Swapnil Kamble

Inspirational

1.9  

Swapnil Kamble

Inspirational

आईची कास

आईची कास

3 mins
17K


तो एक आँगस्ट महिना होता.पाऊसाचा संतत धारा कोसळत होत्या.त्याच दिवशी गणेश चतुर्थी देखील होती. मी त्यादिवशी रेल्वे प्लँटफाँर्म वरती ताटकळत उभा होतो.पावसाची रिमझिम चालु होती. प्रवासाची रेलचेल वाढत होती. उल्हास नगर रेल्वे स्टेशन तुडुंब गर्दीने भरले होते. कारण सि एसटि कडे जाणार्या प्लँटफाँर्म नं 2 वरती पाय ठेवायला जागा नव्हती.कारण त्या दि शेने जाणार्या सर्वच गाड्या उशीरा धावत होत्या...दोन तास अक्शसा बंद होत्या .त्यात दुपारची वेळ होती. गर्दीची रिघ वाढत होती .एका मागुन एक प्रवासींची भर पडत होती. मालडब्बाला चिकटुन लेडिच डब्बा येत असल्याने सर्व महिला मालडब्बाचा बाजुला प्लँटफाँर्मवर उभ्या होत्या. त्याच कडेला चिकटुन मच्छिवाले, फाटे वाले, फेरीवाला , दुध वाले , केले वाले , पाणीपुरी वाले , इडली वाले इतर धंदेवाला मालडब्यासमोर तगादा लावुन उभे होते.आता प्लँटफाँर्म भरगच्च भरला होता.गर्दी शिगेला पोचली होती.गाडी येण्याची चिन्हे दिसत नव्हती.इंडिकेटर आता बंद पडले होते.त्यावर लाल रंग दिसत होता.कुरियर , इतर दळण वळण करणारे व्यापारी, ट्रान्स्पोर्ट चा माल वगैरे ताटकल पडले होते. ह्या सर्वाची गोची झाली होती.जर हे वेळेवर पोचले नाही तर त्याचा आँर्ड रद्द होतात.दुसरे स्वस्त दळणवळणांचे साधन नाही.ट्रेन हेच चांगले सर्व सामान्याचे मुख्ये वाहतुक वाहिनी आहे.मालडब्बचा समोरच मच्छि घेवुन बसलेला भैय्याचा फेट्यात मच्छी चा कुजलेला उग्र वास येत होता.बाजुलाच उभ्या असलेल्या बायका साडीच्या पदरांने नाकावर हात ठेवुन नाक मुरडत होत्या. काहिजण हात रुमालाने वास झटकत होत्या.रिमझिम पडणारा पाऊस गर्मि वाढवत होता.रेल्वे पथाचा कर्र ककर्र आवाज हवा कमी व आवाज जास्त फेकत होता.सुचना देनारी ईंडिकेटर आता ब्लांक झाली होती.रेल्वेची लेडी अनाउंसर मध्येच बर्गलत होती .व सुचना देत होती. 'प्रवाशांना होनार्या गैरसोयीबद्दल आम्ही क्षमा मागतो.काहि कारणास्तव रेल्वे मार्ग सिएसटी जाणारा स्थगित करण्यात आला असल्याने पुढिल माहीती मिळताच त्वरित प्रवाशांना सुचना द्ण्यात येतिल "...तसदि बद्दल क्षमस्व .धन्यवाद…...पुढे हिंदीत व इंग्रजीत अनुवाद करुन बोलत होती.हे सर्व घडत असताना आणखी एक दृष्य नजरेसमोर दिसत होते. एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज महिला मधुन येत होता. एक मध्यम वयाची बाई अंदाजे वय 30-35वयाची महिला असणार. केस विस्कटलेले डोक्यावर कुर्ल्या केसांचा जटा,मळकटलेली साडी परिधान केलेली, पोरका गळा, काळ्याकुट्ट रंगाची सडपातळ बांधा. अनवाणी पाय, दोन्ही हाताचा पकडित बाळाला गोंजारले होते.साडीचा पदराखाली लपटले होते.हातात एक एक एक बांगडी घातलेली .अशा अवस्थेत ति उभी होती.बाळाला छातीशी कुरवाळुन घेतले होते.त्यावेळी एक अफवा सर्रास पसरलि होती लहान नवजात बालकांची चोरीची स्थानिक किंवा सरकारी हॉस्पिटल मधुन अर्भकांची चोरी व्हायची.व ह्या चोरी अशाच पेहराव केलेल्या बायका करायचा असे बातम्यात व वर्तमान पत्र सांगायचे. जास्त करुन मुलांची चोरी जास्त जास्त व्हायची.व त्याना बाजारात चांगला भाव मिळतो.एक आणखी बाई त्या बाईचा पाठलाग करीत होती. साधारण चाळीस पंचेचाळिस वयांची निटनेटकी साडी परिधान केलेली सभ्य व सुशिक्षित दिसत होती. एका खांद्याला लेडीज पर्स लटकवलेले. अशा पेहरावात ती ही तिचा बाजुला उभी होती. त्या बाईकडे एकटक टक लावुन बघत होती.कदाचित तीं तिचा पाठलाग करीत असावी असा मला संशय आला .पण ति तिचा पाठलाग का करीत असावी सभ्य बाई आता खुप जवळ येते तिचा आणि बोलते,'बच्चा रो रहा है,दुध पिलाव उसको,.... एक,नाही दोन नाही...हु कि चु नाही तोंडातून त्याबाईचा. ति बाई काहीही बोलत नव्हती गप्प उभी होती.हात तिचे थरथर कापत होते. आधी आम्हाला वाटले की, गर्मिमुले मुल रडत असेल पण ज्यावेळी हे मुल रडायचे थांबत नव्हते त्या अर्थी आधीच पंख्याचे किरकिर व त्यावर मुलाचा रडणाचा आवाज काण सुन्न करुन टाकत होते.खुप वेळ झाला होता.त्या बाईने छातिला लावले होते. पण तरी ते बाळ रडायचे था्बत नव्हते.त्या सभ्य बाईला संशय येतो.तिचा संशय आणखिनच बळवंत होतो. ज्यावेळी ति त्या बाईचा साडीचा पदर बाळाचा तोंडावरुन हिसकावते.आणि काय आश्चर्य ते मुल दुध पित नव्हते.त्या बाईने तिला दुधाचा अंगाला लपवले होते फक्त.आता त्या सभ्य बाईचा संशय द्विगुणित झाला .त्या सभ्य बाईने तिचा हात पकडला आणि मोठमोठ्याने आेरडु लागली की, "हे मुल ह्या बाईच नाही आहे'तिने कुठुन तरी चोरुन आणले आहे, मि तिचा पाठलाग करीत इथपर्यंत आले.त्या रेल्वेच्या पाठचा झोपडपडपट्टी मधुन ती येत होती.चोर पाउलाने धावत धावत व गडबडीत.मला तिचा संशय आला .मी हिचा पाठलाग करीत इथपर्यंत पोचले. आता खुप बायका जमा झाल्या होत्या.ति बाई कावरी बावरी झाली होती.त्या सभ्य बाई कडे डोळआता खुप बायका जमा झाल्या होत्या.ति बाई कावरी बावरी झाली होती.त्या सभ्य बाई कडे डोळे वटारुन पाहत होती.कदाचित तिचे बिंग फुटणार होते म्हनुन ति पळायचा तयारीत होती.बायका त्या मुलाला हिसकावुन घेण्याचा पर्यंत करत होते.पण ति सोडायला तयार नव्हती तिने त्या बाळाला कवेत घट्ट करकचुन पकडले होते.कसेबसे त्या मुला ला तिचा कचाट्यातुन सोडवण्यात आले .तशी ती हिंसक झाली .त्याबायकांकडे रांगाने बघु लागली.काहीतरी बडबडु लागली .तिथल्या लोकांना ति काय बोलत होती ते समजत नव्हते. आता बायकाणी तिला पकडले चार चांगल्या बायका पढे आल्या व तिला खेचत खेचत रेल्वे चा चौकशी रुम मध्ये बसवले. प्लटफार्म वर गणेशउत्स वाला खेळणी विकणारी एक ग्रुप बेबी ट्रा ली घेवुन वाट पाहत होत्या.चोरलेले मोबाईल विकणारी मंडळी गाठोडं बांधुन बसले होते.बायका पोराबरोबर ट्रेननी वाट पाहत.लवकर ट्रेन चालु झाली की , बायका मंडळासमोर लहान मुलाची हातानी बनवलेलीसखेळणी विकतात,खुळ खुळे लहान मुलांची , तसेच पुरुष जुने चोरले मोबाईल दादर कुर्ला ठाणे स्टेशनला विकतात.ह्या सर्वांची खोळंबा झाला होता.सर्वाना ट्रेन लवकर चालु व्हावी म्हनुन आपापल्या देवाला याद करीत होते. विशेष मणजे भिकारी लोकांची तसेच अंध लोकांची टोळी रखडली होती.करण आज त्याचा धंदा जोरात होणार होता.स्टेशन वरचे भिका्याना कोणी आता भिक देत नव्हते.बुटपाँलिसवाल्यांकडे आता कोणी पाँलिस करायला येत नव्हते.म्हनुन जो तो ट्रेन चालु होवु दे अशी विनती करीत होते.खेळणी विकणारांकडे एक एक ट्राँ ली असते. म्हनु त्यांना "ट्राँली गँग "कारण त्याचाकडे एक ट्राँली असतेच.प्रत्येकजन गुर्पवाईज स्टेशनला विभागले जातात.आजी मंडपाजवळ बस्तान करतिल कारण तिथे लहान मिलांची खेळणी विकली जावु शकतात. तोच दिवस गणेशचतुर्थिचा असल्याने सर्वांनाच घाई लागली होती.विशेष करुन बायकांना त्यामुले रेल्वेचे प्रवासी रेल्वेला दोष देत होते .पंखे हवा कमी व आवाज जास्त देत होते त्या त गर्मी ने ज्व हैराण केला रोता. त्या बाईला चौकीशीरुमध्ये आनले जाते .थ्री स्टार पोलिस येतो.मेन कंट्रोल ला फोन केला जातो.बघ्यांची गर्दी वाढत होती.पुढे येण्यास कचरत होते.चोरीच्या केसेस, हरविल्या केसेस मध्ये लोक जास्त नाक खुपसत नाही .पोलिस आपला इंगा दाखवतात.जोपर्यंत आेळख पटत नाही तोपर्यंत ते सोडत नाही. त्या बाईला चार पाच लेडीज पोलिस कांन्टेबल बोलवणयात येतात.पण ति बोलत नाही.मग एक लठ्ठ बाई तिची डोक्याची केसांचा बट्टा पकडले.डोकं जमिनिवर आपटते.तरी तीं बोलत नाही.तिची कानपटे लाल व सुजली होती मारुन मारुन ..कानसुले लाले लाला झाली होती.एक मद्रासी बाई आपल्या स्टाईल मध्ये विचारते. ती त्या बाईला तिचा भाषेत बोलते. ईनु..ईनु …..?......असे काहीतरी ति व्चार होती.त्यामध्ये ...निम्मा….हा शब्द फक्त आठवत होता. ईल्ला….त्यावर ति बोलत होती.. "निम्मा हेसारु ईनु ".ति बाई तिला नाव विचारते.. अक्का...अक्का….असे मधे ति बोलायची . ईनरे…..ईनरे …..कुट्टु….असे काहीतरी ती बोलत होती. पोलिस लोकांना समजत नव्हते काय करायचे .दोघांना चाईल्ड रिमांड मध्ये ठेवा असे सिनियर बोलतो.त्या दरम्यान एक बाई त्या मुलाला बारीक नजरेने निरखत होती.त्यावर ती जोरात आेरडते. "मुलगा" अशी एक बाई आेरडते गो रापान लाल भडक चेहरा …..फोरीनर वाटत होता. मग, हे मुल ह्याबाईचे असु शकत नाही" ….एक दुसरी बाई बोलते. हि. काळ्या रंगाची , रंगढंग चालढकल बघा हिची वाटतो का हिचं पोर….. मग, पोर बापाचा रंगावर गेलं असणार. बाप फरीनर आहे का?....एक पुरुष व्यक्ती बोलतो….सर्व पब्लिक हसताना. आेके ..आेके...ईन्पेक्टर बोलतो. एक मद्रासी बाई तिला बोलायचा खुप पर्यंत करते पण ती काहीच बोलत नाही.तेवढ्यात ति सभ्य बाई त्यामिलाला घेवुन बाहेर येते त्याच वेळी ते पटकन उठते व चक्क हिंदीत तुटकतुटक बोलु लागते. मेरा बच्चा मुझे दे दो….मै सच सच बोलती हु. हा हे मुल माझेच आहे,मि एका श्रि मंताकडे. घरकाम करत होते.त्या झोपडी मागे बिल्डींगमध्ये.मी घरकाम करायची.दोघे नवरा बायको चांगल्या कंपनी मध्ये कामाला आहेत.त्याचा कडे पैशाला कमी नव्हती कमी होती ती एक लहान मुलाची पण मँडमला खुप वर्ष झाली मुल बाळ नव्हत.ते दोघे दत्तक घ्यायचे ठरवतात पण मालकांची आईला मुल स्वतांचेवंशाच हव होत.डाँवटरने सरोगेट मदरचा प्लान दिला.परकिय देशांत खुप प्रचलित आहे.मग ते दोघे जन मला ह्या कामासाठी निवडलात.मला पैश्याची आमिष दाखवली जातात.मक् पैसे पाहुन राजी होते.मूग मला एका हाँस्पिटल मध्ये घेवुन जातात.तिथे माझा गर्भात पुरुषी शुक्रानु सोडतात.मग महिनाभर माझी सोनोग्राफी केली जाते.अंडी फुटण्याची वाट पाहु लागली ..लगेच पुरुषी शुक्रानु सोडण्यात येतात.मग काहीच दिवसात मि गरोदर राहते.तिन चार महिने माझी चांगली देखभाल करण्यात येते.मला हव ते खायला देतात.मिही मनाला हव ते खात होते.

अखेर नववा महिना उजडला,माझ नाव आगोदरच जवळचा महागड्या हाँस्पिटल मधे नोंदवण्यात आले होते.मग पंधरा दिवसाची माझी डिलेवरी होते.मला मुलगा होतो.माझ हे पहलीच बाळंतपण होतं.मि जाम खुश होते.माझ स्वतांच बाळ मि पहिल्यादा पाहाणार होत.पण मला माझ बाळ दाखवले नाही.माझ्या अंगावरच आईच दुधही देण्यात आले नाही .सांगितल की माझ्या दुधाची सवय लागु नये म्हनुन त्याला माझ दुध दिलो गेले नाही.मला दुसर्याच दिवशी डिस्चार्च देण्यात आला.माझ्या कामाचे पैसे देण्यात आले .मला रेस्ट घेण्यास डाँक्टरांनी सांगितले होते.पण मला सारखे माझ बाळ डोळ्यासमोर दिसत होते.माझी नाँर्मल डेलिवरी झाली होती.मला प्रस्रुत यातना खुप होत होत्या.नऊ महिणे माझ्या गर्भात मि एका जिवंत जिव वाढवत होते.मि त्याबाोळासी पोटात असताना बोलत असे .ते लाथा घालायचे मला कळा मारायचा पण मि सर्व सहन करायची मला त्या बाळाचा एकप्रकारे लळा लागला होता. दोन महिन्यानंतर मि पुन्हा त्या घरात घरकामासाठी बोलावण्यात आले.त्यामुलाची देखभालकरायला.नवरा बायको दोघे कामाला जायचे.मि आणि लहान बाळ दोघेच तघरात असायचो.बाळाला मि माझे दुध देण्याचै प्रर्यंत केले .पण त्याला अंगावरची दुधाची सवय नव्हती.त्या ला बाँटलचै दुध देत होते.मि रडत होते.माझ दुध अंगावरच पाझरत होते.घरंगळत होते.मि आई असुन माझं दुध देवु शकत नव्हते.मि माझी कुस विकली होती.माझ गर्भपिशवि विकली होते.पण माझ्यामध्ये आलेले मातृत्व दाबु शकत नव्हते.ते नैसर्गीक माझ्या अंगी आले होते.आईचं प्रेम जे विकता येत नव्हत.माझ्या अंगावरचे दुध मि हॉस्पिटल मध्ये जावुन विकायचे;पण तरी दुध कमी व्हायचे नाही.अखेर एकदा मी मालक व मालकिण फिरायला बाहेर गेले होते.संध्याकाळ पर्यंत येणार नव्हते.मी डाव साधते मुलाला पळवते.रस्त्यात ति पाठलाग करणारी बाई सापडते.माझ्यावर संशय येतो तिला ति पाठलाग करते.रेल्वे पर्यंत येते. तिची दारुन कहाणी ऐकुन सर्वच भांबावुन गेले होते.एक बाई तिची कास पिळुन बघते तिचातुन दुध पाझरत होते.आेसांडुन वाहत दुधाची तुरुली लागली होती.आता सर्वांना खात्री झाली होती की हे मुल त्याबाईंचंच आहे. पण ति सभ्य बाई कुठे गेली .ते मुल कुठे गेले .ति बाई ने पळवुन घेवुन गेली होती...त्यामुलाची आई आता जोरजोरात ओक्साबोक्सी रडत होती.तिच मुल चोरीला गेले होते.रेल्वे पोलिसांची शिप्ट चेंज झाली होती.गर्दी पांगली होती .पोलिस आता ह्या घटनेतुन अंग काढीत होते."ओ उसकी ही साथी रहेगी " बोलुन विषय रफातफा केला.रेल्वे लेडी आनाृउंसर माईक वरुन ट्रेन सुरळित चालु झाल्याची बातमी देत होती.प्रवाशी आता जाम खुष होते.आपआपल्या वाटेला लागले.पण ति बाई एकटिच रडत डोके आपटुन घेत होती. 



लेखक: स्वप्निल राघो कांबळे 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational