Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Lata Rathi

Drama


3  

Lata Rathi

Drama


आत्मसन्मान - भाग २

आत्मसन्मान - भाग २

2 mins 308 2 mins 308

मागील भागात आपण वाचलं... जयेश आणि जुईचं लग्न झालं... आता पुढे...


जुई लग्न होऊन जयेशच्या घरी आली. नवलाईचे नऊ दिवस प्रेमात न्हाऊन निघाले. जुईचे सासू-सासरे खूप प्रेमळ... खूप सांभाळून घ्यायचे तिला. पण सासर म्हटलं तर कामं तर करावीच लागणार ना!!


जुई जिने कधी पाण्याचा ग्लाससुद्धा भरला नाही, तिला आता विहिरीवरून पाणी भरून आणावे लागे. कधी गॅसवर एक कप चहासुद्धा बनवला नाही, तिथे भल्या पहाटे उठून सगळ्यांच्यासाठी स्टोव्हवर चहा बनवावा लागे. तसा जयेशसुद्धा तिला खूप जपायचा.


कधी कधी त्याला तिची खूप दया यायची. एकदा रात्री झोपतेवेळी जयेशने जुईचा हात हातात घेतला... तेवढ्यात...


जुई- आईssssइsss गं म्हणत किंचाळली...


जयेश- काय झालं जुई!! काही दुखतंय का?


जुई- नाही रे... टचकन डोळ्यात पाणी आलं तिच्या... तिने आपला हात अलगद त्याच्या हातातून सोडवला.


जयेश- जुई, बघू तुझा हात. अगं, किती फोड आलेत तुझ्या हाताला... किती त्रास सहन करतेस गं तू... तेही फक्त माझ्या प्रेमापोटी.


जुई- अरे... काही नाही रे... तू आहेस ना सोबतीला... होतील रे बरे... आणि होईल सवय हळूहळू... सासुबाई पण आता खूप थकतात रे... शेतीचं काम करून, म्हणून घरचं मी सांभाळते... त्या नाहीच म्हणतात रे मला... आणि तू का दोष देतोस रे स्वतःला... झोप आता सकाळी कॉलेजला जायचंय ना...


असेच दिवस सरत गेले. जुईचे आई-बाबा यायचे अधून मधून... मुलीचं दुःख त्यांच्याने पाहवेना. किती नाजूक पोर... पण बघा न... काय दशा करवून घेतलीय पोरीने आपली... काही मदत करू पाहायचे पण... जुई खूप स्वावलंबी...


जुई- आई, बाबा... तुम्ही इथपर्यंत आलात हेच माझ्यासाठी खूप हो... मला खरंच काही मदत नकोय. फक्त आशीर्वाद असू द्या.


—————


आज सकाळपासूनच जुईला बरं वाटतं नव्हतं. चक्कर, मळमळ, कोरड्या उलट्या... तिने उठायचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोर अंधारी आली... आणि ती परत बेडवर जाऊन झोपली.


रोज सकाळी लवकर उठणारी जुई अजून कशी उठली नाही म्हणून जयेश तिला उठवायला गेला... हे काय...जुई एकदम निस्तेज पडून होती.


जयेश- जुई... काय झालंय गं... बरं नाही वाटतं का?


जुई- हो रे... अंधारी येतेय, मळमळतंय पण...


जयेशने आईला आवाज दिला... आईने ओळखलं आणि जयेशला सांगितलं, सुनबाईला दवाखान्यात घेऊन जा... जयेशने जुईला दवाखान्यात नेलं... डॉक्टरांनी सोनोग्राफी केली... आणि दोघांचं अभिनंदन केले...


क्रमश:


Rate this content
Log in

More marathi story from Lata Rathi

Similar marathi story from Drama