Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Anuja Dhariya-Sheth

Horror


3  

Anuja Dhariya-Sheth

Horror


आंब्याचे झाड ४.....(भयकथा)

आंब्याचे झाड ४.....(भयकथा)

3 mins 117 3 mins 117

सीमा असे काही तरी करू लागली....घरात मोठे कॊणी नाही....तीच्या मोठ्या मुलीने बघितलं होते तसे केले....देवघरात जाऊन कुंकू आणले...तिच्या भाेवती गोल काढून ठेवले....तिला कुंकू लावले....तशी ती अडकली.....मोठ्याने ओरडली पण शांत बसावे लागले...घुमत होती...तिने घाईने जवळचं रहात असलेले चुलत काका त्यांना फोन केला....तेव्हा मोबाईल नव्हते....फ़क्त साधे फोन...ते काका आणि काकू आली....काकू पण घाबरून गेलेली....पण 10वर्षाची मुलगी तिने तिला त्यात बसवलेली पाहून....आणि आपण येई पर्यंत..एकटी राहिली छोटी ला घेऊन...हा विचार करून काकू काकाना म्हणाली तुम्ही जाऊन त्या मांत्रीकाला घेऊन या...मी आहे....मुलगी पण म्हणाली...अहो काका मी फोन केलाय त्यांना पण... तुम्ही या बघून हि नाही उठणार इथून....

बोलणे सुरू असतंना तें बाबा आले....रिंगण बघून विचारले कॊणी काढले....मुलगी रडवेली होऊन बोलली मी.... त्यांना खरच कौतुक वाटले तिचे....त्यांनी मंत्र म्हटला...का आलीस??? हिला न्यायला...आले....आता काय झाले??? मी नेणार हिला....ह्या घरात कोणते चांगले कार्य नाही होऊन देणार मी..ते भुत सीमा च्या तोंडून बोलत होते....ती वेळ कशी तरी निभावली.....आणि अजय आला.....अजय ला सर्व समजले तो खूप घाबरला....दोन्ही मुलींना जवळ घेऊन बसून राहिला....आता काय उपाय करायचा....तेवढ्यात फोन आला सीमा ची आई गेली....आता सर्व उलगडा झाला....सगळ्यांना...तिच्या आईनं तिला मुलगा व्हावा म्हणून गुरुं कडून आणलेला उपाय सांगितला..आणि तिला माहेरी घेऊन जाणार म्हणाली....म्हणून ती आली परत....सीमा ला घेऊन जायला....आणि तें जमले नाही म्हणून तिच्या आईला घेऊन गेली....खूप घाबरले सर्व....कार्य आटपून आल्यावर अजय गुरुंकडे गेला....त्यांनी सीमा ला शांत केले परत....घरी पूजा शांती झाली....आणि मग् ती कायमची शांत झाली..,अधून मधून सीमा ला दिसत होती....पण सीमा एकटी रहात नसे....आणि गुरु नि दिलेला मंत्र बोलत राही....रात्री दार वाजवणे, नख उठणं....म्हणजे ती बाई तीचं अस्तित्व दाखवत होती....पण समोर येतं नव्हती....

दोन्ही मुली मोठ्या झाल्या....मोठ्या मुलीचा राग होता तिला....कारण तिने तिचा रस्ता अडवला एकदा म्हणून पण संधी मिळत नव्हती.....मोठी चे लग्न जमले....साखरपुडा होता.....त्यात येणार्या वर्हाडाची गाडी एका झाडावर आदळली.....त्यामुळे कार्यक्रम झाला पण कोणाचा मूड नव्हता....

मोठ्या मुलीचे लव्ह मॅरीज होते, तिने तिच्या मनात असलेली भीती आणि लहान असताना झालेला प्रकार तिने तीच्या नवऱ्याला सांगितलं......

त्याचे काका वास्तू बघत....तो म्हणाला आपण त्यांच्या कडे जाऊ.....

मग् तें दोघे काकांची भेट घेतात....काका म्हणतात....मी तूला बघितले तेव्हाच मला वास्तू दोष जाणवला पण तुमचा प्रेम विवाह म्हणून मी काहीच बोललो नाहि....

आपण तुमच्या घरी काही बदल करू....फरक नक्कीच पडेल....मी ह्या शनिवारी येतो.... सर्व ठरवून तें बाहेर पडले....

एक एक करत महिना गेला तरी त्यांना घरी यायचा योग मिळत नव्हता....आणि हे सगळे ती बाई करत आहे...हे पण त्या काकांना माहिती होते....

म्हणून त्यांनी फोन केला....आणि म्हणाले मी निघालोय येतो दुपारी....इकडे घरात सांगितलं....आणि सीमा नुसती चलबिचल होती....तिला काहि सुचत नव्हते....मुलीने फोन केला तर तें म्हणाले ट्राफिक आहे त्यामुळे उशीर होतोय....

काकांनी सर्व ओळखले....ती बाई त्यांना येऊ देत नाही आहे....पण त्यांनी सुद्धा पक्के ठरवले होते...आज काही झाले तरी जायचे....2तास लागतात नेहमीं....पण आज चक्क त्यांनी 7 तास प्रवास केला....उलट सुलट पण तें आले....

सगळ्यांनी स्वागत केले....पण सीमा सारखी नजर चोरत होती.....त्यांना सगळे समजत होते....


बघू पुढच्या भागात काय होते??? काय सांगतात तें काका??? आणि कशी सोडून जाते ती बाई ते झाड.....

आंब्याचे झाड नाही हो.....सीमा चे झाडं....

आणि लग्न व्यवस्थित पार पडेल का?


अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका.....लाइक आणि कंमेंट करत रहा.....सूचनांचे स्वागत..


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Horror