अनुभव
अनुभव
अनुभव ही एक अशी वस्तू आहे, ज्यामुळे आपल्याला आयुष्यात यश मिळते, इज्जत मिळते. आजच्या या आधुनिक जगात आपण कोठेही गेलात किंवा कोठेही नोकरीसाठी अर्ज केला, तर पहिले अनुभव किती आहे हे विचारले जाते. आपण एखादी गोष्ट किंवा काहीतरी काम करायला गेलो तर काही वेळेस ते चुकते, नंतर आपल्याला अनुभव येतो, कळते की हे असं करायचंय व त्यानंतर आपण ते काम अगदी योग्य पद्धतीने करतो.
अनुभवामुळे आपल्याला आयुष्यात जगण्याचा एक साधा व सरळ मार्ग सापडतो, आयुष्याचा अर्थ कळतो.आयुष्य हे अनुभवाशिवाय जगणं कठीण आहे, मनुष्याला जेवढा जास्त अनुभव आहे तितका जास्त तो आयुष्य सोप्या पद्धतीने जगत असतो, तितका जास्त आनंद तो आयुष्य जगण्याचा घेत असतो. अनुभवाचा जर सोपा अर्थ बघितला तर कळेल की अनुभव म्हणजे जीवन जगण्याचा साधा - सोपा असा मार्ग.
तर तुम्हीही आयुष्यात काहीतरी अनुभवलेच असेल, अनुभवत असाल व अनुभवाला. त्या अनुभवाने तुम्हाला आयुष्य जगणं नक्कीच सोपं होईल...
