Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

अनपेक्षित माणूसकीचे दर्शन

अनपेक्षित माणूसकीचे दर्शन

3 mins
262


जीवनाच्या प्रवासात आपल्याला कधीकधी अचानकपणे देवमाणसे भेटतात. आपण मदत न मागताही आपल्याला अगदी निरपेक्षपणे मदत करतात. त्यांच्या चांगुलपणामुळे आपण भारावून जातो. कधी नाव विचारायचे राहते तर कधी धन्यवाद म्हणायचे राहते. अशा देवमाणसांना मनापासून वंदन करुन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखप्रपंच !!


माझ्या मिस्टरांना दुसऱ्या अँजिओप्लास्टीसाठी सांगितले तेव्हा CGHSच्या अंडर करायची असल्याने मुलगा यांच्याजवळ थांबला. मी त्या कसबा पेठेतील दवाखान्याजवळ आले पण कुठेच बोर्ड दिसेना. घाबरायला झाले. आता काय करावे कळेना. तेथील वयस्कर गृहस्थांना विचारले, "इथेच कसबा पेठ डिस्पेन्सरी आहे ना cghsची?"


"आपको मालूम नही क्या? वो डिस्पेन्सरी दारुवाला पूलके पास शिफ्ट हुई है..."


"किधर????" मी घाबरुन विचारले कारण मी एकटीच मिस्टर दीनानाथमध्ये त्यांना जहांगीरला शिफ्ट करुन लवकरात लवकर अँजिओप्लास्टी करायची होती. माझी मनस्थिती बघून ते सदगृहस्थ रिक्षात बसले. माझ्या डोक्यात असंख्य आवर्तने!!


बोळाबोळातला रस्ता रिक्षावाल्याला सांगून दवाखान्याजवळ आणले. "ये रहा आपका डिस्पेन्सरी"


मी बघू लागले. तेवढ्यात चटकन उतरुन हे मार्गाला लागलेले.


अडचणीत देवाच्या रुपाने माझ्या मागे उभे राहिले. अजूनही पांढऱ्या दाढीतील छबी माझ्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा नाव विचारायचे का धन्यवाद म्हणायचेही मला सुचले नाही पण आज या लेखाद्वारे जेथे असतील तिथे ते आणि त्यांचा परिवार सुखी असो असे दुवा देत आहे. न मागता केलेली मदत निश्चितच माणुसकीचे दर्शन देणारी होती.


दुसरा अनुभव दिल्लीतला. मला दिल्लीच्या cgda ऑफिसला जायचे होते. राजीनामा कॅन्सल करुन परत जॉईन व्हायचे होते. माझ्या मैत्रिणीचे A A O चे मित्र ग्रोसरीला होते त्यामुळे वरिष्ठांशी पर्सनली ओळख असते. त्यांनी 7.45ला त्यांच्या घरी बोलावले माझी केस समजून घेतली Acgdaना रक्तदान करुन वाचवल्याचे सांगितले. त्यावेळी अजित अगदी 2 वर्षाचा बाटलीने दूध पिणारा. त्या दयाळू बाईने दूध पाजायला दिले ते पिऊन झाल्यावर मी निघाले तेव्हा बहिणीच्या नात्याने बाटली मागितली मी... एकदम क्यों? असे विचारले...


"आप तो ऑफिसमें busy रहेगी कितना टाईम लगेगा पता नही मैं आपको बोतल भरके देती हूँ..."


मला इतके भरुन आले की मी काही बोलूच शकले नाही ओळख ना देख पण तिने अजितची एवढी काळजी केल्याचे बघून मन भरुन आले. मी धन्यवादही म्हणू शकले नाही.


माझी Acgda ना त्यांनी ओळख पटवल्याने मला लगेच आत सोडले माझे कामही झाले.


पण मार्गात भेटलेले हे देवदूतच मला उपयोगी पडले. या लेखाद्वारे त्या दांपत्याला मी मनःपूर्वक धन्यवाद देते व असतील तिथे सुखी असोत असे दुवाही देते.


माणुसकी ही गोष्ट जात धर्म पंथ समाज या सर्व सीमा ओलांडून जात असते. मला भेटलेली तिन्ही माणसे वेगळ्या धर्माची होती पण अनपेक्षित माणुसकीचे दर्शन देऊन गेली


मी बहिणीचा एक हृदयस्पर्शी अनुभव शेअर करीत आहे


मुंबईचा अफाट पाऊस आपल्याला माहितच आहे. माझी बहिण डोंबिवलीला राहायची. दुसऱ्या मुलीच्या वेळी 6वा महिना. जोरात पाऊस उघडी गटारे अशा अवस्थेत चार वर्षाच्या सोनाला घेऊन पाळणाघराकडे चालली होती. ती कॅशिअर होती. तिच्या व मँनेजरच्या दोन्ही किल्ल्या असल्या तरच लॉक उघडायचे. त्यामुळे एवढ्या पावसात बिचारी निघाली होती.


अचानकपणे एका वयस्कर माणसानी तिचा हात धरला व अधिकारवाणीने विचारले, "कुठे निघालात बाई एवढुशा मुलीला घेऊन?"


वैजू आश्चर्यचकित!! कारण कोणी समोर पडले तरी मुंबईच्या लोकांना थांबायला का विचारायला वेळ नसतो.


"माझ्याकडे किल्ल्या आहेत..."


"ते काही सांगू नका. आधी घरी चला. ही मुलगी वाहत्या पाण्यात घसरली तर काय करणार आहात?" त्यांनी सोनाला प्रेमाने धरले.


वैजू सोसायटीजवळ आल्यावर एकदम U turn मारुन झपाझप चालून गर्दीत मिसळली.


दिवसभर वैजूला आपले वडीलच आपल्याला व सोनाला वाचवायला आले असे वाटले. एवढ्या अधिकारवाणीने घरी चला असे वडीलच मुलीला सांगू शकतात. ती पण झाल्या प्रसंगाने पडत्या पावसात अवाक झाली. नाव विचारण्याचे का धन्यवाद देण्याचे भानच राहात नाही अशावेळी. या लेखाद्वारे मीच धन्यवाद देते आणि ते व त्यांचा परिवार सुखी असो असे दुवा देते.


दिव्यत्वाची जेथ प्रचिती

तेथे कर माझे जुळती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational