अती तेथे माती
अती तेथे माती


आज संजनाच्या ,घरी गडबड गोंधळ होता,कारण ही तसेच होते,
आज तिला पाहायला ,पाहुणे येणार होती.पत्रिका चांगली मिळाली होती.मुलांकडली मंडळी गर्भश्रीमंत होती,त्यामुळे संजनाच्या आई वडीलांचा चेहरा गर्वाने फुलुन गेलेला होता.
वास्तवात, काँलेजांत असतांना गांवातल्याच मुलाबरोबर प्रेमरज्जु जुळले होते.पण पुढे सरकत नव्हते,तो मुलगा,गरीब घरातला असल्यामुळे संजनाच्या पालकांना ते कबुल होणे अवघडच होते.वरतुन त्या मुलाची जात ही निराळी होती.
संजना आधीच कमी बोलणारी,मग ही गोष्ट घरातल्यांना सांगायचे धाडस तिच्यात कुठुन येणार.
हां हां,म्हणता, एकदाचे पाहुणे आले.सोबत मुलगा त्याचे आई वडील,मित्र ,मामा ,मध्यस्थ,बहिण दाजी एवढा मोठा लवाजमा होता.त्यांच्या होंडासिटीतच सारे पाहुणे आले होते.त्यांचे कपडे,रूबाब,पाहुण संजनाच्या घरचे हबकले होते.
चहापाणी झाल्यानंतर ,मुलाच्या आईने विचारले,"मुलगी कुठे आहे"."बोलवतो तिला".
पाहुणे बघायला येणार म्हटंल्यावर संजना ब्युटीपार्लर वालीकडे जाऊन आली होती.मुळची ती रूपवानच होती.तिच्या आईचे सौंदर्य घेऊनच ती जन्माला आली होती.
वडिलांनी बाहेर यायचा इशारा केल्यानंतर,हाती चहाच्या कपाचा ट्रे घेऊन संजना आली.
पाहुणे मंडळींना तिने चहाचे कप दिले.चहाचा कप देतांना ,तिचे हात थरथरत होते,सारेच तिला निरखुन पाहात होते.मुलाला चहा देतांना क्षणभर दोघांची नजरानजर झाली.तेव्हा तिची पापणी लज्जेने झुकली,अंगठ्याकडे पाहु लागली.बरोबर तिची मावशी होती,तरी जेव्हां मुलाच्या आईने इशारा केला,तेव्हांच ती खुर्चीवर नीट सावरून बसली.
मुलाच्या दाजींनी, प्रश्न विचारला" काय नांव तुमचे,"नांव संजनास भितीमुळे आवाज उमटेना,तरी खोल आवाजात म्हणाली" संजना".
"कुठवर शिक्षण झाले तुमचे."एम.काँम. "
"ठिक आहे,तुला छंद वगैरे,म्हणजे खेळ,कला एखादी."
वास्तवात ही सर्व माहिती त्यांनी पाठवलेल्या,बायोडेटात होती.पण आजकाल हा पँटर्नच बनला आहे समाजात.मुलगी पोस्ट ग्रँज्युएट असुन तिला नांव सांगायला लावणे,म्हणजे हद्दच झाली.पण याचे कुणालाच काही नाही.
मुलाच्या आईने विचारले" तुला एकत्र कुटुंब आवडते कां विभक्त,
तुला स्वयंपाक करता येतो कां?,लग्नानंतर नोकरी करणार कां?
असे बरेच प्रश्न विचारले,संजनाने ही उत्तरे दिली.शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिले,"घराच्या गरजेनुसार व परवानगीवरच ते अवलंबून आहे".सगळ्यांना तिचा तडफदारपणा आवडुन गेला.
नंतर नेहमीप्रमाणे मुलामुलींना दुसऱ्या रूममध्ये चर्चेसाठी पाठविण्यात आले.
मुलगा मुलगी बोलत असतांना कांदे पोहे ही आले,सरबताचे ग्लास ही आले.
तेवढ्यांत संजना व तो मुलगा ही बाहेर आला.
मुलगा बाहेर आल्यानंतर,त्याच्या आईने मुलाला बाजुला घेऊन ,विचारले,तेव्हा त्यांने मला पसंत आहे असा संकेत दिला.
नंतर मोठ्यांची बैठक भरली.मुलीची आई म्हणाली" आम्हांला तुमची मुलगी पसंत आहे,पण आता देण्या घेण्या बाबत बोला.बाई करारीपणे म्हणाली.त्यांनी मध्यस्थाला खुणविले.ते पुढे आले.आधीच पढविल्याप्रमाणे बोलले." पंधरा तोळे सोने,मुलाला गाडी,दोन्हीकडचे मानपान,लग्नाचा खर्च,संसाराची भांडीकुंडी, हा मुलीवाल्यांनी करावा,तसेच प्रतिष्ठीत , असल्याने लग्न मोठ्या मंगलकार्यात,बुफे केटरर्स पाहिजे,मानाला प्रतिष्ठेला शोभेल असं झालं पाहिजे.
ते ऐकून संजनाचे आईवडील हबकुनच गेले.संजनाच्या वडीलांची शेतीवाडी असली तरी अल्पच होती.दुधाच्या उत्पन्नावर घर चालत होते.
संजनाचा मामा ही होता.त्यांने संजनाच्या वडिलांना धीर दिला,हे चांगले स्थळ आहे,घालवु नका.पाहिजे तर मी ही भाचीसाठी पाच तोळे लावतो .
शेवटी हा ना करता,पंधरा वरून दहा तोळ्यापर्यंत मध्यस्थाने कबुल करायला लावली.
मुलीच्या सुखी जीवनासाठी वडिलांनी साऱ्या अटी मान्य केल्या,काय करणार या आपल्या देशांत लग्नाच्या नावांखाली मुलीची बोलीच लावली जाते.अन या गुन्ह्यात मुलीच्या घरचे ही तेवढेच जबाबदार असतात.
नंतर आग्रह करून सोयरे सोयरे जेवायला बसले.थाटात जेवणे पार पडली.घाईघाईत मुलांकडल्या सर्व महिलांना साड्या नेसवल्या ,पुरूषांना रोख रकमेची पाकिटे गंध लावुन दिले. ब्राम्हणाला बोलावुन लग्नांचा मुहुर्त ही काढण्यांत आला.
अशारितीने लग्न तर ठरले,आता पुढची तजवीज करायची कशी.संजनाच्या वडीलांना शेतातले उभे कापसाचे पिक, हिंमत देत होते,काय राहिलं नाही तरी चालेल संजनाचं लग्न थाटात पार पडलं पाहिजे,ही जिद्द होती.
दिवाळी पार पडली. तुळशीचे
लग्न लागल्या लागल्या लग्नाची तयारी सुरू झाली., कपडे,मंगल कार्यालय आचारी वगैरे सारं ठरवण्यांत आलं.
अशांच एके दिवशी,काळरात्री,आकाश भरून आलं,सोसाट्याचा वारा,पाठोपाठ ताडताड गाराचा पाऊस पडला.तो पाऊस पाहुन संजनाचे वडील तर हबकुन गेले,सकाळी शेतात जाऊन पाहतात तो काय,गारांचा संपुर्ण शेतात खच पडला होता,उभे कापसाचे पिक पावसाने धुऊन नेले होते.
आता काय करायचे लग्न आठ दिवसावर आले,सगळं बुक झालेलं,पत्रिका ही गेल्या.
तरी संजनाच्या मामाने काढु आपण रस्ता असं सांगुन हिंमत दिली.
वाजत गाजत हळदीला,नवरदेवाला घेण्यासाठी आदल्या दिवशी,गाडी पाठवली. वऱ्हाड ही आले.आल्या आल्या त्यांचे नखरे सुरू झाले.इकडचे पै पाहुणे आधीच जमा झाले होते.
आल्या आल्या विहीणबाईंनी,हुंड्यांचा धोशा लावला,काही पैसे नंतर देतो असे संजनाच्या मामाने सांगितले.
पण विहीणबाई ऐकेनाच,त्या गांवातल्या प्रतिष्ठीत माणसांनी ही झालेली घटना विशद करून सांगितली.माणुसकीने घ्या,सर्व काही ठिक होईल.शेवटचा उपाय म्हणून संजनाच्या वडिलांनी जमीन नांवावरून करून देतो असे सांगीतले,तेव्हां कुठे ती शांत झाली.
संजनाला,ही घटना समजताच,ती त्वेषाने बैठकीच्या जागी आली.माझ्या बापाला लाचारी पत्करायला लावणाऱ्या मुलाशी मला लग्नच करायचे नाही.
तिच्या वडिलांनी केविलवाण्या स्वरांत असं नको करू,माझ्या अब्रुची जरा किंमत कर ,असे विनवले.
तरी संजना ठाम स्वरात म्हणाली" माझा पत्नी म्हणून कुठली ही अपेक्षा न करता स्विकार करेल,त्याच्याशीच मी पाट मांडेन."
तेव्हां तिच्यावर मुक प्रेम करणारा युवक तिथेच होता,तो पुढे आला,लग्नाला तयार झाला.
मग काय तिथे एकच रणधुमाळी माजली.आलेल्या लोभी वऱ्हाडाला,गांवकऱ्यांनी चोप देवुन पोलीसांच्या ताब्यात दिले.अन ठरलेल्या मुहुर्तावर संजनाचे लग्न सुखरूप पार पडले.
सगळीकडे संजनाच्या व त्या युवकाच्या धैर्याची प्रशंसा झाली.
अन त्या लोभी कुटुंबाला,हात हलवीत परतावे लागले.
लोभ्यांच्या आयुष्यात नेहमी खड्डाच असतो व अती तेथे माती हा धडाच साऱ्यांना मिळाला.