sourav shivsharan

Action Tragedy

2.9  

sourav shivsharan

Action Tragedy

अहंकार आणि प्रेम

अहंकार आणि प्रेम

2 mins
9.5K


  मानव जेव्हा या धरतीवर जन्म घेतो तेव्हाच त्याला अडीच अक्षरी शब्दाची ओळख होते. तो अडीच अक्षरी शब्द म्हणजे "प्रेम"! त्या शब्दाची ओळख होताच;त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याची आस लागते आणि ती लागलेली आस तो पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो. प्रियकर प्रेयसिकडून किंवा प्रेयसी प्रियकराकडून हि प्रेमाची आस भागवण्याचा प्रयत्न करतो. काहीजणांना यात यश आले तर काहीजणांना अपयश. त्यामागे बरीचशी कारणे असू शकतात. त्यातील एक कारण म्हणजे माणसात असणारा "अहंकार".

     या अहंकारामुळे भले-भले चारिमुंडया चित झाले आहेत. हे आपण जाणून असून देखील त्याचा विचार करण्याचा आपण कित्येकदा टाळतो. ज्येष्ठ व्यक्तींच्या म्हणण्याप्रमाणे ज्या व्यक्ती अहंकारी असतात त्यांना या जगात कोणाकडून प्रेम मिळू शकत नाही. न् त्या अहंकारी लोकांनी प्रेमाची अपेक्षा देखील करू नये. ज्या अहंकारी लोकांना प्रेमाची अपेक्षा असते त्यांनी एकतर अहंकार सोडावा नाहीतर लोकांच्या प्रेमाला तरी मुकावे लागते. खरंच सांगायचे तर माणसाच्या अहंकारावर प्रेमामुळे मोठा घाव पडतो त्यामुळे ही अहंकारी माणसे प्रेमाला घाबरून असतात. या प्रेमामुळे सगळ्यात जास्त त्रास; ज्यांचा अहंकार कठोर असतो त्यांनाच होतो. ह्या अहंकारी व्यक्तींची आक्रमकता फक्त जगण्यासाठी उपयोगी पडते, लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी नाही. ते आक्रमक असल्यामुळे या व्यक्ती प्रेमचं करू शकत नाहीत. एखादी स्त्री पुरुषाच्या किंवा एखादा पुरुष स्त्रीच्या प्रेमात पडतो त्यावेळी त्यांना आपला अहंकार वाहत्या गंगेत सोडून द्यावा लागतो. कारण प्रेमाचा घाव हा पहिल्यांदा अहंकारावरच पडतो.

     खरंतर या प्रेमाचा अर्थच असा आहे की, मी दुसऱ्याला माझ्यापेक्षा जास्त मूल्यवान मानतो; तो किंवा ती म्हणजेच मी आहे. माझं सुख आता गौण आहे. दुसऱ्याचे सुख माझ्या सुखापेक्षा जास्त महत्वाचं आहे. माझा वेळ तोच, तिचा किंवा त्याचा वेळ. गरज पडलीच तर दुसऱ्याला वाचविण्यासाठी स्वतःला पूर्णपणे मिटवण्यासाठी तयार असणे हेच प्रेम असतं. या सर्व गोष्टीत अहंकाराला कुठेच जागा मिळत नाही. प्रेमात आपला अहंकार पूर्णपणे पणावर लावावा लागतो त्यामुळे अहंकारी व्यक्ती या प्रेमाच्या भानगडीत पडतच नाहीत.

   आणि या अहंकारी व्यक्तींच्या किती नादी लागायचे, ते ज्याचे त्याने ठरवावे. कारण या व्यक्ती आपले स्वतःचे विचार आपल्यावर थोपण्याचे काम करत असतो. तो जो बोलत असतो ते आपल्या सहज-सुंदर मनाला पटत नसते मात्र आपण जे करत आहोत ते चूक आहे;पाप आहे. एवढी तरी भावना तो आपल्यात निर्माण करतोच; आणि नकळतच आपल्यात एक प्रकारचा अपराधी भाव निर्माण होतो. आपण जे करत असतो ते आपण कधीच सोडून देऊ शकत नाही पण ते करताना आपल्याला अपराधी वाटायला लागतं. या अश्या गोष्टींमुळे आपण प्रेम करायचे थांबत नाही. प्रेम हे चालूच असतं;पण त्या प्रेमातून मिळणारं सुख थांबतं या अपराधी भावनेमुळं. एक गोष्ट राहिलीच, बंधनाचा विचार करू पाहणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे प्रेमाचा जन्म हा बंधनात नाहीतर स्वातंत्र्यात होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action