आंब्याचे झाड..अंतीम
आंब्याचे झाड..अंतीम


मागच्या भागात पाहिले कि तें काका खूप अडचणींवर मात करत येतात....आणि सीमा सतत लांब पळत असते त्यांच्यापासून, सर्व प्रथम ते घर पाहत फिरतात...वास्तू प्रमाणे तोडातोडी न करता ते बदल सांगत असतात...आणि प्रत्येक गोष्ट अशी का हवे हे पटवून सांगत असतात.....त्यामुळे सगळ्यांना त्याचं म्हणणं पटत असते....बोलता बोलता सहज सांगतात....तुमच्या घरात कोणालाच मुलगा नाही का हो....अजय जेव्हा ऎकतो तेव्हा तो थोडा गोंधळून जातो....आणि हो असे उत्तर देतो...काका म्हणतात मला तुमची वास्तू बघून समजले....आणि मी जे सांगतोय तें बदल नाही झाले, तर तुमच्या मुलीचा वंश पण वाढणार नाही....आता मात्र अजय सर्व लक्ष देऊन ऎकु लागतो....तें म्हणतात मला सर्व कधी पासून सांगायचं होते...पण कोणाला पटत तर कोणाला नाही....म्हणून मी बोललो नाही...त्यात मी ह्याच्या बाबांचा मित्र...सख्खा काका नाही.....तें मला खूप मानतात...अगदी भावाप्रमाणे....पण तुंम्हाला पटेल न पटेल....त्यात मी फटकळ आहे....म्हणून एवढे दिवस मी काही बोललो नाही....असो आज योग आला...सगळ्यांच्या गप्पा रंगात येतात....आणि मग त्यांचे लक्ष जाते....खिडकी आणि balcony मध्ये....
तिथे स्वस्तिक चे चिन्ह बघून तें चिडतात....आणि वास्तू शास्त्रा प्रमाणे तें चुकीच आहे असे पटवून देतात....आणि नोकराला लगेच शक्य आहे तें तोडायला सांगतात....तशी सीमा ओरडते...डोळे मोठे करते....केस सोडले...आणि घुमु लागतें...माझं घर तोडायला आलाय तुम्ही....मी खूप आडवंल तुम्हाला पण आज तुमच्या समोर मी हरले....किती आले आणि किती गेले...माझ्या समोर कोण टिकले नाही...सगळ्यांना नाचायला लावले माझ्या तालावर....आणि ही पोरगी तर लय शहाणी आहे....हीच लग्न होऊ देणार नाही मी....हिने माझी वाट अडवलेली मी विसरली नाय....जोरात घुमते....आणि पडते....ते काका सीमाचे डोके मांडीवर घेतात....गळ्यात असलेली माळ डोळ्याला लावतात....तशी ती बोलती होते....मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता....मला मूल होत नव्हते...म्हणून माझ्या नवऱ्याने मला नदीत फेकून दिले औषध देऊन माझा जीव गेला....पण मी इथ एक झाड लावल होत...आंब्याचे त्याच्या वर माझा लय जीव होता...माज पोर होत ते....माझा जीव गुंतून राहिला होता झाडात....मला मोक्ष नाय मिळाला....नंतर माझा नवरा बि गेला...जाताना वसंता ला म्हणजे ह्याच्या बा ला हि जागा विकून गेला....आणि माझा आंबा फळ देऊ लागला...आणि ह्यान तो तोडला...म्हणून मीच ह्याचा वंश वाढून दिला नाही....
हिला घेऊन जायचं होत मला...पण सगळ फेल गेला...ही मोठी पोरगी आडवी आली.....म्हणून हिच्या लग्नात विघ्न आणणार आहे मी....तर आता तुम्ही आलात....सगळ्यांना नाचवले पण तुमच्या मधली ताकद लय आहे मी हरलो....आज माझं घरी तोडल तुम्ही....काका डोळे मीटतात आणि गळ्यात असलेली माळ हातांत घेऊन सीमा च्या गळ्याला लावतात....तशी ती बोलते जाते मी.....पण हिच्या लग्नाला काळ बोटं लावणार मी थोड तरी लावणार.....काका सगळ्यांना शांत करतात....आणि त्यांनी तिला दिलेला शब्द सांगतात....तिला मुक्ती हवे....तर एका ठिकाणी जाऊन तुम्ही ते काम करून ती पूजा करून यायच... आणि हिच्या लग्नंच तिने खूप मनावर घेतलाय सो आपण फ़क्त देवाला प्रार्थना करू एवढंच....की ती जे काही करणार आहे त्यातून मार्ग निघून लग्न पार पडू दे....सगळे बदल होतात....लग्नाला 13 दिवस असतात....आणि सुतक येते...तिचे बोल सगळ्यांना आठवतात....पण सख्खी आजी नाही ना....मग् चालतंय....असे म्हणतं....मार्ग काढून लग्नाच विधी सुरू होतात....इकडे लग्न आणि तिकडे तेराव्याचा घडा....असे विचित्र सगळं सुरू असते....पण त्या काकां वर असलेला विश्वास सगळ्यांना धैर्य देत असतो....पाहुणे मंडळ नाराज होऊन काहीतरी कुजबुज करत असतात....लग्न पुढे घ्यायला हवं होते वगैरे....पण तें शक्यच नसते....त्यानंतर बरोबर एक महिन्याने त्या बाईचा मुक्ती साठी अजय आणि सीमा जातात....आणि आल्यावर एक महिन्यात गोड बातमी येते.....सीमा खूप काळजी करते कसे होईल....हा शाप कसा जाईल???? पण काकांनी सांगितलं त्या प्रमाणे ती बाई मुक्त झालेली असते....आणि इकडे सीमा एका गोड नातवाची आजी होते....आता मात्र सगळे आनंदी होतात कारण खऱ्या अर्थाने आंब्याचे झाडं मुक्त होते....आणि सीमा सुद्धा....खर तर या अश्या गोष्टी सगळ्यांना पटत नाहीत....पण काही ठिकाणी अजून पाहायला मिळतात....
थोडी फार सत्य आहे ही कथा....आणि थोडी काल्पनिक पण आहे....आवडली का???? नक्की कंमेंट करा....
अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका.....लाइक आणि कंमेंट करत रहा.....सूचनांचे स्वागत....