बेस्ट फ्रेंड
बेस्ट फ्रेंड


आतापर्यंत *बेस्ट फ्रेंड* हि संकल्पना कळून चुकली का कळली म्हणून चुकली??? हेच कळत नाहीये. आपण कितीही चांगले वागून बेस्ट होण्याचा प्रयत्न केला तरी पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या तर ठीक नाहीतर त्या बेस्ट होण्याला काहीच फायदा नाही. Best friend चे बऱ्याच वेळा पुढे कौतुक होत नाही मागे जास्त कौतुक होते ;आणि असेच व्हायला पाहिजे. (नाहीतर पुढे गोड बोलून मागे शिव्या देण्यात काहीच त्याला अर्थ नाही)
बेस्ट फ्रेंड ची व्याख्या बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या असतात. *आपली प्रत्येक गोष्ट समजून घेऊन त्या गोष्टीला योग्य आणि positive reply देऊन त्या गोष्टीचे योग्य ते समर्थन करून आपल्याला योग्य अशी मदत जो करतो तोच आपला बेस्ट फ्रेंड (hero of life)...* अशी व्याख्या माझी आहे.
पण तो बेस्ट फ्रेंड एका ठिकाणी सगळ्यांना (म्हणजे खास मुलींच्याबाबतीत) नडतो. ती गोष्ट म्हणजे *प्रेम*.... त्याने जर चुकून तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रेम केले तर तो गुन्हा झाला लगेच... हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?? अरे त्यालाही मन आहे, हृदय आहे, भावना आहेत...का बेस्ट फ्रेंड म्हणून नुसत्या तुमच्याच भावनांची कदर करत बसायची?... बरं बेस्ट फ्रेंड म्हणजे काही "भगवान" नाही कि चूक हि होणार नाही. शेवटी तोही माणूसच ना!!? त्यालाही समजून घेतले पाहिजे कधीतरी , त्याला त्याचीही चूक दाखवली पाहिजे, (तुम्ही त्याला फ्रेंड मानता न् मग तो चिडेल म्हणून त्याची negative गोष्ट सांगायची नाही; असे नाही न होत यार...) त्यालाही प्रेम करण्याचा अधिकार आहे, हे कुठेतरी लक्षात घ्यायला हवे. बरोबर आहे ह्या वयात खूप साऱ्या गोष्टीची चिंता असते. अभ्यास, मित्र-मैत्रिणी,जोडीदार आणि घरचे...ह्या सर्वांचा विचार करून आपल्याला वागावे लागत असते. पण हे वय ते वयच!! जे व्हायचे ते होतेच!!!... *कर्ता करविता* खूप वाईट आहे तो...
मित्रांनो, खूप काही बोललो आणि खूप काही बोलायचे होते पण नको आता भरपूर झाले! फक्त आपण समाधानी रहायचे कि आपण बेस्ट फ्रेंड आहोत कोणाचेतारी म्हणून...बस...!