Ashutosh Purohit

Inspirational

2  

Ashutosh Purohit

Inspirational

* आपल्याच सोयीसाठी...*

* आपल्याच सोयीसाठी...*

1 min
2.9K


एक क्षणात, एखाद्याविषयी सहज मत करून घेतो आपण, आपल्या सोयीने... डोक्यातही नसतं आपल्या तसं काही.. तरी पटकन interpret करतो समोरच्याची reaction आपल्या सोयीने... मग असंच साचत राहतं आत.. तरीही आपण काहीच बोलत नाही आपल्या सोयीसाठी.. लढत राहतो समोरच्याशी आणि स्वतःच्याच विचारांशी कितीतरी काळ... तरी तोंडातून, "बाबा रे, तुझ्या या गोष्टीचा मला राग येतो. मला नाही आवडत असं.." ही दोन वाक्य बोलून विषय पटकन संपवून नाही टाकत आपण.. खरंतर किती सोपं असतं मनातलं बोलणं ! तरी नाही करत आपण ते..
 मग इथे आपण कोणाची सोय बघतो ? की घाबरतो आपण समोरच्याच्या reaction ला ? की तो रागवेल असं वाटतं आपल्याला ?
 सगळंच अधांतरी ! सगळंच हवेतल्या हवेत !
 विषय पटकन संपवून टाकणं आवडतंच नाही बहुतेक आपल्याला...
 तोच तोच विषय सतत चघळायला आवडतं, आपल्याच सोयीसाठी....!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational