आज मी उडयेय...
आज मी उडयेय...
रिना आणि अजिंक्य दोघेही एकमेकांना तीन वर्षापासून ओळखत होते. एकाच ऑफीसात काम करत होते. त्यांची चांगली मैत्रीही झाली होती. मैत्रीच रूपांतर कधी प्रेमात झाल त्यांनाही कळल नाही.पण दोघेही खूप समजदार होते. दोघेही घरच्यां च्या विरोधात जात नव्हते. त्यांनी ठरवल होत की काही झाल तरी आपली मैत्री कधीच तुटणार नाही. अजिंक्य एकटाच होता. त्याचे आईबाबा त्याच्या आनंदातच आपला आनंद मानत होते. त्याच्या घरच्यांना पण रिना आवडत होती. पण रिनाच्या घरी सांगितल तरी बाबा नकारच देतील.म्हणून ती कधीच विषय काढत नसे. " अजिंक्य रिनाचा चांगला मित्र आहे. " हे तिच्या घरच्यांना माहीत होत. तो तिच्या घरी अधूनमधून येत असे. तिची मैत्रिण काजल तिला नेहमी अजिंक्यवरुन चिडवायची पण ती तस काही नाही आमची छान मैत्री आहे एवढच बोलून विषय टाळायची. पण मनाने तर अजिंक्यसोबतच्या स्पप्ने बघायची. ती त्याच्यात गुंतली होती मनाने पण घरचे राजी होतील की नाही आणि तिला अजिंक्यला गमावण्याची भिती वाटायची म्हणुन ती गप्प राहायची. दोघेही सोबतचे क्षण मनापासुन जगत होते.
एक दिवस रिनाला आफीसमधून घरी यायला खुप उशीर झाला. बाबा रिनाची वाट बघत खिडकीत बसले होते. पावसाळ्याचे दिवस होते. सगळीकडे वाहतुक ठप्प झाली होती. ते सारखे काॅल करत होते रिनाला, पण रेन्ज प्रोब्लेममुळे तिला ते फोन जातच नव्हते. ते खुप परेशान झाले. मुलीची काळजी वाटत होती. बाहेर जाव तर खुपच पाऊस कोसळत होता. थोड्या वेळाने पावसाचा जोर कमी झाला. ते तिची वाट बघत होते. खुप उशीर झाला. एकटी मुलगी घरी कशी जाईल. अजिंक्यला तिची काळजी वाटत होती म्हणून तोच रिनाला सोडायला आला तेव्हा रिनाच्या बाबांनी त्याला पाहील. बाबांना त्या क्षणी त्याला पाहून काय त्यांच्या मनात आ ल काय माहीत ? ते आज खूपखुश होते. त्याच दिवशी ते रिनाला म्हटले, रिना अजिंक्य तुझा चांगला मित्र आहे. मग तु त्याचा लग्नासाठी का नाही विचार करत ? तिला काही समजल नाही. तिचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिने परत विचारल. " बाबा म्हटले हो मी अजिंक्यबद्दल च बोलत आहे. तिला खुप आनंद झाला. " आई रिनाला म्हटली, अरे व्वा ! आज सुर्य कसा पश्चिमेकडे उगवला. दोघीही हसायला लागतात. बाबांनी अस डायरेक्ट अजिंक्यला बघुन ठरवल. तो खुप वेळा घरी आलेला होता. त्याचा स्वभाव, मदत करण्याची वृत्ती यांमुळे अजिंक्यने बाबांच्या मनात घर निर्माण केल होत. त्यांना तो बाबा म्हटले मी पाहील आहे त्याला, " तुला उशीर झाला की सोडवायला येतो, काळजी घेतो. समजदार आहे, स्वभावही मला आवडतो." जिंक्यसारखा मुलगा शोधून सापडणार नाही. म्हणून मी ठरवल तोच तुझ्यासाठी योग्यच आहे. पण तुझ्या मनात काय आहे कींवा तुला काय वाटत हे मला जाणुन घ्यायचय. रिनाला तर हेच हव होत मनापासून. तिनेही सांगितल. तुम्हांला तो योग्य वाटतोय, मलाही हेच वाटत. माझी काहिच हरकत नाही अजिंक्यविषयी. ती हसत होती मनातुन. हे बाबांनी पाहील. आईच्याही लक्ष्यात आल. बाबांनी अजिंक्य च विषयी असा विचार केला हे ऐकुन तिने आनंदाने आई बाबांना मिठी मारली. तिला हे ऐकून काय करू नि काय नको अस झाल होत. बाबांनी दोघांच्या नात्याला होकार दिला होता. तिने अजिंक्यला फोन करून बाबांचा निर्णय कळवला, त्यालाही खुप आनंद झाला.
रिनाचा आनंद तर गगनात मावत नव्हता. अगदी तिला आपण आकाशात उडतोय परीसारख. असच काहीतरी मनाला वाटत होत. अगदी त्या गाण्यासारखं...
आज मैं उपर, आसमाँ नीचे
आज मैं आगे, जमाना है पीछे

