विराज होस्टेल - एक गूढ रहस्य
विराज होस्टेल - एक गूढ रहस्य
मी, गौरव आणि अक्षय आम्ही तिघेही पहिल्यांदाच होस्टेल वर राहणार होतो....तसे आम्हाला होस्टेल चा एवढा अनुभव नव्हता. आम्ही तिघेही एकाच कोर्सेस चे आणि त्यातच आम्हाला पुण्यासारख्या मोठ्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळाल्याने आम्ही खुश होतो. काकांनी पहिल्याच दिवशी आम्हा तिघांच्या राहण्याची सोय विराज होस्टेल मध्ये लगेच करून दिली. आणि आम्ही तिघांनी शेअरिंग मध्ये रूम 5 व्या मजल्यावर घेतली.
आम्ही सगळे सामान आवरुन ठेवले. दिवसभर फेरफटका मारला आणि होस्टेल च्या नवीन आलेल्या मुलांसोबत मैत्रीही झाली. रात्री आम्ही तिघेही जेवण करून झोपलो. पहिलाच दिवस असल्यामुळे आम्हाला झोपच येत नव्हती. रात्रीचे 10 वाजता आम्ही झोपलो. थोडा वेळ झाला आणि अचानक दरवाजा जोरजोरात कोणीतरी वाजवु लागले. आम्ही गाढ झोपेत होतो. अक्षय मध्यरात्री उठला आणि एवढ्या रात्री कोण दार वाजवतय पाहायला गेला. तोच दरवाजा बाहेरून आवाज आला " मला कोणीतरी वाचवा, मला कोणीतरी वाचवा "
अक्षय कोणलाही घाबरत नव्हता त्यांन दरवाजा उघडला मात्र दरवाजात कोणीही नव्हते . तो आवाज कोनाचा होता हे पाहण्यासाठी तो पुढे गेला. पन कोणीच नव्हते . कदाचित भास झाला असेल म्हणून तो मागे वळला तोच त्याला एक मुलगा आपल्याला बोलावत आहे असे जाणवले. आणि हळूच कानात आवाज ऐकू आला " अक्षय इकडे ये " तो आवाज एका मुलांचा होता. अक्षय त्याला म्हणाला " एवढ्या रात्री इथे कसकाय आणि तुला माझे नाव कसे माहिती . याआधी मी तुला कधीच पाहिले नाही. तोच तो मुलगा म्हणाला " हो , मी याच होस्टेल चा आहे. मला तुला काहीतरी सांगायचे आहे. अक्षय म्हणाला हो सांग .....तो म्हणाला मी होस्टेल ला येऊन काहीच दिवस झाले होते मी येथे नवीनच होतो. जसे जसे दिवस पुढे गेले तसे काही मुले मला त्रास देऊ लागली. माझ्यावर रँगिंग करत होते. माझ्याकडून नाही नाही ती कामे करून घेत होती. मी तक्रार केली असती तर त्यांनी मला सोडले नसते. मी त्यांच्या त्रासाला वैतागून गेलो होतो. सांगता सांगता मध्येच तो थांबला. अक्षय ऐकत होता आणि तो त्याला विचारायला त्याच्याकडे पाहिले आणि अक्षय ची वाचाच बंद झाली कारण तेथे कोणीही नव्हते. अक्षय एकटाच चालत होता. तर तोच मुलगा पुन्हा समोर दिसला आणि पाहतो न पाहतो त्या मुलाने वरून खाली उडी टाकली आणि एक मोठी भयानक किंचाळी दिली. समोर काय घडतय याचा अक्षय च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ते पाहून त्याला अंगात ताप आला आणि तो तिथेच बेशुध्द पडला.
आम्ही अक्षय ला सकाळी बाहेर पाहिले आणि त्याला रुम मध्ये आणले. त्याला पाणी दिले. अक्षय ने रात्रीचा प्रसंग आम्हाला सांगितला . तोच आम्हाला दरदरून घामच फुटला. ही सगळी घटना आम्ही तेथील केअर टेकर ला सांगितली. केअर टेकर म्हणाला साधारणतः 2 वर्षापूर्वी तुम्ही ज्या खोलीत राहता त्या खोलीतील एक मुलानी टेरेस वरून उडी मारली होती... आणि त्यानी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर जो त्या रुममध्ये असतो त्याला प्रत्येकाला हा अनुभव आला आहे. पण त्या मुलांच्या आत्महत्येच कारण कोनालाच माहिती नाही. परंतु अक्षय ला ते कळले होते.
त्या दिवसानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही ती रुम आणि ते होस्टेल सोडले. आणि त्या घटनेनंतर आम्ही पुन्हा कधीच त्या होस्टेल ला गेलो नाही. आम्ही होस्टेल सोडले पन आम्ही ती घटना विसरू शकलो नाही. आम्ही ठरवले की त्या मुलाला न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि जे कोणी यात दोषी आहेत रँगिंग करणारे त्यांना धडा शिकवणार . त्या नंतर कोणताही विद्यार्थी रँगिंग ला बळी पडणार नाही. आणि रँगिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांना फासावर लटकवणार.
या घटनेचा तपास करण्यासाठी अँन्टी रँगिंग स्कॉड आणि पोलिस फोर्स व काही स्पेशलिस्ट बोलावले. स्पेशलिस्ट पोलिसांनी होस्टेलच्या मागील 2 वर्षातील सगळ्या मुलांची यादी व सगळे CCTV फुटेज चेक केले . आणि त्या मुलाला त्रास देणारे 15 मुले समोर आली. प्रत्येक मुलाला त्या त्या ठिकाणच्या पोलिसांनी अटक केली. आणि काही दिवसांनी कोर्टात कारवाई सुरू झाली.... सगळे CCTV फुटेज साक्षी ठेऊन. पुरावे देऊनही कोणताच मुलगा गुन्हा कबुल करायला तयार नव्हता. पण शेवटी न्यायालयाने त्यांचे सर्व गुन्हे सिद्ध करून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना फाशी देण्यात आली.
आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाला न्याय व दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी डोंगर उभा केला. आणि शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि या नंतर जो कोणी रँगिंग करण्याचा विचार करील.... त्याला आता फक्त फाशीच होईल. ही घटना सगळ्या रँगिंग करणाऱ्या मुलांसाठी एक शिक्षाच होती. आजही आपल्या देशात कित्येक जण रँगिंग ला बळी पडतात. त्यासाठी आत्महत्या हा मार्ग नसुन आपण पोलिसांचा सहारा घ्यावा . पोलिस आपल्या रक्षणासाठी , न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र आहेत.
अशा पोलिसांना (सदरक्षणाय खलनिग्रहणाय) व न्यायव्यवस्थेला (सत्यमेव जयते) यांना जय हिंद......।।

