Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

असा हा गारवा

असा हा गारवा

1 min
203



*असा हा गारवा*

*पहाटेचा गारवा*

छान वाटे मनाला*

*रानी वनी भटकंती*

*करावी वाटे जिवाला*


खरंच हा हिवाळा भारी प्रिय आहे मला. थकवा न देणारा. भूख वाढवणारा, घाम येऊन दुगंर्धी न देणारा . त्यामुळे जर भटकंती करायची असेल तर हिवाळाच ऋतू आवडतो मजला. अशावेळी उंच ठिकाणी गेलो तर सकाळ उजाडल्यावर सृष्टीचे सौदर्य पाहण्या सारखेच!


शुभ्र धुक्याचे पांघरूण वसुंधरेच्या पुष्ठभागावर तसेच आकाश, डोंगर दऱ्यानी भरून धरतीला समांतर करून गेलेले, हळू हळू वितळत जातं असतं आणि रविराजाची कोवळी सोनेरी किरणाने, चित्रपटात दाखवतात तसे खरोखरच प्रकाशमय होत असतं ते प्रत्यक्ष निसर्गात पाहणे अहो भाग्यच!! 

गारवा लागतो म्हणून रजईत गुडूप झोपणाऱ्या 

माणसांची मला कींव वाटते. अशा हिवाळी गारव्यात शाल स्वेटर हवा असेल तर घालून मस्त फिरायला जावे. सृष्टीचे सोदर्य डोळ्यात साठवून ठेवावे. अजून थोड्या उंच जागेवर गेलो तर हीम वर्षाव ही पाहायला मिळतो. अशा बर्फाळी प्रदेशात सौदर्याला तर सिमाच नाही! लोकरीच्या कपड्यात लपेटून हीम वर्षावात नाचावं बागडावं. बर्फ गोळे एकमेकांवर फेकण्यात काय मजा असते हे ज्यांनी अनुभवलं त्यांनाच त्याची महती कळेल.

चला तर मग लागा तयारीला. जाऊ आपण भटकंतीला. पण फक्त एक कप कडक चहा पिवून निघुया.


*आला ऋतू हिवाळा*

*अंगी झोंबतो गारवा*

*अशा वेळेला मजला*

*गरमा गरम चहा हवा*


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational