Nurjahan Shaikh

Inspirational Others

2  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

आपली वागणूक

आपली वागणूक

1 min
42


कसे राहावे, कसे वागावे, हे आपले आपण योग्य रीतीने ठरवावे. 

दुसऱ्यांनी हिणवले म्हणून वागनेच सोडू नये किंवा बदल करू नये. 


      मानवाच्या प्रवृत्तीनुसार त्याच्या आवडी-निवडी देखील वेगवेगळ्या असतात. आपल्या साठी काय योग्य आहे हे आपण स्वत:च चांगल्या पद्धतीने ठरवू शकतो. चारचौघात जाताना कसे दिसावे, काय बोलावे, कसे वागावे या सर्व गोष्टींची आपल्याला जाणीव असतेच आणि त्याच पद्धतीने आपण राहण्याचा देखील प्रयत्न करतो. मुळात मानव हा अनुकरणप्रिय आहे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती मनापासून केलीच पाहिजे, त्यातच खरा आनंद मिळतो. परंतु एखाद्याने त्या बाबतीत नकारार्थी मत दिले म्हणून लगेच ती गोष्ट सोडून देऊ नये.


       नकारार्थी बोलणारे, निंदा करणारे, दुसऱ्यांना हिनवणारे भरपूर असतात, म्हणून लगेच त्यावर आपले मत बदलू नये. ज्या गोष्टी सत्य सोडून भरकटत जातात अशा गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नये. काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मनापासून आवडतात, त्या गोष्टी सक्तीने का होईना पण करावे. त्यातूनच आपल्याला खरा आनंद समाधान मिळते.


       एक खूप लोकप्रिय म्हण आहे 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे', दुसऱ्यांसाठी बदलण्यापेक्षा स्वतःला काय वाटते, काय आवडते यावरून आपले राहणीमान ठरवावे, आपले स्वतःचे मत बनवावे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational