अलक (आईची थोरवी)
अलक (आईची थोरवी)
आज मात्र अगदी निशाची तारांबळच उडाली, बाबांना, दादाला चहा, कॉफी, करून देऊन तसचे गडबडीत भराभरा स्वयंपाक करून आणि आज भांडीवली मावशीबाई येणार नव्हती म्हटल्यावर तर बिचारी निशा पडलेली सगळी भांडी घासून आणि व्यवस्थित लावून, सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून देऊन आणि धुणं धुवून ते वाळत टाकून, गडबडीत सोफ्यावरच सॅक पाठीला टाकून, थोडे फार विस्कटलेले केस नीट करत करत घराच्या बाहेर आली आणि तिच्या डोक्यात आज विचार आला की खरंच आई एक दिवस घरात नसली की कसं सगळं चित्र बदलतं, आई आपली देखभाल करते म्हणून आपण आपलं काम व्यवस्थित करू शकतो.. तिने आईला फोन लावला व आई तू कधी येणार आहेस म्हणून 4 दिवस माहेरी गेलेल्या आईला कळकळीने विचारलं...
