Pradnya's story

Inspirational

2  

Pradnya's story

Inspirational

आयुष्यातील इंद्रधनुष्य

आयुष्यातील इंद्रधनुष्य

1 min
132


     आपल्या आयुष्यात इंद्रधनुच्या रंगाप्रमाणे विविध रंग हे भरलेले असतात. कधी हास्य, अश्रू ,विनोदी, उदास, आश्र्चर्यचकित, भांबावलेलो, उत्साही, जबाबदार, बेजबाबदार, प्रामाणिक अश्या विविध घटनांमधून आपलं जीवन हे व्यतीत होत असते. ह्याला योग्य प्रकारे कालानुरूप योगदान दिले की त्यातल्या रंगाचा अचूक अर्थ समजला जाईल.


आयुष्यात सुखाचे क्षण आनंदाचा वर्षाव घेेऊन येत असतो. मन समाधानी प्रफुल्लित होऊन बागडू लागते. हास्यामुळे मनावरचा ताण आपोआप हलका होत असतो. पुढे जाण्यासाठी आयुष्यात याची खूप मदत होत असते. अश्रूमुळे अंतरंगात डोकावून भावना जणू बोलू लागतात. विनोद झाला की दु:ख क्षणभरासाठी बाजूला सरकावले जाते. उदास झालो बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आपण सुचवलेल्या कल्पना आहेे तसेच घडल्या की आश्चर्यचकित होते.

एखादी गोष्ट अपुरी राहते तेव्हा मन भांंबावतेे. याउलट गोष्ट पूर्ण झाली तर उत्साह संचारत असतो. एखादी गोष्ट काळजीपूर्वक सांभाळली की 

जबाबदार ठरतो, नाहीतर बेजबाबदार. असेच आयुष्याचे विविध रंगात सामावलेले इंद्रधनुष्य. प्रत्येक घटना समजून घेताना ती घटना इंद्रधनुष्यासारखी

निराळी असते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational