Ajay Nannar

Horror Thriller

2.8  

Ajay Nannar

Horror Thriller

अभुतपुर्व......

अभुतपुर्व......

4 mins
170


हि घटना 18 सप्टेंबर 2020 मध्ये माझा भाऊ पार्थ सोबत घडली आहे आणि आज तो त्या घटनेनंतर या जगात नाहीये......पार्थ हॉटेलमध्ये कामाला होता आणि त्याची नाईट ड्यूटी होती. होटेल मधली शेवटची ऑर्डर आणि आता होटेल पन बंद होणार होते. पार्थ ला घरी जायचे होते पन मालकाने शेवटची ऑर्डर म्हणून जा आता आणि रात्रीचे 12 वाजले होते. पार्थ ने विचारले कुठे करायची आहे डिलिव्हरी . मालकांनी ऑर्डर फोन वरुन आल्यामुळे एक पत्ता लिहला होता. तो पत्ता हातात देत म्हणाले या पत्त्यावर जा. तसा पार्थ बर्गर घेऊन गेला मात्र त्या पत्त्यावर कोणीच नव्हते. पार्थने दहा वेळा कॉल लावला पन नंबर लागेना. लांबुनच एक मुलगा पार्थ ला हात करताना दिसला....कदाचित हि त्या मुलाची ऑर्डर असावी म्हणून पार्थ द्यायला गेला. जागा खुपच लहान होती. पार्थ त्या मुलाजवळ गेला पन तेथे कोणीच नव्हते. पार्थला वाटले कदाचित भास झाला असेल . आणि अचानक कसला तरी आवाज येऊ लागला....पार्थ ने गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पन गाडी चालू होतच नव्हती. असे कसे होईल सकाळीच तर टाकी फुल केली होती. पार्थने पळण्याचा प्रयत्न केला पन पळताही येत नव्हते. कोणत्या तरी द्रुष्ट शक्तीने आपल्याला पकडून ठेवले आहे असे त्याला जाणवले. पार्थने "मला वाचवा,मला वाचवा " म्हणून खुप हाका मारल्या पन प्रयत्न व्यर्थ. कदाचित हा त्या द्रुष्ट शक्तीचा प्रदेश असल्याने आपल्याला काहीच करता येणार नाही हे त्याला कळून चुकले. आणि तो देवाचा धावा करू लागला. पन अचानक त्याला कोणीतरी मारल्याचे जाणवले आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. पार्थ थोड्या वेळाने परत उठला आणि आता त्याला ती वाईट शक्तीची सिमा ओलांडायची होती पन त्या असुरी शक्तीची ताकद एवढी होती की त्या शक्तीने पार्थला मारून टाकले.


   दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली पार्थचा म्रुत्यु झाला. पन पार्थचा म्रुत्यु मागे नक्कीच काहीतरी षडयंत्र असणार हे आम्हाला ठाऊक होते. पार्थचा असा म्रुत्यु हे आता एक रहस्यच बनले होते.

मी आणि माझे तीन मित्र एकदंत, शुभम, भैरव. आम्ही या रहस्याचा शोध घेण्यासाठी निघालो. भैरव ला आम्ही मुद्दामच घेतले कारण तो भुतांना उडविण्यात पटाईत होता. आणि तो डिटेक्टीव देखील होता.


गोष्ट होटेल पासुन सुरू झाली ना आधी होटेल मध्ये जाऊ . एकदंत भैरव ला म्हणाला, भैरव गाडी होटेलकडे घे....पोहचायला 2 तास होते. आधीच रात्र झाली आहे आणि त्यातही भैरव हळू गाडी चालवत होता. शुभम म्हणाला , अरे भैरव गाडी एवढी स्लो का चालवत आहे. भैरव म्हणाला माहिती नाही रे पन गाडीचा स्पीड वाढतच नाही रे. भैरव म्हणाला , कदाचित त्या शक्तीने आपल्याला घेरले असावे. भैरव अस तस करत गाडी चालवण्याचा प्रयत्न करीत होता. हळू हळू अचानक गाडीला वेग येऊ लागला. भैरवने गाडी जोरात सुरू केली. पन ज्यावेळी गाडी सुरू केली त्यावेळी भैरव ला भुतांची रांग त्याच्या गाडी समोरून येताना दिसली. भैरवने सगळ्यांना डोळे बंद करायला लावले. आणि म्हणाला काहीही पाहू नका आणि गाडीच्या काचा बंद करा. 


भैरवने जोरात गाडी नेली आणि जोरात गाडीची स्टेरिंग फिरवली आणि सगळ्या भुतांना डायरेक्ट उडवून दिले.....आणि जोरात चौथ्या गिअर वर गाडी टाकली आणि तिथून बाहेर निघाला. एकदंत म्हणाला , अरे भैरव काय झाले कोण होते ते....भैरव म्हणाला "काय नाही मच्छर होते. मी त्यांनाच मारत होतो " 


थोडा काय तो वेळ झाला पन गाडी आम्ही निघालो त्याच ठिकाणी परत आलो.....आपण अजूनही त्या शक्तीच्या घेऱ्यात आहोत. 


ती शक्ती अजूनही त्यांच्या मागे होती. भैरवने त्याच्या गळ्यातील काल भैरवनाथाच्या रुद्राक्षाची माळ त्या शक्ती वर फेकली आणि बघता बघता त्या रुद्राक्षातुन तिथे त्या असुरी शक्तिचा नाश करण्यासाठी त्यातून श्री कालभैरव प्रकट झाले आणि त्या असुरी शक्तीत आणि कालभैरव नाथ यांच्यामध्ये युद्ध झाले आणि कालभैरव नाथांनी त्या शक्तीला भस्मसात केले. 


आणि त्यानंतर गावकऱ्यांनी त्या गावातील या असुरी शक्तीचा विनाश झाल्यामुळे तिथे श्री कालभैरव नाथांचे मंदिर बांधले.... आणि त्यानंतर कोणत्याही द्रुष्ट शक्तीने तिथे प्रवेश केला नाही. आणि हे रहस्य संपल्यानंतर आम्ही तिघे परतीच्या प्रवासाला निघालो..... जाता जाता भैरव म्हणाला " खुप भुक लागली आहे यार" काय करायचे......एकदंत म्हणाला चला समोरच एक चहाची टपरी आहे तिथे मस्त चहा पिऊ....आम्ही चहा घेतला आणि टपरी वाल्यांने विचारले ....कोणत्या रस्त्याने आलात पोरांनो ...... एकदंत म्हणाला होटेल कडच्या.....टपरी वाला आमच्याकडे पाहतच राहिला .....तो म्हणाला इथला एकही रस्ता त्या होटेलच्या वाटेला जात नाही..... मी सांगतो पन सगळे इथुन पुढेच जातात.....आणि तो रोड खंडर आहे...... तुम्ही नाही आला ना त्या दुसऱ्या रोड ने......आम्ही तिथून चहा सोडून तसेच पळालो पन आमची गाडी स्टार्ट होत नव्हती.....आम्ही चहावाल्याचे पैसे द्यायला गेलो तिथे कोणताच चहावाला नव्हता...... 


भैरवने ने त्याचे भैरवनाथांचे कवच पुन्हा काढले...... आणि एक मार्ग तयार झाला...... आणि त्या रस्त्याने आम्ही तिघे सुखरूप घरी परतलो.....आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्हाला दरदरून घाम फुटतो...... त्यानंतर आम्ही पुन्हा रोडला गेलो नाही.........


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror