Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

kishor zote

Inspirational


5.0  

kishor zote

Inspirational


अजची पीढी संस्कारक्षम आहे का?

अजची पीढी संस्कारक्षम आहे का?

2 mins 3K 2 mins 3K

आजची पीढी संस्कारक्षम आहे का? याचे उत्तर 'हो!' असेच आहे. कोणतीही पीढी असंस्कारक्षम नसते. चूका घडतात त्या आमच्याकडून जुन्या पीढीकडून नव्या पीढीकडे जो वारसा दिला जातो तो देतांना आम्हीच कुठेतरी कमी पडत आहोत.

      शालेय जीवनात चांगले संस्कार शाळेत केले जातात. त्या वयापर्यंत तो मुलगा चांगला वागतो मात्र पूर्व प्राथमिक शिक्षण झाले की असे काय घडते? ज्यामुळे ही मुले असे असंस्कृत वागतात.... टीन एज ज्याला म्हणतो त्याच वयात या अशा अघटीत गोष्टी घडत आहेत. आत्महत्या , व्यभीचार अशा घटना घडताना दिसतात. पेपरमधे अशी बातमी एक तरी असतेच......

       खोलवर विचार केला तर आजचे वातावरण काहीशे जबाबदार म्हणावे लागेल. मी , माझी बायको व माझी दोन मुले ही चौकट प्रत्येक कुटुंब तयार करत आहे व या चौकटीच्या बाहेर मला काही घेणे देणे नाही असे विचार समाजात रुजत आहेत. आज समाज अशा चौकटीत बंदिस्त झाला आहे, हेच खरे दुःख आहे. भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी कामावर जाणे घरी कोणी मोठी व्यक्ती नाही. घर या मुलांच्या भरवशावर धाक नाही. कोणी बाहेरचे बोलले तर तुम्हाला काय? या प्रतिप्रश्नामुळे कोणीच काही बोलत नाही, त्या मुळे स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला जातो व अशा वाईट घटना घडतात. या बाबी गंभीर रूप धारण करत आहेत.

     शाळा किती वेळ संस्कार करणार? बाहेर निघाल्यावर संस्कार करणारी व्यक्तीच नाही. शहराच्या बंद द्वार संस्कृती मुळे खऱ्या संस्काराचे द्वारे देखील आपण बंद केले आहेत. बंद व्दार आत काय घडते हे फक्त त्या चार भींतींनाच ठावूक. अशा वेळी मग खापर फक्त या पीढीवर फोडणे कितपत योग्य होईल याचा देखील विचार व्हावा.

      आज घरातल्या व्यक्तींना एकमेकांशी बोलायला सवड नाही तर संस्कार काय करणार. बालवयात घडणाऱ्या आत्महत्या व सज्ञान नसताना घडणाऱ्या लैंगिक बाबी सर्वच मन बधीर करतात. मानसीक विकास व भावनिक वाढ नको त्या पध्दतीने घडत आहे.

     नको त्या गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने तुम्ही आम्ही काय करणार? जाग त्यालाच येते ज्या घरात या घटना घडतात बाकीच्यांना काही घेणे देणे नसते. परंतु आज शेजारचे घर जळले ते जर वेळीच विझवले नाही तर ती आग आपल्या घराची देखील राखरांगोळी करेल.....

     त्यामुळे आपण वेळीच जागृत होवून संस्कार पुढे दिले पाहिजेत, सदोदीत..... पुढच्या संस्कारक्षम पीढी साठी.


Rate this content
Log in

More marathi story from kishor zote

Similar marathi story from Inspirational