जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन
आज मला माझ्या बारा वर्षाच्या मुलीने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि पटकन लक्षात आले खरंच मुली महिला यांना तिच्या मनासारखे आयुष्य जगता येते का? तर 70 टक्के उत्तर नाही या शब्दातील येईलआणि खरंच आहे .कारण ते माझ्यासोबत पण झाले मला कधीही माझ्या बालवयात माझ्या मनासारखे जगता आले नाही. कारण माझा जन्म एका खेड्यात झाला दोनशे-अडीचशे लोकवस्तीत असलेले जालना जिल्ह्यातले जामवाडी या गावात माझा जन्म झाला. घरातली मंडळी खुश होते कारण घरात मुलगी जन्माला आली माझे खेड्यातले बालपण तसेच चांगले. तसेच स्वप्नसुद्धा घट्ट मला मोठे होऊन शिक्षिका बनायचे होते. पण गावच्या लोकांचे ,घरातील लोकांची, विचार लहान तर स्वप्न मोठे कसे बघणार. वयाच्या 10 वर्षापर्यंत ठीक मुलगी जशी मोठी होती तसतसे घरात नवीन आणि कठोर नियम चालू होते. मुलींनी हे करू नये मुलींनी ते करू नये लहान वयातच घरातील कामे करायची स्वयंपाक शिकायचा. कारण खेड्यात नवीन एक प्रथा होती ती म्हणजे बालविवाह हे मलाही सोसावे लागले वयाच्या 15 व्या वर्षी माझे लग्न एका सामान्य घरात मोठ्या मुला सोबत झाले आणि घरातील मोठी सून पण खरंच हे योग्य होतं का? कारण मी माझ्या वयाने मनाने व शरीराने खूप लहान होते. त्यात मोठी सून ही पदवी तर मिळाली पन खरच ती टिकवणे तितकेच अवघड माझ्या सोबतीचे वय अंतर माझ्यापेक्ष
ा दहा वर्षांनी मोठे त्यामुळे त्यांच्यात हर एक गुण परफेक्ट होता. खूप वेळेस आमचे जमत हि नसे सुरुवातीचे दोन-तीन वर्ष खूप कठीण गेले असा प्रश्न मनात यायचा कि जगणे नको. पण आई-वडिलांनी ना व्यवस्थित शिक्षण दिले मनासारखे वागू दिले. पण त्यांनी एक जगण्याची कधी न डगमने ची शिकवण दिली होती. आणि मला ती आज कामी आली बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की खरंच हा संसार चालेल का ? पण म्हणतात ना चहा से राह मिलती है. करायची हिम्मत पाहिजे आणि तीच मी ठरवली आणि माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. मग कसे छान चालले आई, पत्नी ,सून याही नात्यात जिव्हाळा निर्माण झाला . जरी माझ्या सोबत तिचे वय अंतर सर्व काही वेगळे पण एक गोष्ट आमच्या त सारखीच ते म्हणजे प्रेम. खरं प्रेम या दोन अक्षरात खूप काही दडले आहे आणि या दोन अक्षराने आमच्या आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले, पण कधी विचार केला की प्रश्न पडतो ती खरंच माझे स्वप्न कुठे पण आता वेळ वय सर्व काही निघून गेले .त्यामुळे मी हे स्वप्न माझ्या मुलांमध्ये पाहिले आणि मी तेपूर्ण करणारच. असे ही मनाची निश्चेय केला. कारण त्यामध्ये मला माझ्या घरातील लोकांची, समाजाची साथ आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या पतीची हिम्मत माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे एक दिवस मला घरातूनच नाही तर पूर्ण जगातून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा येईल हे खरं.