आई बाबा चे महत्व
आई बाबा चे महत्व


या जगात जेव्हा आपण या पृथ्वीतलावर जन्माला येतो ,तेव्हा आपल्या त्या आईला आपल्यालाजन्म देताना ज्या वेदना होत्या, त्या शब्दात सांगणे खूप खूप कठीण. तिने आपल्याला जन्माला घालत्यावेळेस तिचा विचार कधीही तिच्यामनात सुद्धा येत नाही. ती त्या वेळेस देवापाशी फक्त एकच प्रार्थना करते की माझं मूल सुखरूप ठेव आणि ते बाबा दवाखान्याचे बिल भरतांना त्यांच्या हालाखीच्या जीवनात आपल्या पोटाला चिमटा बसून पै पै जमा करतात. आणि ते देताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तो म्हणजे माझे बाळ सुखरूप आहे .
आम्ही आई बाबा झालो तेव्हा कळाले त्या वेदना ते दुःख त्या अडचणी आम्हाला मोठी मुलगी आहे. नंतर दुसऱ्या वेळेस मुलगा झाला आम्हाला सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. त्यात माझे सिजर झाले त्यावेळेस शरीराला खूप वेदना झाल्या पण त्या दुःखा पुढे सुख खूप खूप मोठे होते. कारण परिवार पूर्ण झाला होता. पण आमचा तो आनंद काही वेळेपुरता चेहऱ्यावर राहिला. अचानक बाळाची तब्येत खराब झाली बाळाला निमोनिया झाला बाळ आयसीयुमध्ये ठेवावे लागले.
डॉक्टरांनी सांगितले बाळ वाचणार नाही. मी वेगळ्या दवाखान्यात होते, त्यामुळे मला त्यातले काहीही माहीत नव्हते घरच्या कोणालाही विचारले तर ते म्हणायचे तुझे बाळ छान आहे. पण त्याच्या बाबांनी डॉक्टरांना सांगितले तुम्ही काहीही करा पण माझ्या बाळाला वाचवा हो, मी बाळंतपणासाठी माहेरी असल्यामुळे माझे आई वडील, माझे काका काकू, आणि माझे तिन्ही भाऊ सुद्धा खूप टेन्शनमध्ये असायचे. त्यांनी माझी पर्वा न करता रात रात आळीपाळीने त्या दवाखान्याच्या बाहेर एकेक वडापाव वर रात्र काढायची त्या बाळाला पंधरा दिवस दवाखान्यात ठेवले व डॉक्टरांच्या व नातेवाईकांच्या प्रयत्नाला यश आले व बाळ वाचले. त्या बाळाला घरी नेताना व नेल्यावर जी काळजी आम्ही घेतली, तेव्हा कळले की या जगात या दोन माणसांशिवाय आपले कोणी आहेस का, त्यांची ती मेहनत त्यांचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही.
त्या दिवसापासून ते कधी स्वतःसाठी जगत नाही. ते केवळ जगतात आपल्या मुलांसाठी. त्यांचे ते स्वप्न मुलांमध्ये पाहतात. खरंच आपण त्यांचे स्वप्न का पूर्ण करू शकत नाही का. त्यांच्या मनाविरुद्ध वागून त्यांची मान समाजात खाली घालतो. काय मागतात व देवापाशी हे देवा माझ्या मुलाला सुखी ठेव त्यांना दे त्याला त्यांना खूप मोठे होऊ दे. म्हणजे ते मागत त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी काही मागत नाही. आपण एखादा हट्ट केला की ते पूर्ण करण्यासाठी त्यांची हेटाकेटी चालू पण आपण मुले का समजुन घेऊ शकत नाही. का त्यांना थोडी खुशी देऊ शकत नाही. का त्यांना आपण वृद्धाश्रम दाखवतो विचार करा त्यांनी त्यावेळेस आपली ती जमापुंजी देऊन आपल्याला तो अनमोल जीव वाचवला नसता, तर खरंच खूप विचार करणारी गोष्ट आहे .म्हणून आई-वडिलांवर प्रेम करा त्यांच्या गरजा खूप कमी आहे. त्या हसतहसत पूर्ण करा आपण म्हणतो की स्वर्ग-नरक असतो कोणी पाहिला माहीत नाही पण आपण तो आपल्या घरात बोलू शकतो त्यासाठी आई-वडील आपल्या घरात आपल्या हृदयात असले पाहिजे. देव सुद्धा तुमचे दर्शन घेण्यास आतुर होईल व आपले घर सुद्धा स्वर्ग होईल मग आजपासून निश्चय करा व आई-वडिलांवर प्रेम करा.