SANGRAM SALGAR

Drama

4.3  

SANGRAM SALGAR

Drama

अनोळखी प्रेरणा...

अनोळखी प्रेरणा...

5 mins
270


ही कथा आहे एका अनोळखी व्यक्तीची-


योगेश आणि कल्याणी एकाच महाविद्यालयात शिकत होते. जवळपास सहा महिन्यांहून जास्त दिवस कॉलेजचे निघून गेलेले. कॉलेजला आल्यापासून या दोघांची कधी भेट झाली नव्हती काय आश्चर्यकारक गोष्ट आहे. त्यांच्या तुकड्या वेगवेगळ्या होत्या त्यामुळे कधी हाय (HI), बाय (BYE) चा संबंधच आला नाही. म्हणतात चांगल्या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ लागतो त्याचप्रमाणे चांगली व्यक्तीही आपल्या आयुष्यामध्ये सहजासहजी येत नसते.


25 डिसेंबर 2019चा दिवस उजाडला. त्या दिवशी ख्रिसमस होता. सर्वीकडे आनंदच आनंद नांदत होता. प्रत्येक जण आनंदाचा आस्वाद घेत होता पण गरीब बिचारा योगेश मात्र दुःखी होता. योगेश गरीब कुटुंबातून आलेला मुलगा. त्याच्या परिस्थितीनुसार बराच संघर्ष करून तो एका चांगल्या कॉलेजला आलेला. त्याच्या माध्यमिक शिक्षणामध्ये मुलगी नावाचे पानच नव्हते, तो मुलांच्या शाळेमध्ये होता. त्याला मैत्रीही करणं कधीच जमलं नाही. जेव्हा कधी तो तात्पुरता मित्रांसमवेत समाविष्ट व्हायचा तेव्हा त्याला फक्त धोकाच मिळायचा. त्यामुळे योगेशने कॉलेजमध्ये आल्यानंतर मैत्री करण्याचे धाडस केले नाही. तिकडे कल्याणीही तशीच, तिलाही मैत्रीचं गणित कधी कळलेच नाही. तिलाही धोकाच मिळाल्यामुळे तिनेही धाडस केलेच नाही. कल्याणीही जेमतेम परिस्थितीमधून आलेली सर्वसाधारण मुलगी सरळ, साधी.


अशा या सारख्या स्वभावाचे हे दोन वर्गमित्र जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय होत असेल?


ख्रिसमसच्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती पण काही कारणांमुळे आज दोघे एकत्र येणार होते. कारण कॉलेजच्या एका कार्यक्रमाची तयारीचे होते. योगेशही तसा मुलींसोबत बोलायला घाबरतच होता. त्याला तशी सवयच नव्हती. धाडस करून योगेश आज पहिल्यांदाच मुलींना मदत करणार होता. पण तो खूपच निराश होता स्वतःला दोष देत होता. त्याचे त्यालाच त्याच्या आयुष्यात काय चालू आहे कळत नव्हते. नुकताच काही अडथळ्यांचे धक्के खाऊन बाहेर आलेला. मदत करताना त्याच्या तोंडून त्याचे प्रश्न बाहेर पडायला लागलेले. त्याने कदाचित आज मन मोकळं करायचं ठरवलेलं कारण त्याच मुलींनी असा निश्चय केला की आज याच्या अडचणी सोडवायच्या आहेत. योगेशलाही विश्वास बसत नव्हता. मनात थोडी भीती होतीच पण त्याच्या व्यक्तीमत्त्वापुढे ती काहीच नव्हती. तो स्वतःलाच प्रेरणा द्यायचा आणि संघर्ष करण्यासाठी सांगायचा, पण आज त्याला कोणाच्यातरी मदतीची गरज भासत होती. त्या मुलीही योगेशच्या प्रश्नांची उत्तर द्यायच्या तर काहींना त्याचे प्रश्न बिनकामी आणि फालतू वाटायचे. पण योगेशलाही काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळालेली. त्याला सत्याची जाणीव होत होती. कल्याणी मात्र शांत होती. ती योगेशचे सर्वकाही ऐकून घेत होती तसेच त्या मुलींचे सल्लेही.


कल्याणीलाही योगेशला मदत करू वाटायची पण एका अनोळखी माणसासोबत संवाद कसा साधायचा हा तिच्यासमोर प्रश्‍न होताच. पण तिने कशाचाही विचार न करता त्याला सल्ले द्यायला चालू केले. योगेश तिच्याकडे लक्षच देत नव्हता. पण कल्याणीच्या शब्दांमध्ये एक वेगळी जादू होती. तिचे शब्द एखाद्याला पेटून उठण्यासाठी मदत करत होते. तिचे तसे बरेच सल्ले योगेशला लाभले. त्यांपैकी योगेशला भावलेलं वाक्य म्हणजे सूर्य, चंद्र जरी विश्वव्यापी असले तरी त्यांना ग्रहण लागतेच ना मग आपण कोण आहे? तिचं हेच एक वाक्य योगेशच्या आयुष्याच्या वळणावरचं खूप महत्त्वाचं ठरलं. योगेशला कल्याणीच्या या अनोख्या व्यक्तिमत्त्वावर आणि शब्दसंपत्तीवरती विश्वासच बसत नव्हता. त्याला तीन तास कसे गेले समजलेच नाहीत. कार्यक्रमाची पूर्वतयारी झाल्यानंतर सर्वजण आपापल्या मार्गाने जात होते. योगेश आणि कल्याणीचा रस्ता एकच होता त्यामुळे खूप नशीबवान होता. कारण त्याच्या सोबत अशी एक व्यक्ती होती की ती योगेशला अंधारामधून बाहेर आणण्यासाठी देवाने जणू तिला देवदूत म्हणूनच पाठवली होती असं म्हणायला काय हरकत नाही. रस्ता चालत असतानाही कल्याणीने योगेशला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली. योगेशलाही खऱ्याअर्थी त्याच्या चुकांबद्दलची जाणीव झालेली. दोघांची तशी बर्‍यापैकी ओळख झालेली. कल्याणीनेही तिच्याबद्दल सांगितले होते. कदाचित दोघांचीही विचारसरणी सारखीच होती आणि दोघांचेही अंतिम ध्येय सारखेच होते पण रस्ते मात्र वेगळे होते. कदाचित काही दिवसानंतर तेच रस्ते दोघांना वेगळे करणार होते पण त्या दोघांनीही त्यावेळी काहीच विचार केला नाही. एकमेकांना भेटले की दोघे एकमेकांचे प्रश्न समजून घेऊन तोडगा काढत होते. योगेशने त्याच दिवशी कल्याणीच्या विचारांना फॉलो करण्याचे ठरवलेले.


दुसऱ्यादिवशी कार्यक्रमाच्यावेळी दोघेही एकाच बेंचवर बसून कार्यक्रमाचे चोखपणे काम करत होते. त्यावेळी त्या दोघांच्या विचारांचे आदानप्रदान नकळत होत होती. दोघांचाही दोघांवरती विश्वास बसत नव्हता.


चार-पाच दिवस निघून गेले पण कधीही भेट नाही. एकाच कॉलेजमध्ये शिकत असून. तसंच 2019 हे वर्ष संपून गेलेलं. नवीन वर्ष लागलेलं सर्वजण जल्लोषात होते पण योगेशला काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते, खऱ्याअर्थी ती कल्याणीच होती. पण तो कल्याणीला समजल्यामधला भाग नव्हता. नववर्षादिवशी योगेश घरी जाणार होता पण तरीही त्याच्या चेहर्‍यावरती हसू नव्हते. रस्ता चालत असतानाच अचानक आश्चर्यकारक गोष्ट उभी राहिली ती म्हणजे कल्याणी होती. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.


आज ती खूपच वेगळी दिसत होती जणूकाही परीच. तिचे ते मोकळे केस मनाला बेभान करुन टाकत होते. तिच्या पाणीदार डोळ्यामध्ये सर्व काही होते जे योगेशला सांगायचे होते. तिने योगेशला नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. योगेशच्या या वर्षातली पहिली मुलगी कल्याणी होती जिने त्याला शुभेच्छा दिलत्या त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी. तिने त्याचा मोबाईल नंबर घेतला त्या वेळेस योगेशला काहीच समजत नव्हते काय चालू आहे. त्याच्या दृष्टीने तसे ते स्वप्नच आहे असंच वाटत होतं. त्याच स्वप्नात त्याने तिला मोबाईल नंबर दिला. आणि आपला प्रवास चालू केला. तीही तिच्या मार्गी गेली.


पण आता योगेशचे आयुष्य बदलणार हे नक्की होते. तो काय खुश त्यालाच माहित. आणि असंच त्याचं व्हाट्सअपद्वारे संवाद चालू झाला.


योगेशलाही त्याच्या आयुष्यामध्ये त्याचप्रकारे कल्याणीलाही कोणाशीतरी आपल्या भावना सांगण्यासाठी हक्काचे व्यासपीठ भेटायला लागल्याची जाणीव होत होती. असंच त्यांच्या संवादाचं मैत्रीत रुपांतर कसं झाले समजलेच नाही. त्यांचं एका घट्ट मैत्रीतच रुपांतर झालेलं. एकमेकांना ते चांगलंच ओळखायला लागलेले. खरे आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप अनोळखी व्यक्ती येतात आणि त्यांचं मैत्रीत रूपांतर होतं.


योगेशची आणि कल्याणीची मैत्री आता अबोली आणि अनोळखी राहिलेली नव्हती. ते कॉलेजला आले की एकमेकांशी संवाद साधायचे. दोघेही खूप खुश होते पण, अचानक त्यांच्या मैत्रीला कोणाचीतरी नजर लागली. मग नंतर काय तो तिला ब्लॉक करायचा तर कधी ती त्याला. त्या दोघांची सतत भांडणं व्हायची कोणत्याही कारणावरून. पण कालांतराने ते पुन्हा समजूतीने मित्र-मैत्रिणी झाले. त्यांच्या विचारांची अदलाबदल झाली. मने जुळायला लागली. कल्याणीही योगेशला वेगवेगळ्या परीक्षांबद्दल विचारायला लागली.


दोघेही मराठी साहित्य क्षेत्रामध्ये पारंगत होते. त्यांच्या लेखणीबद्दलही खुश होते. आज त्यांच्या मैत्रीचा 78 वा दिवस होता. दोघेही कॉलेजमध्ये भेटले. वाचनालयासमोर अभ्यासाच्या नावाने बसलेले पण गप्पा जास्त अन् अभ्यास कमी. त्यात त्यांच्या मैत्रीला अजून एक कारण आडवे येत होते ते म्हणजे मोबाईल. आज योगेशला कल्याणीमध्ये झालेला बदल बरोबर वाटत नव्हता. त्याने कल्याणीला खूप सल्ले दिले पण मोबाईल आणि तिचा ATTITUDE मध्ये येत होता. पण त्यांची मैत्री घट्ट होती. पण जास्त दिवस टिकणार नव्हती. अल्पायुषी होती. त्यांच्या मैत्रीचा THE END झाला. दोघेही आपल्या मार्गावर गेले आपल्या आपल्या ध्येयप्राप्तीसाठी, पण मनात होतीच ती मैत्री...


तात्पर्य : आपल्या आयुष्यात अशा खूप व्यक्ती येतात. ते दीर्घकाळ आपल्या हृदयात जागा करून राहतात. काहीजण प्रेरणा देतात तर काही धोके. प्रत्येक मैत्री करताना आपण आपल्या हृदयाचा आवाज ऐकला पाहिजे आणि तो प्रत्येकाला ऐकू येतो...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama