The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Anuja Dhariya-Sheth

Horror

3  

Anuja Dhariya-Sheth

Horror

आंब्याचे झाड - भाग २

आंब्याचे झाड - भाग २

3 mins
276


मागच्या भागात आपण पाहिले सीमाच्या अंगावर नखांचे ओरखडे उमटलेले असतात... ती अजयला सांगते... तो हसतो... आणि म्हणतो अगं वेडाबाई काही पण असते तुझे चल... आता आणखी कोणाला बोलू नको... तिला कळत नाही काय करायचं काय नाही... विचारात असताना बघते तर काय अजय बाहेर गेलेला असतो, ती एकटीच खोलीमध्ये असते.... घाबरते.... तेवढ्यात तिला त्या खिडकीजवळ ती बाई येताना दिसते.... तिला बोलावत असते.... तिला घाम फुटतो, तेवढ्यात सासू येते... तिला अशी बघून विचारते, काय होतंय.... सीमा गप्प बसते....


हळू हळू वर्ष होते रोज तिच्या हाता पायावर कोणीतरी नख ओरखडत असते.... पण अजयचा विश्वास नाही तर अजून कोण ठेवणार....


घरात चर्चा सुरू असते.... घर मालक येऊन घर खाली करायला सांगत असतो.... अजय त्यांना बोलतो... आम्ही शेजारी जागा आहे ती घेतले.... ही जागा पण आम्हाला विकलीत तर बरे होईल.... मला बिझनेससाठी बरे पडेल.... मालक नाही म्हणतो....

मग अजय त्यांच्याकडून मुदत वाढवून घेतो.... आणि म्हणतो....आम्ही शेजारी घर बांधेपर्यंत इथे राहू देत आम्हाला.... मालक म्हणतो, ठीक आहे... पण शेजारी तुम्ही घर बांधणार कसे??? ते आंब्याचे झाड आहे ना... अजय म्हणतो आम्ही तोडून टाकू.... मालक म्हणतो, कसं शक्य आहे तिथे ती आहे... सावतीण.... ती तुम्हाला पाडून देणार नाही.... ती तुम्हाला बांधून देणार नाही माझे ऐका.... तिला पोर होत नव्हते... म्हणून तिने हा आंबा लावला... त्याच्यावर जीवापाड प्रेम केले.... आणि तुम्ही तो कापला तर ती चवताळेल... तुम्हाला त्रास देईल...


अजय हसत म्हणतो.... अहो काय बोलताय माझा नाही विश्वास.... मालक म्हणतो, मी एक वर्ष देतो. बांधून झाले तर तिथे जा नाहीतर.... माझे घर खाली करा.... सुरुवात होते प्लॅन काढला जातो.... पण गावात कोणीच येत नाही झाड तोडायला.... बरं झाड एवढे मोठे असते की ते ठेवून घर बांधू शकत नाही....


शेवटी बाहेरून माणसे येतात.... झाड तोडायला सुरुवात करतात.... तशी ती सावतीण रागाने लाल होते.... पण तिचं सावज म्हणजे सीमा परत गरोदर असते.... जे सुख तिला मिळाले नसते ते सीमाच्या रुपाने ती अनुभवत असते.... पण झाड मुळासकट उपटले आणि ती लाल झाली.... इकडे सीमाला त्रास सुरू झाला.... आठवा महिना चालू होता.... डाॅक्टरकडे नेले.... त्यांनी जवळ असलेल्या शहरात न्यायला सांगितले...


आणि मुलगा झाला.... सगळ्यांना खूप आनंद झाला... पण थोड्या वेळात मुलगा काळा निळा पडत गेला.... दूर्दैवाने काचेची पेटी पण मिळाली नाही.... आणि तो गेला..... गावात लोकं उलट सुलट बोलू लागली..... सीमा घरी आली.... आणि दारातच मोठ्याने हसू लागली.... आणि सासरे होते उभे त्यांना अरे तुरे करत बोलली.... ए वसंता.... माझे झाड पाडलेस..... तू.... आता मी तुझा वंश कधीच वाढू देणार नाही.... माझ्या मुलाचा जीव घेतलास.... आणि मी तुझ्या नातवाचा..... हा हा हा....


आता मात्र अजय घाबरून गेला.... इकडे सीमा चक्कर येऊन पडली..... सगळे घाबरले.... नोकर पुढे आला... त्याने नारळ काढला..... सीमा झोपेत होती.... तिला उचलून हॉलमध्ये ठेवले..... ती उठली ती रडत.... अजय आपले बाळ ती घेऊन गेली ती बघा ना.... अजय घाबरत गेला सीमाजवळ.... तर सीमाला काही कळत नव्हते, ती पण घाबरली होती.... त्याने तिला जवळ घेतले.... आणि शांत केले.....


पुढे काही दिवस सगळे शांत होते.... त्याने गुरुजींना बोलावून शांती केली..... आणि परत बांधकाम सुरू केले.... त्याला वाटलं सगळं व्यवस्थित झालंय आता..... घर पूर्ण व्हायला आले होते.... सीमाच्या अंगावर अजूनही नख उठत होती.... अजयचे लक्ष गेले... आणि तो घाबरत म्हणाला, सीमा काय गं हे.... ती म्हणते मी तुम्हाला बोलले तेव्हापासून आहे चालू.... आता मात्र तो चांगलाच घाबरतो.... नोकराला विचारतो.... काय करायचा उपाय.... नोकर त्याला एका मांत्रिकाकडे घेऊन जातो.... तो साधू बाबा येतो.... तेव्हा सीमा त्याच्याकडे बघत पण नाही.... तो मंत्र म्हणतो तशी ही घुमू लागते.... ती बाई अंगात येते....


काय हवंय तुला...... बाबा विचारतात....


माझे झाड तोडले याने... आता हे झाड मी नाही सोडणार मी हिला नेणार... यांचा वंश वाढू देणार नाही मी.... ती बाई बोलत असते... सीमा कोणालाच ऐकत नाही.... अंगात आल्यावर ती अशीच बोलते.... सगळ्यांना ढकलून ती नदीकडे धावू लागते....


तेवढ्यात तो बाबा काही तरी मंत्र म्हणतो.... आणि रेषा ओढत जातो.... ती तिथेच थांबून राहते....


अजय सगळं बघत असतो.... त्याचा कधीच विश्वास नव्हता अशा गोष्टी त्याला करायला लागत होत्या.... बघू पुढच्या भागात काय सांगितले त्या बाबांनी...???? आणि काय होते सीमाचे???


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror