आरवी
आरवी
मिलिंद आणि रेवती आरवीला घेवून डॉ,शैलेश माने सुप्रसिद्ध मानसोपचार स्पेशालिस्ट यांच्याकड़े आले होते. आरवी आता ही त्या क्लिनिक मध्ये असून नसल्या सारखीच शून्यात नजर लावून बसली होती. डॉ कड़े आता एक पेशंट बसले होते. त्या पेशंट नन्तर आरवी चा नंम्बर होता. रेवती आपल्या लाडक्या मुलीं कड़े केविलवान्या नजरेने पहात होती . लहान पणा पासून प्रत्येक गोष्टीत् हुशार,चौकस,हसमुख अशी आरवी आता अवघ्या सोळा वर्षातच आयुष्य संपून गेल्या सारखी भकास झाली होती. याला कुठे ना कुठे रेवती आणि मिलिंद जबाबदार होते. फक्त काम आणि पैसा याच्या मागे लागुन् त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलीं चे आयुष्य वेगळ्याच वळणावर आणून ठेवले होते. पाच मिनिटात आतील पेशंट बाहेर आला. तसे ते तिघे आत गेले. डॉ नी आपल्या समोरच्या खुर्ची वर त्यांना बसायला सांगितले आणि म्हणाले बोला मि. मिलिंद काय प्रॉब्लेम आहे. तसे रेवती म्हणाली, डॉ ही आरवी आमची मुलगी, एकदम ब्रिलियंट स्टुडेन्ट आठवी इयत्ते पर्यन्त खुप छान अभ्यास करायची . बडमिंटन् खेळायला ग्राउंड ला जायची . पन गेल्या वर्षा पासून ती खूपच स्वभावाने हायपर बनली आहे. अभ्यासात अजिबात लक्ष नाही सतत मोबाईल वर अपडेट राहते. सोशल मीडिया चा अतिरिक्त वापर करते तिचे फ्रेंड सर्कल ही खुप आहे. वारंवार पार्टी करणे फिरायला बाहेर जाणे आणि आम्ही अड़वले तीला तर उद्धटपणे उत्तर देते आमचे काहिही ऐकत नाही. डॉ शांतपणे सर्व ऐकत होते. रेवती पुन्हा म्हणाली मागच्या वीक मध्ये तर अति झाले डॉ हिचे वागणे. रात्री ही उशिरा घरी आली तीला एका कार मधून तिच्या मित्रांनी सोडले ती अजिबात शुद्धित नव्हती. सकाळी उठल्या वर तीला उलटी झाली चक्कर येऊ लागली तेव्हा आम्ही आमच्या फॅमिली डॉ ना आरवी ला दाखवले. डॉ नी तीला चेक केले आणि म्हणाले आरवी ने ड्रिंक घेतली होती आणि त्याच सोबत तीने ड्रग्स ही घेतले होते. आणि आता आठवडा झाला ती स्कुल ला जात नाही रुम मध्येच बसून असते काही विचारले तर काही बोलत नाही. इतके सांगून रेवती गप्प झाली तिचे डोळे भरून आले होते.
आरवी आता ही हरवल्या सारखी बसली होती. डॉ म्हणाले तुम्ही नका काळजी करु मी नक्की आरवी च्या अशा वागन्याचे कारण शोधून काढेन् आणि तीला पूर्ण बरी ही करेन. डॉ आरवी कड़े पहात म्हणाले आरवी तू कशी आहेस आणि तु आता 10 std ला आहेस ना. कसा चाललाय अभ्यास.?पण आरवी गप्प च होती. रेवती तीला खांद्याला हलवून बोल बेटा म्हणत होती. पण आरवी ने रेवती कड़े पाहिले देखिल नाही. डॉ म्हणाले मला वाटत तुम्हा दोघांसमोर ती कदाचित नाही बोलणार तुम्ही बाहेर बसा मी एकटा आरवी शी बोलतो. ओके म्हणत मिलिंद आणि रेवती बाहेर आले. डॉ नी पुन्हा आरवी शी बोलायला सुरवात केली हे बघ आरवी तू तुझ्या मनातल जे काही आहे ते माझ्या जवळ बोलु शकतेस मी तुला मदतच करनार आहे. तू हुशार आहेस आता तुला दहावी ला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत तू खुप चांगली मुलगी आहेस मग तुझे वागणे असे का आहे तू नेहमी ड्रिंक करतेस का ? का तुला कोणी जबरदस्ती प्यायला भाग पाडली. मी डॉ आहे बेटा तु मला सगळ सांगितलेस तरच मी तुझी मदत करु शकतो तू तुझ्याच हाताने तुझे आयुष्य का अंधारात लोटते आहेस? जरा तुझ्या आई वडिलां कड़े बघ किती काळजी करत आहेत तुझी त्यांना तुला असे बघून नक्कीच वाईट वाटत् असेल . आरवी त्यांचा तरी विचार कर. तसे आरवी चिडून् बोलली हे असले आई वडील डॉक्टर, यांना ना माझी काळजी आहे ना माझी चिंता यांना फक्त स्वहताच आयुष्य पडलेले आहे काही नाही डॉक्टर यांना नाही काही वाटत माझ्या बद्दल इतके बोलून आरवी रडु लागली डॉ नी तिला मनसोक्त रडु दिले खुप दिवसाच साचले होते ते अश्रु आज ते बाहेर पडले. थोड्या वेळाने ती शांत झाली . डॉ नी तीला पाणी दिले पाणी पिऊन ती शांत बसली. डॉ म्हणाले आता सांगशील का मला काय झाले नेमके की तू अशी वागतेस.
आरवी म्हणाली,डॉक्टर मी पहिल्या पासून अशी अग्रेसिव्ह नव्हते खुप छान अभ्यास खेळ यात रमायचे. पण गेली दोन वर्ष आई बाबांची सतत वाद भांडने होतात घरात. बाबाचा बिज़नेस आहे तरी आई हट्टाने नोकरी करते कारण वेळ जायला हवा म्हणून मी कायम घरी कामाला येणाऱ्या मावशी सोबत राहिले मोठी झाले मला जे जे हवे ते लगेचच मिळत असे. बाबा आई वर संशय घेतात त्यामुळे खुप भांडण होतात. आई सुद्धा बाबा वर डाउट घेते घरात अजिबात शांतता नाही . माझ्या कड़े लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. आईचे मित्र आहेत तसे बाबांच्या पण मैत्रिणी आहेत.मला खुप वैताग यायचा घरात् थाबुंच नये असे मला वाटायचे मग मी माझे मन मित्र मैत्रिणी मध्ये आणि सोशल साईट वर जास्त रमवु लागले वास्तव जगापेक्षा ते आभासी जग मला जवळ चे वाटू लागले. खुप मित्र झाले एका मुलाच्या प्रेमात पण पडले त्यानेच मला ड्रिंक ची सवय लावली त्याला माहित होते मी मोठ्या घरातली पैसे वाली मुलगी आहे तो माझ्या कडूनच पैसे घ्यायचा आणि स्वहताची मौजमजा करायचा आणि मि ही आंधळा विश्वास ठेवून त्याला पैसे देत असे. पण तो माझा फक्त वापर करत होता त्याच प्रेम वैगरे काही नव्हते माझ्यावर .त्या दिवशी आमची फेरवेल पार्टी होती संध्याकाळी ,पार्टी झाल्यावर आमचा सगळा ग्रुप मिळून आम्ही एका पब मध्ये गेलो खुप धुन्द आणि रोमैंटिक असे ते व
ातावरण होते मी पहिल्यांदाच पब मध्ये आले होते मला ते खुप भारी वाटले सगळ्या जगाला विसरून मस्त एन्जॉय करणारी मूल मुलीं पाहून मी भारावून गेले. माझ्या मित्राने मला ड्रिंक मधून किवा सिगरेट मधून ड्रग्स दिले असतील मला काहीच माहित नाही. मला ड्रिंक ची सवय होती त्यामुळे खुप प्यायले तेव्हा माझ्या मित्राने माझ्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मला नशेत सुद्धा समजत होते की तो काय करतो आहे. त्या पार्टी मध्ये आमचे एक फॅमिली फ्रेंड त्यांचा मुलगा ही होता त्याने मला ओळखले आणि माझी सुटका केली मला स्व्हताच्या कार मधून त्याने सुखरूप घरी सोडले. पण माझ्या मित्रानेच माझा विश्वासघात करावा ही गोष्ट माझ्या साठी खुप शॉकिंग होती.
दुसऱ्या दिवशी ज्याने मला घरी सोडले त्याने फोन करून मला सर्व काही सांगितले त्यामुळे मी वाईट संगतीत राहून कोणत्या थराला गेले याचा विचार करु लागले माझ्या मित्राने माझ्यावर जबरदस्ती केली असती आणि माझे काही बरेवाइट झाले असते तर या विचाराने मी घाबरून गेले. पण डॉ या सगळ्याला जबाबदार फक्त माझे आई वडील आहेत त्यांना माझ्याशी बोलायला देखील वेळ नाही बस्स मी मागेल तेवढे पैसे द्यायचे आणि सतत एकमेकांशी वाद घालत बसायच. माझा त्या दोघांना पूर्णपणे विसर पडला आहे.इतक बोलून आरवी ने टेबल वरील पाण्याचा ग्लास घेतला आणि पाणी संपवले. ती मनात साचलेले सगळ डॉक्टरांशी बोलली. डॉ ना समजून चूकले की पालकांच्या बेपरवाई मुळे मुलांचे आयुष्य किती धोक्याचे बनत चालले आहे. डॉ नी मिलिंद आणि रेवती ला आत बोलावले आरवी साठी काही औषधे दिली ते म्हणाले आरवी हे मेडिसिन घे यामुळे तुला रिलैक्स वाटेल आता तुला रेस्ट ची गरज आहे . आरवी ने फक्त मान हलवली. डॉक्टर म्हणाले उद्या तुम्ही दोघेच या आरवी ला नका आणू मला बोलायचे आहे तुमच्याशी. ओके म्हणत मिलिंद आणि रेवती आरवीला घेऊन तिथुन निघाले.घरी आल्यावर आरवी ने मेडिसिन घेतले आणि ती झोपुन गेली खुप स्ट्रेस मुळे तीला विश्रांतिची गरज होती. रात्री आरवी तिच्या रूम मध्ये बसून झालेल्या घटनांचा विचार करु लागली. तीला ही समजत होते की तिचे वागणे चुकीचे आहे पण आई वडील असून ही ती ऐकटी पडली होती त्यामुळे ती प्रेमाला आपलेपनाला मायेला बाहेरच्या लोकां मध्ये शोधत राहिली. पण बाहेरचे जग स्वार्थी आणि फसवे असते हे त्या सोळा वर्षाच्या मुलीच्या गावीही नव्हते. अचानक परत तिच्या आई वडिलांच्या भांडनाचा आवाज तिला येऊ लागला ती दोघ एकमेकांना दोष देत होती की तुझ्या मुळेच आरवी बिघडली आहे. आरवी ने त्रासुन उशी काना वर दाबुन ठेवून झोपन्याचा प्रयत्न करु लागली तिचे डोळे भरून आले कसले हे माझे आई वडील यांना माझ्या बद्दल काहीच वाटत नाही का? तुमच्या अशा वागन्या मुळेच मी अशी बनली आहे हे का नाही समजत यांना असा विचार तिच्या मनात आला.
दुसऱ्या दिवशी मिलिंद रेवती डॉक्टरां कड़े आले. डॉक्टरांनी त्यांना आरवी बद्दल विचारले ती आहे ठीक असे रेवती बोलली. डॉक्टर म्हणाले आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि डॉक्टरांनी काल आरवी जे बोलली ते सगळ त्या दोघांना सांगितले. ते ऐकून दोघ ही शॉक झाले. रेवती म्हणाली डॉक्टर रेवती अस काही करेल किवा वागेल याची जरा पण आम्हाला कल्पना नव्हती. मिलिंद म्हणाला डॉक्टर यासाठी आई ने मूलीकड़े लक्ष देणे गरजेचे असते पण हिला स्वतःचेच पडलेले असते कायम म्हणूनच आरवी अशी बिघडली. तसे डॉक्टर म्हणाले, वेट वेट मि. मिलिंद यात कोणा एकाचा दोष नाही. तुम्ही दोघ ही आरवी ची जबाबदारी नीट सांभाळु शकला नाहीत. तुम्ही तिचे सर्व हट्ट पुरवत होता, मागेल तितका पैसा देत राहिलात पण आरवी ला काय हवे आहे हे कधी तुम्ही विचारले का? मुलांना नवनवीन गँझेट्स आणून देणे पैसा पुरवने म्हणजे पालकत्व पूर्ण झाले असे नसते. मूल काय करतात, मोबाईल वर काय काय पाहतात किवा कोणते गेम खेळतात, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत त्यांचा अभ्यास कसा चालला आहे याची कधी चौकशी केलित का तुम्ही? तुम्ही फक्त आणि फक्त भांडण करत राहिलात तुमची वयात आलेली मुलगी आहे याचा तुम्हाला पूर्ण पणे विसर पडला. पालक होण म्हणजे नुसते मुलांना जन्माला घालने नसते,तर त्या मुलाला एक जबाबदार संस्कारक्षम व्यक्ती बनवने असते. त्यांच्या कोवळया वयात त्याचे मित्र बनून त्यांचे प्रोब्लेम सॉल्व करणे हे महत्वाचे असते. पन तुम्ही फक्त तुमचा ईगो जपत राहिलात. तुमच्या दोघांच्या दुर्लक्षामुळे आरवी वहावत गेली तीला तुमचे प्रेम माया हवी आहे तीला तिची काळजी घेणारे आई बाबा हवे आहेत. ती ऐकटी पडली आहे तीला तुमच्या प्रेमळ आधाराची नितांत गरज आहे अजुन ही वेळ गेली नाही तुम्ही दोघांनी ठरवले तर तुमची आरवी तुम्हाला पूर्वी सारखी परत मिळेल. आता तुम्हीच ठरवा तुमचा ईगो जास्त महत्वाचा आहे की तुमची मुलगी! डॉक्टर इतक बोलून गप्प झाले.
मिलिंद आणि रेवती सुन्न मनाने क्लिनिकच्या बाहेर आले. आता त्यांच्या पालकत्वाची खरी परीक्षा होती. पालक होणे ही थोड्या दिवसांची जबाबदारी नसते ती आयुष्यभर निभावून नेण्याची कसोटी असते जबाबदार आणि कुशल पालक होणे हे जास्त गरजेचे मुलांचे भवितव्य त्यांचे शिक्षण हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून असते. योग्य वयात योग्य वळण मुलाना लावणे ही पालकांचीच जबाबदारी असते.