आशीर्वादरूपी तुझे आभार
आशीर्वादरूपी तुझे आभार


"आशीर्वादरूपी आभार"
खरतर आईला मी सगळ्या गोष्टी सांगत होते. पण, एक गोष्ट आहे जी मी आजपर्यंत तिला सांगू शकले नाही. तुझ्यामुळे मी आहे, हे तर तुला माहीतच आहे आई. मी जशी पण आहे, आज ते तुझ्यामुळेच खंभीरपणे उभे आहे.लहान पणापासून तू दिलेले मौल्यवान संस्कारान बरोबरच जीवनाच्या उन्हाळ्यात-पावसाळ्यात, तूच वागोल्या प्रमाणे मी पुढचे पाऊल टाकले. मला नौकरी लागली तेव्हां, बाळंतपणेच्या वेळेस आणि कोणत्याही कठीन-परिस्थितिला सामोरी जाताना तूच माझी हिम्मतरूपी मैत्रीण बनून माझ्या सोबत होती.
ह्या जीवनात माझ्या साठी देवांच्या ही अधी तुझे स्थान सर्वश्रेष्ठ आहे, "आई-तुझे-खूप-आभार" म्हणून त्याची पूर्ति कधीच होणार नाहीं, तुझे संस्कारांना आपल्या पोरानमधे जीवंतठेऊ , हेच आशीर्वादरूपी आभार तुझे नेहमीच-असुदे.