STORYMIRROR

Sagar Bhalekar

Inspirational Others

3  

Sagar Bhalekar

Inspirational Others

आई तुझे थोर उपकार !

आई तुझे थोर उपकार !

3 mins
459

      असे म्हटले जाते, की 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवन हे खर्‍या अर्थाने जीवनच नाही. सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून एक साक्षात देवता आहे. "आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई. इतक्यात कुठेतरी ऐकण्यात आले कि….. आणि खरंही आहे ते अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता पाहणारा तो एकटा काय पाहणार? यावर उपाय म्हणून त्याने सर्वप्रथम आई बनविली असे वाटते, यात त्याचादेखिल स्वार्थ असावा, कारण ब्रम्हांडातून एक व्यक्ती पृथ्वीवर पाठवायला त्याला फारसे कष्टही पडत नाही अणि त्याच्या जबाबदार्‍याही झटकल्या जाऊ शकतात. याशिवाय त्याचा मुख्य स्वार्थ म्हणजे व्यक्ती एक भूमिका अनेक याचाही साकार होतो.खरंच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. अगदी आईपासून ते आईपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात डोकावून पाहाल तर त्या व्यक्तीच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.

तुमच्या आमच्या जीवनात आईच्या सहवासात राहताना कधी आईच रहस्य आपण जाणूनच घेतले नाही. खरच तिच्याकडे एकदा शांतचित्ताने डोकावून पाहाल तर तिच्या स्मित हास्यात नक्कीच ईश्वराची प्रतीमा तुम्हाला दिसेल. हा माझा ठाम विश्र्वास आहे.आईच्या सहृदयतेबाबतची कथा सर्वानाच ठाऊक आहे, ती की ठेच लागुन पडलेल्या मुलाला त्याच्या हातात असलेले आईच काळजी देखील विचारते, की बेटा तुला काही लागले तर नाही ना? यावरून आईचे काळीज आपल्या मुलाची किती काळजी घेते तर मग प्रत्यक्ष जीवनातली आई किती श्रेष्ठ असेल याची अनुभूती येते. पुत्र हा कधी ही कूपुत्र होवू शकतो, परंतु आई कधी कूमाता होवू शकत नाही. म्हणूनच म्हटले जाते की आईसारखी आईच….!

माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. गरीब म्हण्यापेक्षा दरिद्री कुटुंबातच झाला होता. गावाबाहेर असलेल्या एका कळकट वस्तीत माझे घर होते. माझी आई दिसायला खूप सुंदर होती पण मात्र नशीब तिचे खुप फुटके होते. ती जेव्हा लग्न होऊन ह्या घरात आली तेव्हा तिनेदेखील माझ्यासारखी खूप स्वप्न बघितली होती. कदाचित तिची स्वप्न चंद्राची मागणी करण्यासारखी असावीत. आई माझ्यासाठी मात्र नेहमी स्वप्न बघायची आणि आपल्या मुलासाठी स्वप्न बघत असताना ती मात्र कधी कधी उपाशी पोटी राहायची.अनेक चेहरे बदलताना पहिले आईला मात्र प्रत्येकवेळी प्रेम करतानाच पाहिले. माझा बाप बेवडा होता. मी लहान असतानाच तो देवाकडे निघून गेला. नंतर आईनेच मला लहानाच मोठे केले. मी खूप शिकून परदेशात गेलो. इथे येऊन मी खूप नाव कमावलं. बंगला, गाडी, हाताखाली नोकर चाकर आली माझ्या हाताखाली. 

आईस पत्र 

प्रिय आई शि.सा.न.वि.वि 

        आई तुला मी पहलेच पत्र लिहीत आहे. ह्या आधी कधी गरज पडली नव्हती आणि ह्या पूर्वी कधी प्रसंगही आलाच नव्हता. क्षणोक्षणी मला तुझी खूप आठवण येते. सकाळी उशिरा उठायची माझी सवय मोडली आता मी खूप लवकर उठतो. तसं बघायला गेलं तर तूच उठ्वतेस, तुझी हाक मला नेहमी जाग करते. अरे राज्या, उठ किती वेळ झोपून राहशील.कॉलेजला नाही जायचं आहे का तुला. कोणतेही काम कसे नीटनेटके करावे हे मी तुझ्याकडूनच शिकलो. धुतलेले कपडे कसे वाळत घालावे हे मी तुझ्याकडूनच शिकलो. खरेच आई तू खूप खूप छान संस्कार दिलेस मला, इकडे राहून मी सर्वांची मने जिकंली आहेत. तूच म्हणतेस ना, माणूस प्रिय नसतो, तर त्याचे काम त्याला प्रिय बनवते…!! ह्याचा प्रत्यय आज मला येतो.मला आठवते तेव्हा आपल्या गावात शाळाही नव्हती. तेव्हा सर्व लहान मुलांना आपल्या अंगणात बसवून, खाऊचे आमिष दाखवून तू त्यांना वाचनाची आणि अभ्यासाची आवड लावली. गावातल्या मुलांची नैसर्गिक क्षमता बघून तू त्यांना व्यायामाची आवडही तूच लावली. स्त्रियांनी खंबीरपणे आपल्या पायावर उभे राहायलाच हवे. केवळ चूल नि मुलं सांभाळण्यापेक्षा समाजात आदराने वावरायचे असेल, तर शिक्षण हे हवेच. एवढेच नव्हे तर इतरांबरोबर मिसळण्याची सुद्धा आवड हवी. आणि म्हणूच माझ्यासारख्या सर्वांची प्रगती झाली. आई तुझे झाड आणि वेलीवरती ही खूप प्रेम. गावातल्या लोकांनी लावलेले वृक्ष आजही तू जपते आहेस. एक सोपी युक्ती म्हणजे वाढदिवस असो किंवा एखादा छानसा प्रसंग तू नेहमी लोकांना एक झाड लावण्याची प्रेरणा देत होतीस. म्हणूच आज आपले गाव एवढे हिरवेगार आहे. आई तुझी खूप आठवण येते. 

आणखीन काय लिहू आता….. खूप खूप बोलायचे आणि लिहायचे आहे…. पण आता बस करतो. काळजी घे तुझी. 

जगी माउलीसारखे कोण आहे,

तिचे जन्मांतराचे ऋण आहे,

असे ऋण हे ज्यास व्याज नाही,

त्या ऋणाविना जीवनास साज नाही,

जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,

जिच्या यातनांना जगी तोड नाही,

तिचे नाव जगात आई,

आई एवढे कशालाच मोल नाही


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational