Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Rahul Borde

Comedy Others

4.9  

Rahul Borde

Comedy Others

अंधारी रात्र आणि सर्पमित्र

अंधारी रात्र आणि सर्पमित्र

3 mins
929


एकत्र कुटुंब पद्धतीत जगणाऱ्या त्या घरात १० सदस्य सुखाने एकत्र नांदत होती. आज्जी-आजोबा, दोन मुले, सूना आणि नातवंड असा १० सदस्यांचा परिवार होता. घर खूप प्रशस्त असल्या कारणाने एकत्र कुटुंब असूनही प्रत्येकाला स्वतंत्र अशी जागा उपलब्ध होती. एका संध्याकाळी जेवणासाठी सर्व सदस्य एकत्र जमले असताना नको असलेल्या एका पाहुण्याचे अचानक आगमन झाले होते. हा पाहुणा होता धडकी भरवणारा मोठा साप. अचानक प्रकट झालेल्या त्या सापाला बघून घरातील सर्वांची एकच तारांबळ उडाली आणि धावपळ सुरू झाली. बघितलेला साप विषारी होता की बिनविषारी हे ओळखण्याचे ज्ञान घरातील कोणत्याच सदस्याला न्हवते. त्यामुळे जवळ जाऊन सापाला पकडण्याची किंवा ठार मारण्याची हिम्मत कोणातच निर्माण होत नव्हती. अडचणीची गोष्ट म्हणजे सापही स्वयंपाक घरात ओट्याखाली जाऊन किचन ट्रॉली मध्ये लपला होता. रात्रीचे आठ वाजले होते आणि सापाला पकडले नाही तर घरात झोपणेही अवघड आहे हे ओळखून एका सदस्याने पटकन सर्प मित्राला फोन केला. धावत-पळत आलेल्या सर्प मित्राला एका सदस्याने किचन ट्रॉलीची जागा दाखवली जिथे साप लपला होता. सर्प मित्र किचन ट्रॉली जवळ आणि बाकी सदस्य २५ फूट लांब असे काहीसे वातावरण तिथे तयार झाले होते. चुटकी सरशी साप पकडणाऱ्या त्या सर्प मित्राची त्या दिवशी अडचणीच्या जागी लपून सापाने भली मोठी अडचण निर्माण केली होती. साप विषारी की बिनविषारी हे लक्षात यायलाच त्या दिवशी सर्प मित्राला बराच वेळ लागला. नशिबाने तो बिनविषारी साप होता.

किचन ट्रॉली मध्ये लपलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी सर्प मित्राला चांगली तासभर मशागत करावी लागली. मोठ्या मुश्किलीने आपले नेहमीचे कौशल्य वापरून सर्प मित्राने त्या सापाला आपल्या हातात पकडले. साप पकडला तरीही घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावरील भिती कमी झालेली दिसत न्हवती कारण साप आकाराने बराच मोठा होता. तीच भिती दुर करण्यासाठी सर्प मित्राने त्या सापाची प्रजाती आणि बिनविषारी पनाचे गुण सर्वांना समजावून सांगितले. सर्प मित्राने ज्या पद्धतीने हातात साप पकडला होता त्याच पद्धतीने घरातील एका ज्येष्ठ सदस्याला तो पकडण्याची विनंती केली. पण सर्वांच्या मनातील भिती घालवण्यासाठी बहुदा हे पुरेसे नसावे. कुत्र्यापासून सावध रहा अशी पाटी लावलेल्या घरातील कुत्रा भलेही चावणारा नसला तरीही आपल्याला त्याची भिती वाटतेच ना. इथेही साप बिनविषारी असला तरीही सदस्यांच्या दृष्टिकोनातून तो भीतीदायक वाटत होता. सदस्यांची हि भिती दुर करण्यासाठी सर्प मित्राने सापाला जमिनीवर मोकळे सोडून परत हातात पकडून दाखवायचे ठरवले. पण त्याच्या पराक्रमाचा हा चांगुलपणा भलताच अंगलट येणारा ठरला. कारण सापाला जमिनीवर सोडण्याचा आणि घरातील लाईट जाण्याचा एकच योग आला. अचानक निर्माण झालेल्या अंधाराने खुपच गोंधळ उडाला. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. साप कुठे आणि घरातील सदस्य कुठे याचा काहीच मेळ लागत नव्हता. सगळ्या सदस्यांचे ब्लड प्रेशर वाढायची वेळ आली होती. अंधारात धक्का लागून काही महागाच्या वस्तु खाली पडून फुटल्या होत्या. सर्पमित्र शांत राहण्याचे आव्हान सगळ्यांना करत होता पण खरे सांगायचे तर त्याला पण घाम फुटला होता. साप अंधारात परत कुठे गायब होऊ नये ही भिती सर्प मित्राच्या मनात होती. आणि झाले पण तेच. लाईट २ मिनिटात परत आली होती पण साप आणि घरातील सर्वच सदस्य गायब झालेले दिसत होते. घरातील सदस्य तर परत आले पण गायब झालेला साप न सर्प मित्राला सापडला न घरच्यांना. थोड्या वेळापूर्वी सर्प मित्राला इनाम म्हणून देण्यासाठीची खिशातून काढलेली दोन हजारांची नोट परत खिशात गेली होती. घराचा एकंदरीत अवतार आणि सर्व सदस्यांचे त्याच्याकडे बघणारे चेहरे बघून सर्प मित्राला आता सापापेक्षा स्वतःची जास्त चिंता वाटू लागली होती. साप तर परत सापडला नाहीच पण सापाची चर्चा मुद्यावरून गुद्यावर येणे बाकी राहिले होते. ती रात्र घरातील सर्व सदस्यांनी पूर्ण प्रकाशात उभे राहून जागून काढली. पुढे सर्प मित्राचे काय झाले? होणार काय त्याने पण रात्र जागून काढली पण स्वतःच्या न्हवे तर त्यांच्या घरात.


Rate this content
Log in

More marathi story from Rahul Borde

Similar marathi story from Comedy