शब्दसखी सुनिता

Romance Inspirational

4.2  

शब्दसखी सुनिता

Romance Inspirational

आला रंग पुन्हा आला...

आला रंग पुन्हा आला...

13 mins
379


( हि काल्पनिक कथा आहे. आपल्या समाजात वृध्द व्यक्ति म्हटल की त्यांच्याकडे लक्ष फारस दिल जात नाही किंवा आपल्याला वेळ देता येत नाही, ते एकटे पडतात , फारस कुणाजवळ व्यक्त होता येत नाही त्यात जर जोडीदार सोडून गेला तर मग एकटेपणा खायला उठतो. निदान राहिलेल आयुष्यात तरी सोबती नको

का ? आयुष्य थोड जरी राहिल ना आपल्या

मनासारख जगल तर किती छान वाटत... पण

कुणाची तरी सोबत हवी....

अशीच ही स्टोरी आहे....)


जयवंत हा आपल्या कथेचा नायक . घरी अगदी छान होत, आर्थिक स्थितीही चांगली.मुलगा अमेरिकेत डाॅक्टर तर मुलगी प्रोफेसर होती. जयतरावांची बायको मुले लहान असताना आजारपणामुळे गेली, त्यामुळे जयवंत एकटे पडले . नोकरी , मुलांचा सांभाळ , घर चालवणे सगळ एकट्याने केल, कधीच त्यांनी दुसर्‍या लग्नाचा विचार केला नाही.मुलांच भविष्य त्यांना चांगल घडवायच होत , त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही खूप प्रेम दिल दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभ केल.त्यांनी मुलांना परदेशात जाॅबसाठी पाठवल , मुलांच्या इच्छेपुढे त्यांच काय चालणार? आता मुलांनी लग्नही केलेत ते सुखी आहेत , येतात अधूनमधून जयवंतरावांना भेटायला.

त्यांनाही मुलांची आणि नातवंडांची खूप आठवण येत होती, पण काय करणार ? तिकडे जाऊन . आपल्याला इथली सवय, तिथली संस्कृती पण वेगळी आहे. आपण तिथल्या वातावरणात आजारी पडलो तर उगाच मुलांना त्रास , त्यापेक्षा नको रे बाबा . मी इथेच सुखी आहे इंडियात. जयवंतराव रिटायर्ड झाले होते. त्यांचा मित्र माधवही शेजारिच राहायला होता. सगळ ठिक चालल होत फक्त एकच कमी होती. प्रेमाने आपल म्हणनार अस जवळच कुणी नव्हत. शेवटी आयुष्यात उतारवयात आल्यावर सोबत लागतेच ना ! मुलांची जबाबदारी मुळे त्यांनी कधी दुसर्‍या लग्नाचा विचार केला नाही. आज किती दिवसांनी जयंतराव खूप आनंदात होते. ते सारसबागेत एका बाकावर बसले होते. तेवढ्यात माधव तेथे येतो , क्या बात है , आज खूप दिवसांनी जयंता तुला मी आनंदी बघतोय . काय विशेष आहे ? मुले येताय का सुट्टीला ? नाही रे ,माधवा . बस तु आधी मग सांगतो. जयवंतरावांच्या आनंदाच कारण होती ती ... !

ती म्हणजे कोण ? बघूया . ती म्हणजे नीना , कथेची नायिका . न चुकता रोज संध्याकाळच्या वेळी सारसबागेत बसायला येणारी. नीना दिसायला खूप छान , वय असेल साठच्या पुढे पण काही वय दिसत नव्हत. चेहरा पण छान होता, केसही मोठे अगदी व्यवस्थित , केसांत गजरा माळलेला , छान किनार असलेली साडी नेसलेली अस छान व्यक्तीमत्व असलेली नीना. रोज गणपतीच दर्शन घेउन रोज संध्याकाळी नीना सारसबागेत बसून आपला वेळ घालवत असे. बागेत लहान मुले , लोकांकडे बघून नीना स्वतःच मन रमवत असे. सगळ ठीक सोबत कुणाची नव्हती. जयवंतरावही आणि माधव पण रोज बागेत येत. ते नीनाला रोज बघत होते पण कधी बोलत नव्हते. हा पण ही स्त्री एवढी शांत का असते. हा प्रश्न पडत असे. पण अाज काही म्हणा त्यांच लक्ष नीनाकडे गेल .... बघतो तर काय ती खूपच छान दिसत होती.पण काही म्हणा आज जयवंतरावांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. बायको गेल्यानंतर खरतर त्यांनी अस कधी कोणत्याच स्त्रीकडे बघातल नव्हत, पण पहिल्यांदा अस बघत होते.नीना पण रोज फक्त बघत असे , ओळख नसल्यामुळे बोलत नव्हती . दोघांचा बागेत येण्याची वेळ सारखी असावी . ते रोज समोरासमोर जरी बसले तरी बोलत नव्हते , फक्त बघत असे.



दुसर्‍या दिवशी संध्याकाळी गाण गुणगुणत जयवंतरावांनी तयारी केली .आज मुड चांगला होता , काही करुन निदान तिची ओळख करून घेऊ. चला, आधी गणपतीच दर्शन घेऊया , ते आत जाणार , त्यांना ती दिसली . अरे बापरे ! मला भास व्हायला लागले की काय ? नाही ती खरोखरच समोर उभी होती. मी देवाला नमस्कार केला आणि निघालो. बोलायच तर आहे , पण कस बोलू? हिम्मत होत नव्हती . पण तिच्या शांत असण्याच कारण मला जाणून घ्यायच होत .शेवटी न राहवून मीच म्हणालो , हाय , तुम्ही आज इकडे कश्या ? ती थोडी हसली आणि म्हणाली, मी रोज येते गणपतीच दर्शन घ्यायला. तुम्हीपण रोज येता का ? मी म्हणालो, नाही मी कधीतरीच येतो. अच्छा. तुम्ही रोज येता ना सारसबागेत . हो मी रोज येते. आम्ही दोघेही बोलता बोलता बाग कधी आली समजलच नाही. बसताना आज मी तिच्या शेजारी बसलो आणि विचारल तुम्हाला चालेल का मि इथे बसलेल. हो अवश्य बसा तशीपण माझी कोणाशी ओळख नाही आणि मी एकटिच बसलेली असते. बसा तुम्ही. तेवढ्यात मी म्हणलो तुम्ही कुठे राहता ? माझा इथे जवळच फ्लॅट आहे , मी एकटीच राहते. ती बोलता बोलता थांबली आणि म्हणाली तुमच्या बद्दल सांगा ना ? मी पण जवळच राहतो, दोन स्वतःचे फ्लॅट आहेत , एकटाच असतो. मुले दोन्हीही अमेरिकेत जाॅब करतात . तिथेच स्थायिक झालेत. येतात कधीतरी भेटायला. ती माझ्याकडे बघत होती , सगळ ऐकत होती. मी काहितरी विचारणार तेवढ्यात माधव तिथे आला.काय रे जयंता , चल ना एक फेरी मारून मग बसू . मग काय मला ऊठावच लागल. ती म्हटली तुम्ही जा. मी बसेन एकटी. तुमचा मित्र आलाय ना! हो . काय रे माधवा, आज बरोबर वेळेवर आलास , हो आलो , लवकर आटोपल. हो का मी म्हणालो. अरे हा! मला समजल तुला तिला बोलायच होत मी मध्येच आलो , कबाब में हड्डी. साॅरी साॅरी जयंता. नाही रे तस काही नाही.चल आता. जयंता आणि माधव बाकावर गप्पा मारत बसले, पण जयंताच लक्षच नव्हत . सगळ लक्ष तिच्याकडे होत. अरे देवा! नाव तेवढ विचारायच राहून गेल. मनातच मी म्हणालो. हा माधव आला ना मध्ये , बोलण अपूर्ण राहिल. जाऊ दे , ओळख तर झाली ना! कल देखेंगे, म्हणत जयंता हसायला लागला गालातल्या गालात. काय झाल रे जयंता ? मी काय म्हणतोय , तुझ लक्षच नाही माझ्या बोलण्याकडे.काय ? कुठे हरवलास ? तेवढ्यात माधवच लक्ष समोरच्या बाकावर तिच्याकडे जात. अच्छा, तुझ लक्ष तिकडे हाय व्हय . समजने वालो को इशारा काफी है मेरे दोस्त. अस म्हणत माधव चिडवू लागला जयंताला. काय रे हे ? काय झालय , बरा आहेस ना. हो रे, तु समजतोस तस काही नाही.अरे जयंता, तुझी परिस्थिती माहित आहे तु खूप सोसलय . दिवसरात्र मेहनत करून तु मुलांना वाढवल, मोठ केल, स्वतःच्या पायावर उभ केलस. त्यांची लग्न करून दिली, परदेशात पाठवल पण स्वतःच कधी विचार केला नाही.हो रे माधवा खर आहे, मुलांच्या भविष्य घडवायच होत. पण काही म्हणा तू खूप आनंदी आहे, तिच्यामळे का होईना तुझ्या चेहर्‍यावर आज स्माईल आल.किती दिवसांनी तु आनंदात दिसतोय. एक वेगळच तेच तुझ्या चेहर्‍यावर पाहतोय. अरे माधवा पुरे ! किती चिडवशील.चल घरी निघूया,अंधार पडायला लागला.हो चल. अस म्हणून दोघेही घरी गेले. जयवंतराव घरी आले पण मनाने सारसबागेतच होते.ते सारखा तिचा विचार करत होते, ती एवढी शांत का असते? काय कारण असेल , विचारल तर सांगेल का ? नाही नको. उगाच तिला वाईट वाटेल ,माझ्या बोलण्यामुळे. असा विचार करत करत जयवंतराव झोपी गेले.

इकडे नीनाही त्याचा विचार करत होती कोण आहे तो? कधीही आपण पुरूषांशी बोलत नव्हतो...आणि आज काय झालय? तो माझ्याशी बोलला, मीही बोलले . खूप बर वाटल मनातल व्यक्त करून. का अस ? वाटतय कुणास ठाऊक ?


संध्याकाळचे चार वाजले. नीनाने चहा घेतला आणि बागेत जायची तयारी करायला लागली. कोणती साडी नेसू खरतर हा प्रश्न तिला कधच पडला नव्हता.कारण हातात येईल ती साडी नेसत होती.पण आज ठरवून तिने छान साडी नेसली होती.मोगर्‍याच्या फूलांचा छान गजरा केसात माळला आणि ति आरशात बघू लागली.अरे बापरे , काय झालय मला ,एकदम ऑफीसचे दिवस आठवले. ती गालातल्या गालात हसली अन् तिने मंदिराकडे जायचा रस्ता धरला.आज तिला बोलाव म्हणून जयवंतराव लवकरच येऊन बसले. काय योगायोग आज ती पण आताच आली.मी तिच्याकडे बघत होतो आणि ती कधी माझ्याजवळ येऊन ऊभी राहाली समजलच नाही.ती म्हणाली अहो, कधी आलात ? मी तेवढ्यात भानावर आलो ... हे काय आताच आलो. तिने विचारले बसू का इथे. हो बसा ना. तुमचा मित्र नाही आले का?

नाही तो नाही येणार आज ,बाहेर गेलाय. ओके.मी म्हटल तुमच नावच विचारायच विसरलो, नीना माझ नाव . मग काय म्हणताय सगळ ठीक ना? हो ,ठीकच म्हणायच . या वयात देवाने चांगल आयुष्य दिलय, त्याचीच कृपा म्हणायची.घरी कोण कोण असत ? कोणी नाही एकटीच असते मी.म्हणजे मुल कुठ असतात? अहो मी लग्नच नाही केल. मला दोन बहिणी आणि एक भाऊ हे सगळे लहान माझ्यापेक्षा.आई आजारी होती.काम करून शिक्षण पूर्ण केल.मी हुशार होते म्हणून लगेच बँकेत नोकरी मिळाली. घरच काम, आईकडे लक्ष देणे,नोकरी करता करता दिवस जात होते. त्यातच आईच आजारपण वाढत गेल आणि ति एक दिवस आम्हाला सोडून गेली. तिच्या डोळ्यात पाणी आले. साॅरी नीना , अहो साॅरी नका म्हणू. तेव्हा लग्नाच वय झाल होत पण भावंडांची जबाबदारी माझ्यावर होती. मीच मोठी ना , आईसारखी त्यांना.त्यांना शिकवल, प्रेमाने वाढवल , बघता बघता कधी भावंडे मोठी झाली ते कळलच नाही.मग लग्न झाली सगळ्यांची ते आता सुखी आहेत , सगळ्यांच आयुष्य छान अगदी मजेत , बोलताना जरा नीनाला भरुन आल. तेवढ्यात मी म्हणालो, तुम्ही खूप ग्रेट आहात . सगळ्या भावंडाच आयुष्य तुम्ही मार्गी लावलत.तेवढ्यात ती शांत झाली आणि म्हणाली,मीच नुसती बोलत राहिले, साॅरी हा ! मला बोलताना भानच नाही राहिल.काही नाही इट् स ओके.मी म्हणालो.जयवंतराव तुम्ही बोला ना मीच मगापासुन बोलत आहे.माझ सगळ ठीक चाललय.मला दोन मुले आहेत.चांगला जाॅब करतात. अमेरिकेत स्थायिक आहेत.येतात भेटायला.माझी बायको मुल लहान असताना मिच केल सगळ मुलांच. ओ साॅरी! माझे पाणवलेले डोळे बघून दुसरा विषय बदलला.खर सांगू एकटेपणा फार वाईट.उतारवयात खूप त्रास देतो. हो ना. गप्पा मारता मारता दोन तास कधी संपले समजलच नाही.नीना म्हणाली,चला मी निघते.थांबा मला पण निघायच आहे.आपण बाहेर चहा घेऊया का ? हो,नक्की चला.आम्ही दोघांनी चहा घेउन एकमेकांचा निरोप घेतला.

नीना घरी आली.तिला वाटल आपण या व्यक्तीलो. खरच त्याने किती सोसलय आयुष्यात. आपल दुःख तर त्याच्यापुढे काहीच नाही.पुरूष असून किती केलय त्याने कुटुंबासाठी आणि मुलांसाठी.काही म्हणा त्याच्यासोबत मन मोकळ केल आणि खूप बर वाटल.तिने जेवण केल आणि टिव्ही बघत झोपी गेली.इकडे जयवंतराव ही नीनाबद्दल विचार करत होते.खूप चांगला स्वभाव आहे नीनाचा.साधी,सरळ विचारांची. किती केलय भावंडांसाठी नाहीतर या जगात कोण करत इतक ? एवढ करून आज ती एकटीच राहते, स्वतःच सगळ करते.मला तर काही झाल तर नातेवाईक , मित्र आहेत.पण आपल अस हक्काच माणूस पाहीजे ना. त्यात काय वाईट आहे.लोक काय काहीही म्हणतील.पण कुणीतरी सोबती हवाच. एकट्याने आयुष्य जगण कठीण आहे.वृध्दत्व फार वाईट अवस्था.एकट असल तर सगळ आपल आपल्याला कराव लागत.त्यात कोणीफारस लक्षदेत नाही. वेळ नसतो.हे चालायचच कारण घरोघरी मातीच्या चुली.पण आमच्या दोघांची परिस्थिती सारखी आहे.मी अस का वागतोय.हा विचार याआधी कधी आला नाही,पण मला नीनाबद्दल अस का वाटत? काळजी वाटन, तिचाच विचार येण हेच खर प्रेम होय. मला तिची साथ हवी, आधार हवा आहे.तिलापण माझी सोबत होईलच की! मग काय नीना हो म्हटली की राहालेल आयुष्य मस्त जगायच.


दोघेही आम्ही एकमेकांना खूप ओळखायला लागलो.एकमेकांना खूप गोष्टी शेअर करू लागलो.चांगली मैत्री झाली.खूप बर वाटत , नीना सोबत असल्यावर, बोलत,हसत वेळ निघून जातो.पण नीनाच्या चेहर्‍यावर आता दररोज छान स्माईल असते, केवढी आनंदात असते.बागेत फिरणे, तासन् तास बसणे,गप्पा मारणे रोजच झाल होत.कधी चहा... तर कधी ओली भेळ घ्यायचो.मला ती खूप आवडायला लागली.बोलत बोलता नीना म्हणाली जयवंतराव तुम्ही मला नावाने हाक मारत जा.अहो- काहो पेक्षा सोप आहे आणि जवळच्या माणसाने तर नावाने हाक मारली तर ऐकयलाही बर वाटत.मी हसलो आणि म्हणालो, नीना आपण उद्दा दुपारी सिनेमाला जाऊया का ? तुला चालेल का ? हो मग चालेल काय म्हणजे धावेल. मी खूप दिवसांतुन बाहेर गेलीच नाही. नक्की जाऊया मला आवडेल.ती हसली आणि म्हणाल बाय उद्दा भेटूया.ओके.

दुसर्‍या दिवशी मी नीनाला पिकअप करायला ड्रायव्हर सोबत बसस्टाॅपवर गेलो, नीना तिथे उभी होती.छान मस्तपैकी पिंक रंगाची साडी नेसलेली,एका हातात थोड्या बांगड्या मॅचिंग साडीवर, घड्याळ, केसात गजरा. पर्स अडकवलेली खूप छान दिसत होती, पाहतच राहाव अस! मी ड्रायव्हबला म्हटलो, थांब इथे,बसस्टाॅपजवळ.त्याने गाडी थांबवली,मी खाली उतरलो.नीनाकडे बघतच राहीलो.तिनेच विचारल,आलात का ? ट्रॅफीक नव्हत ना ? निघूयात का ?माझ लक्षच नव्हत, ती परत म्हटली निघायच न ? तेव्हा मी सावरल , हो निघूया कि गाडी थांबली आहे.आम्ही दोघेही गाडीत बसलो.नीनाला रोजच बघतो पण ती आज नेहमीपेक्षा सुंदर दिसत होती, क्षणभरासाठी माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.तरूणपणीचे दिवस एकदम आठवले.मी अजूनही गाडीत तिच्याकडे अधूनमधून बघत होतो आणि तीही बघत होती.मग मीच गप्पा मारायला सुरूवात केली.एक सांगू का नीना , सांगा ना.तु आज खूप छान दिसते, थँक्यु .फक्त आजच छान दिसते का ? नाही तस नाही रोजच दिसते पण आज जास्तच छान दिसते. नीना हसली आणि म्हणाली तुमच आपल काहीतरीच हा! आम्ही सिनेमागृहाजवळ पोहोचलो, ऊन खूप वाढल होत म्हणून दोघांनी फ्रुटज्युस घेतला. आम्ही आत जाऊन बसलो.नीनासोबत अडिच तास सिनेमाचा कधी संपला समजल नाही.खरच सोबत कुणी असेल वेळ पण लवकर निघून जातो हे मला समजल.आम्ही गाडीत बसलो.नीना मला थँक्यु म्हणाली ,अग त्यात काय एवढ , आपला छान वेळ जावा म्हणून मी हे केल.बोलता बोलता बसस्टाॅप अाल,नीनाला सोडल आणि मी घराच्या दिशेने निघालो.माधव तेवढ्यात घरी आला.काय रे, बाहेर गेलतास का आणि तेही एकटाच का ? नाही रे नीना होती सोबत , सिनेमाला गेलो होतो.अरे व्वा ! जयंता मस्तच हा , खूप छान. किती दिवसांनी बाहेर पडलास , काही म्हणा नीनाच्या मुळे तुझा हरवलेला आनंद परत आला. मी खूप आनंदी झालो.इस बात पे मेरी तरफ से चाय ! त्याने चहा केला, चहा घेत घेत गप्पा सुरू झाल्या.मध्येच माधवने जयंताला म्हटले, जयंता एवढे दिवस झाले निना आणि तुझ्या मैत्रीला. तु तिला लग्नाच का नाही विचारत.छे,छे! काहीतरी काय ,माधवा.तिला कय वाटेल ? अरे तु तिची एवढी काळजी घेतो, तिला जपतो याला प्रेम नाही म्हणत तर काय ? असेल माधवा.काही म्हण पण मला नीनाची साथ हवी आहे. पण तिला दुखवून नाही. उगाच चांगली मैत्री गमावून बसेल मी,मला भिती वाटते , मला तिला गमवायच नाही.नाही रे जयंता, तु विचार करतो तस काहि होणार नाही. ती पण एकटीच असते, मला वाटत ती नक्की हो म्हणेन.बर माधवा विचारून बघतो.चल खूप उशीर झाला.मी निघतो घरी, जपून जा रे माधवा.

नीनाला आज खूप छान वाटत होत.आज पहिल्यांदा जयंतामुळे बाहेर पडले, खूप इन्जाँय केला आजचा दिवस. आपण स्वतःसाठी जगायच विसरून गेलो होतो पण त्याच्या येण्याने माझ नवीन आयुष्य सुरू झाल्यासारख वाटत. पण काही म्हणा साथीदार असावा तर जयंतासारखा.सोबती हवा तर त्याच्यासारखा.आपल्याला आधार देणारा,सांभाळून घेणारा, खरच असाच कोणीतरी मित्र असावा.जयंताला कस विचारू.नको.मी फारच विचार करते जरा जास्तच.मी प्रेमात तर पडले नाही ना त्याच्या.किती छान आयुष्य जगते मी सध्या,खूप छान चाललय जे आहे ते ठीक आहे .बाकीचा विचार नको करायला.


नेहमीप्रमाणे नीना मंदिरात जात असताना तिथे तिला लोकांची गर्दी जमलेली दिसली.ती गर्दीत जाऊन बघते तर काय ? जयंता तिथे चक्कर येऊन पडलेला दिसला.नीना लगेच समोर जाते.जयंताला पाणी शिंपडते पण तो काही उठत नाही, बेशुध्द असतो मग तिला काहीच समजत नाही, तेवढ्यात लोक म्हणतात. आजी , तुम्ही थांबा.अँब्यूलन्स बोलवू. हाॅस्पिटल मध्ये घेऊन जाउया. बर .अँब्युलन्स आली , नीना त्यांच्यासोबत हाॅस्पिटलमध्ये गेली.तिथे पोहचल्यावर जयंताला ॲडमीट केल डाॅक्टरांनी.नीना खूप घाबरली होती.काय झाल असेल? तिला रडायला येत होते.पण डाॅक्टर बाहेर आले व म्हणाले, काळजी करण्यासारख काही नाही.बिपी लो झाला होता.आपण ट्रिटमेंट सुरू केलीआहे. ते ठीक होतील. नीनाला थोडा दिलासा मिळाला तिने देवाचे आभार मानले.नीनाने माधवला फोन करून बोलून घेतले. माधव ताबडतोब आला.त्याने जयंताच्या तब्येतीविषयी डाॅक्टरांना चौकशी केली.डाॅ. म्हटले होतील ते बरे एक दोन दिवस ॲडमीट. त्यांना विकनेस आलाय, बिपी पण लो आहे , ओके सर , जे योग्य वाटत ते करा तुम्ही फक्त माझा मित्र बरा झाला पाहीजे.माधव व नीना जयंता जवळ बसले होते, तो शुध्दीवर येण्याची वाट बघत.हळूहळू जयंता हालचाल करत होता, शुध्दीवर येत होता, त्याने हळूच डोळे ऊघडले.आजूबाजूला बघितले बघतो तर काय नीना आणि माधव शेजारी बसलेले दिसले.जयंता ऊठणार तेवढ्यात नीना म्हणते अहो झोपा तुम्ही ऊठू नका. डाॅक्टरांनी आराम करायला सांगितलय.सलाईन चालू आहे.अरे माधवा मी इथे कसा? कोणी आणल मला इथ ? अरे थांब जरा सांगतो. तु रस्त्यात चक्कर येऊन पडला होता, नीनाने तुला बघीतल आणि तिने तुला इथे आणल. नीना साॅरी! माझ्यामुळे तुला त्रास झाला, धावपळ झाली तुझी.अहो साॅरी काय त्यात, आपल्या माणसांचा त्रास कधीच होत नाही.माधव म्हणाला तु आराम कर आता आम्ही दोघेही इथेच आहोत.दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला खूप बर वाटल , घरी आलो. जयंत हळूहळू बरा होत होता पण नीना न चुकता घरी येत , प्रेमाने जेवू घालत, ओषधे देत असे. माधव पण खूप काळजी घ्यायचा.जयवंतराव बरे झाले.त्यांच्या लक्षातआल की नीना आपल्यासाठी किती धजपड करते.तिच्यामुळे आपण ठीक झालो.आपण लग्नाच विचारायला हव. मला पण तिची काळजी घ्यायला हवी.

जयंताने मुलांना नीनाबद्दल सांगितल. आजारी असताना त्यांच्यासाठी केलेली धडपड पण सांगितली . मुलांना खूप आनंद झाला.ती माझी खूप चांगली मैत्रिण आहे.स्वभाव छान आहे आणि मनानेही.ते म्हणाले बाबा , आम्ही आधीच म्हणालो होतो तुम्ही लग्न करा म्हणून पण वेळ गेली नाही. आता तरी विचार करा.बाबा , आयुष्यात सोबत हवीच. आमचा होकार आहे.तुम्ही इतक्या दिवस आमच्यासाठी खूप केलत.माधव काकांना सांगा तयारी करायला. आम्ही दोघेपण येऊ.हो. बाय बाबा , काळजी घ्या.जयवंतराव त्याच दिवशी नीनासाठी गिफ्ट घेऊन तिच्या घरी गेले. नीनाला काही समजत नव्हत , तिने विचारल काही काम आहे का ? मी म्हणालो. हो . बोला ना,आणलेल गिफ्ट नीनासमोर धरल आणि विचारल, नीना... लग्न करशील माझ्याशी ? साॅरी तुला नाही आवडणार , तुझा नकार असला तरी आपण चांगले मित्र राहू.नीना मनातून खूप आनंद झाला , काय बोलाव तिला सूचत नव्हत.डोळ्यात थोड पाणी आल तिच्या अन् ती हो म्हटली.अस कधी कोणी पहिल्यांदा विचारत होत.नीनाने हो म्हणताच जयंताला खूप आनंद झाला.दोघेही एकमेकांकडे बघत हसत होते.बर नीना तु तुझ्या भावंडांची परवानगी घे. ते हो च म्हणतील.त्यांच काही नाही रे जयंता.

जयंता निघणाार तेवढ्यात नीना म्हणते, एक सांगू मला हे राहिलेल आयुष्य तुझ्यासोबत जगायला नक्की आवडेल. जयंता नीनाचा निरोप घेउन घरी येतो, खूप आनंदात असतो. जयंता माधवला मिठी मारतो आणि म्हणतो माधवा तुझ्यामुळेच हे सगळ घडून आल.जयंता तुझ्या आनंदासाठी काहीही करेल, हो. तयारी करूया.नीनाने आणि जयंताने सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रीनींना आमंत्रित केल होत. जयंताचे दोन्ही मुले आले होते. नीनाचे भावंडे आले होते.सगळ्यांना खूप आनंद झालेला दिसत होता. नीना आणि जयंताच लग्न मोठ्या उत्सवात लावून दिल. दोघेही खूप खुश होते.मैत्रीच, प्रेमाच नात आणि आता लग्न. जयवंत रावांच आयुष्य नीनाच्या येण्याने उजळून गेल. दोघांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले.पुन्हा एकदा आयुष्य जगायला लागले, एकमेकांच्या साथीने.दोघेही एकमेकांना सांभाळत, समजून घेत, एकमेकांची काळजी घेऊ लागले.दररोज गणपतीच दर्शन मग बागेत जाऊन बसणे.हा त्यांचा दिनक्रम झाला होता.नाटक, सिनेमाला जाणे, बाहेर फिरायला जाणे.खूप आनंदात, मजेत दिवस जगत होते दोघेही.


     जयवंतराव आणि नीना एकमेकांच्या आयुष्यात

आल्याने त्यांच राहीलेल आयुष्य आनंद, प्रेमाच्या

रंगांने उजळून गेल...

दोघांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन

प्रकाशाचा रंग पसरला होता... दोघेही

एकमेकांच्या आयुष्यात आल्याने आधी

Black & white असणार त्यांच आयुष्य

कलरफुल झाल होत.....


( प्रेमाला काही वयाच बंधन नसत.ते कधीही होउ शकत.फक्त खर प्रेम ओळखता आल पाहीजे.नीना आणि जयवंतरावांच प्रेमही निःस्वार्थी होत.त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाने त्यांना राहिलेल आयुष्य सोबत जगण्याची प्रेरणा दिली. )

( समाप्त )


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance