.राहुल पुन्हा अचंबित.
संध्याकाळी घरी आला तरी निकिता एकदम फ्रेश मुड मध्ये. रेडिओ वरची गाणी म्हणत काम करत होती.राहुल ला आता तिचे कोडे पडत चालले होते.रात्री लॅपटॉप वर काम करता करता ही तो निकिता चा विचार करत होता.कुठे तरी वाचलेले त्याला एकदम आठवले की माणूस प्रेमात पडला की खुश राहतो,छान तयार होत असतो,गाणी म्हणतो.. म्हणजे याचा अर्थ निकिता कोणाच्या प्रेमात पडली असेल... ओ नो..तसे पण मी तिच्या कडे जास्तच दुर्लक्ष करतो हल्ली,तिला वेळ ही देत नाही.घरात नुसती कामात असते बिचारी.आपल्याला वैतागून निकिता प्रेमात नसेल ना पडली.तिला विचारायला हवे कारण ही सगळी तिची लक्षणे तशीच आहेत .राहुल ला आता जाम टेन्शन आले.
दोन चार दिवस त्याचे विचार करण्यातच गेले.निकी ला कसे विचारू डायरेक्ट याच विचारात होता तो.आणि निकिता असच छान आवरून भाजी आणायला,तर कधी सई सोबत खाली गार्डन मध्ये जात होती.आज ही निकिता दुकानात गेली होती.राहुल ने ठरवले की आता निकिता आली घरी की आपण विचारू तिला...थोड्या वेळात निकिता आली.तिच्या हातातून त्याने भाजी सामान च्या पिशव्या काढून घेतल्या.निकी,मला बोलायचे आहे तुझ्या सोबत थोड.
हो का..आलेच मी म्हणत निकिता फ्रेश होऊन आली.
बोला,काय बोलायचे होते.?
ते अस.. म्हणजे मला विचारायचे होते की..नाही तू आज छान दिसतेस निकी.. गोंधळून राहुल वेगळच बोलला.
बस्स इतकंच ना...मी जाते आता स्वयं पाक करायचा आहे.
निकी,थांब अजून काही विचारायचे आहे मला.राहुल ने तिला थांबवले.
अहो,बोला ना मग पटकन.मला उशीर होतोय.
निकी,तू कोणाच्या प्रेमात वैगेरे पडली आहेस का?
हो,,प्रेमात पडले आहे मी.
ओह..म्हणूनच तू रोज अशी छान तयार होतेस, गाणं गुणगुणत असतेस..एकटीच हसतेस.आवरून अशी बाहेर जातेस..कोण आहे तो.?.आता राहुल चिडला
होता.
तशी निकिता मोठ्याने हसू लागली.
का हसतेस तू निकी,मला उत्तर दे.कोण आहे तो?
अहो,नका इतके चिडू..सांगते मी..हासू दाबत निकिता म्हणाली.
बोल लवकर..माझा संयम सुटत चालला आहे.
अहो,मी माझ्याच प्रेमात पडले आहे.
काय?? राहूल ला क्षभरासाठी समजलेच नाही.
हो मी माझ्याच प्रेमात पडली आहे.म्हणून अस छान आ वरून, गाणं गुणगुणत असते.अस पण तुम्हाला माझ्या कडे बघायला ही वेळ नसतो, माझं कौतुक करत नाही कधीच.कधी निकी आज भाजी छान झाली होती अस बोलण नाही,तुम्ही फक्त तुमच्या कामात मग्न.मग मीच ठरवले की आपण आपल्या साठी छान राहायचे,मस्त जगायचे, स्व ता वर प्रेम करायचे.म्हणून हा बदल केला. पण बघा मी जरा वागणयात चेंज काय केला,तुमचे लक्ष माझ्या कडे गेले.असच रोज थोड लक्ष देत जा ना प्लीज.
निकी,आय एम रियलि सॉरी..कामात इतका गुंतून गेलोय मी की तुझ्या कडे लक्षच जात नाही माझे.
हो का..मग बघा हा मला कोणी दुसरा आवडू लागला तर ..
नो वे निकी अस नाही होणार आज पासून..अस म्हणत राहुल ने तिला आपल्या कवेत घेतले.तिच्या नजरेत बघत म्हणाला,खूप सुंदर दिसतेस निकी..आय एम फॉल इन लव विथ यू अगेन..
खरच..निकिता लाजून म्हणाली.
हो..आणि आता डिसेंबर संपत आला तर मी विचार करतो आहे की माझ्या राहीलेल्या सगळ्या सुट्ट्या एकदम घेवून टाकतो..आपण दोघेच कुठे तरी मस्त फिरायला जावू.जस्ट लाईक आवर सेकंड हनिमून..चालेल ?
हू... चालेल.निकीता त्याच्या मिठीत तोंड लपवत म्हणाली.
या २०२२वर्षाने मला पण पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पाडले तुझ्या निकी..आणि स्वत: वर ही प्रेम करायला शिकवले.हसतच राहुल म्हणाल.
समाप्त

