"आई कडून मिळालेले संस्कार"
"आई कडून मिळालेले संस्कार"
"आई कडून मिळालेले संस्कार"
माझी आई स्वयंपाक खूपच चविष्ट करायची. सर्वांना तिने केलेला कोणताही पदार्थ अवड़ायचा हो. मलापण स्वयंपाकाची अवड़ लहानपणा पासूनच होती. मी मोठी होते म्हणून आईला सर्व काम-करायला मदद करायचे. अभ्यासा-बरोबरच, पत्र-लिहावयाला शिकवण्यापासून इतर सर्व काम आणि संस्कार मला आई कडूनच मिळालेले आहे. त्याचात सर्वात महत्वाच! जीवनात नेहमी स्वाभिमानाने खरे मार्गावर चालायचे, घरात स्वच्छतेने काम करून वस्तु, कपड़े जागेवरच ठेवायचे, जशी वेळ येईल त्याप्रमाणे राहायचे.
माझे पोर उन्हाळ्याच्या सुट्टीत आई कड़ेच राहायचे आणि मस्तपैकी खायचे. आज मला सासरी सर्व-म्हणतात, आई सारखीच हसत राहते, त्याच बरोबर पुरण-पोळी अगदी चविष्ट आणि इतर स्वयंपाक खूपच छान करते. अन्नपूर्णा प्रसन्न आहे,हेच आईकडून मिळालेले संस्कारांना पोरांना शिकवत-आहे.