End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Anuja Dhariya-Sheth

Horror


2.6  

Anuja Dhariya-Sheth

Horror


आंब्याचे झाड....१(भयकथा)

आंब्याचे झाड....१(भयकथा)

2 mins 11.9K 2 mins 11.9K

अजय आणि सीमा यांचे नवीनच लग्न झाले होते, पूजा झाली....मग् दोघे फिरून आले....एकत्र कुटुंब असल्यामुळे रात्री शिवाय वेळ मिळत नव्हता...एकमेकांसाठी....त्यांच्या रूम ला लागून शेजारी आंब्याचे झाडं होते....ती जागा त्यांनी लग्ना आधी विकत घेतली होती...त्या झाडावर भुत आहे असे गावातील माणसे म्हणायची त्याचा काही विश्वास नव्हता....आणि सीमाला या गोष्टी माहीती नव्हत्या...एकदा सीमाला रात्री भास झाला कोणीतरी बाई आहे उभी....खिडकी जवळ...तिने अजय ला उठवले...त्याने तिला वेड्यात काढले....तिला अधून मधून भास होत होता...

त्यामुळे ती एकटी जायची नाही कधीच...त्या बाई ला सावज सापडलं होते तें म्हणजे सीमा....पण ती एकटी कधी भेटली नाही त्यामुळे ती पण वाट बघत होती संधी कधी मिळते....इकडे सीमा ला दिवस गेले....ती माहेरी गेली...आणि बाळ झाल्यावर आली....

ओल्या बाळंतीणिला लगेच भूत बाधा होते म्हणून सीमा घाबरून होती....सतत रामरक्षा म्हणे...

उन्हाळा संपत आला....नळाला पाणी येतं नव्हते....नदी च्या पलीकडे एक विहीर होती तिलाच पाणी असे....ओहोटी असताना पाणी आणायला जावे लागत असे....एवढे दिवस...घरातून नोकर, आणि नणंद जात होते...पण आज ती म्हणाली मी पण येते...आता बाळ मोठे आहे...ते राहील सासूबाईंजवळ....

आणि तें गेले...बाळ मस्त राहिले...आता रोज जाऊ लागले ते....असच एकदा नदीतुन जाताना तिचा पाय घसरला...आणि पडली...डोक्यावर असलेला हंडा आणि कळशी आपोआप पाण्यात तरंगल्य....आणि तिला कोणीतरी ओढली असे वाट्त असताना..नोकराने तिला ओढली....सीमा तीच्या विचारात होती....वहिनी...वहिनी...हाक मारली नोकराने....तशी ती भानावर आली....

घरी आली पण तिला काहीतरी वेगळे जाणवत होते...उशीर झाला म्हणून सगळे बाहेर वाट बघत होते....आणि तिला त्या झाडाजवळ ती बाई दिसली अगदी स्पष्ट...हसत होती...बोलावत होती....तेवढ्यात बाळाचा आवाज ऐकला आणि तिने नजर फिरवली....परत बघते तर ती बाई पण भिजून आली होती....तिला समजेना....सासूबाई नि लोटी काढली....नोकर बोलला म्हणुन नारळ काढला....पण ती वेगळ्या विचारात होती...अजय ने तिला हाक मारली तशी ती परत भानावर आली...सगळ्यांना वाटलं ती घाबरली आहे...म्हणून जास्त कॊणी विषय काढला नाही....सगळे झोपले...

सकाळी उठून बघते तर काय??हातावर, पायावर नख उठलेली दिसतात....सीमा घाबरते....तिला लगेच आठवते काल तिला कोणी तरी मुद्दाम ओढले होते पाण्यात तेव्हा जो हात पाय पकडला तिथेच होते नखं आेढलेले....

बघूया पुढच्या भागात काय करते सीमा????

अजय ला सांगेल का??? तिच्या वर कॊणी विश्वास ठेवेल का??? ती बाई परत तिला दिसते का???


अजून लेख वाचत राहण्या साठी मला फॉलो करायला विसरू नका.....

लाइक आणि कंमेंट करत रहा.....

सूचनांचे स्वागत....


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Horror