akshata alias shubhada Tirodkar

Classics

4.0  

akshata alias shubhada Tirodkar

Classics

आई वडील

आई वडील

2 mins
404


अनुज आणि अनिता चे लग्न होऊन ६ वर्ष झालेली पण त्याना संतती सुख लाभले नव्हते वंशाची वेल कशी पुढे जाईल हि चिंता अनुजच्या घरातल्याना पडली होती अनुज हि हतबल झाला होता. पण अनिता मात्र त्या विश्वासावर सगळं काही सहन करत होती तो विश्वास म्हणजे देवावरची तिची श्रद्धा. तिला आशेचा किरण दाखवत होती आणि ती त्या आशेच्या किरणावर जगत होती. अनुज ने तिला संभाळायला हवे होते पण तीच अनुजला धीर देत होते डॉक्टर उपचार आणि देवभक्ती ती आपल्या परीने करत होती तिला पण मातृत्वाची आस लागली होती पण नशीब तिला साथ देत नव्हतं. 

पण म्हणतात ना देव कधी कधी आपली परीक्षा घेतो, असेच काही अनिता चे झाले देवाच्या कठीण परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. तिच्या गर्भात एक फुल उमगलं आणि तो दिवस दोघांसाठी अति आनंदाचा ठरला. त्या दिवसापासून अनुज ने अनिता ची सेवा करण्यास सुरवात केली तिला काय हवं नको ते पाहू लागला अनिता ह्या दिवसात आनंदी राहावी ह्या साठी त्याचा चालेलं खटाटोप पाहून अनिता ला हि भरून यायचं. 

असेच दिवस जात होते फुल गर्भात फुलत होत त्यात होणाऱ्या वेदना अनिता सह अनुज हि सहन करत होता आणि अखेर तो दिवस आला अनिता ला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले इथे अनुज ला धडकी भरली सगळं काही सुखकर घडो यासाठी त्याच्या देवाकडे मागणे सुरु झाले आणि २ तासांनी त्या गोड बातमी कळली कि त्याला कन्यारत्न झाले मग काय तो तर सात आसमान उप्पर पोहचला साऱ्या हॉस्पिटल मध्ये त्याने पेढे वाटले. 

कधी एकदा तो आनंद अनिता बरोबर घालवतो असं त्याला झालं होत पण अनिता अजून हि शुद्धी वर आली नव्हती थोड्या वेळाने तो पळत अनिता कडे गेला तर अनिता शुद्धीवर आलेली व आपल्या त्या फुलाला दूध पाजत होती अनुजच्या चेहऱ्यवरचा आनंद अनिता ला जाणवत होता अनिता च्या समोर येताच अनुज मोठ्याने म्हणाला "अनु आपण आपल्या पिलूचे आई वडील झालो "अनिता शरीराने अशक्त होती पण मनाने आज ती खूप ताकतवान झाली होती, तिच्या चेहऱ्यावर अलगद समाधानकारक हसू उमटले 


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics