अक्षता कुरडे

Inspirational

3  

अक्षता कुरडे

Inspirational

आपुला राजा

आपुला राजा

2 mins
201


सदर कथेत साल खरे असून त्यात काही काल्पनिक बदल करून त्याला fanfiction रूपात फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी. 


राममोहन १८१४ साली कोलकाता येथे स्थायिक झाले. तेथे सामाजिक व धार्मिक आंदोलनास त्यांनी प्रारंभ केला. तिथे त्यांनी पाहिले पतीच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला सती जावे लागत होते. त्यांच्या शेजारीच असलेल्या घरातील मुलीला सती जावे लागणार होते. तिचे वय अगदीच लहान होते. तिच्या आरोळ्या, किंकाळ्या आसमंतात गुंजत होता. त्या ऐकुन कदाचित दगडाला ही पाझर फुटला असावा पण तिच्या सासरच्या मंडळींना नाही. तिच्या डोळ्यांत जगण्याची आस होती. तिचे डोळे साऱ्यांकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत होते. ओरडुन ओरडुन अख्या जगाला ती मदत मागत होती. तिची आसवे सुकली होती पण तिच्या डोळ्यांतील दुःख कदाचित ते राममोहन यांना च दिसले असावे. त्यांनी ह्या गोष्टीला कडाडून विरोध केला. त्याच बरोबर प्रखर विरोधकांचा विरोध झेलला. आणि शेवटी त्या मुली ला सती जाण्यापासून वाचविले. 

ह्या घटनेनंतर सतीप्रथेकरता धर्मशास्त्राचे आलोडन केले. जेथेजेथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न ते करू लागले. त्यामुळे इतर समाज त्यांना हिंदुधर्मविरोधी मानायचा. १८१८ साली, सतीची प्रथा बंद व्हावी म्हणून समाजातील उच्च प्रतिष्ठित मंडळीच्या सह्यां सोबत अर्ज त्यांनी सरकार ला पाठवला. त्यात त्यांनी लिहिले, की या अमानुष सती च्या चालीवर बंदी घालून सरकारने हा कायदा करावा आणि हे समाजाकडून व त्यांच्या आप्तेष्ट मंडळींकडून होणारे स्त्रियांची जीवहानी तात्काळ बंद पाडावी. त्यावेळचे गव्हर्नर ज. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी राममोहनांशी चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. हे सारे करणे काही सोपे नव्हते परंतु त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही आणि केलेला निर्धार त्यांनी पूर्ण तर केला त्याचबरोबर त्याचे रूपांतर कायद्यात केला. आज कित्येक स्त्रिया त्यांच्या ह्या महान कार्यासाठी ऋणी आहेत. 

सती च्या चाली बरोबर कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह, बाला-वृद्धविवाह इतर अनेक हीन चालींच्या बंधनातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता त्यांनी आंदोलन उभारले. 

बालविवाह, सती प्रथेच्या जोखडातून भारतीय स्त्रीला मुक्त करण्याकरता आंदोलन उभारणारे व भारतात उदारमतवादी आधुनिक सुधारणांचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावणारे राजा राममोहन रॉय यांना आम्हा साऱ्यांकडून मानाचा मुजरा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational