Prathmesh Bansod

Others

5.0  

Prathmesh Bansod

Others

माझं पिल्लू

माझं पिल्लू

4 mins
850


एक आई आपल्या बाळाला जन्माला घालते, तिचा विचार कधीही तिच्या मनात येत सुद्धा नाही. ती त्यावेळेस देवापाशी फक्त एकच प्रार्थना करते की हे देवा माझं बाळ हे येणारा किंवा येणारी पिल्लू सुदृढ असू दे तशीच प्रार्थना मी केली व देवाने मला मुलाच्या रूपाने छान गोंडस पिल्लू दिले. त्यावेळेस मला खूप आनंद झाला कारण माझा परिवार पूर्ण झाला त्यावेळेस. शरीराला खूप खूप वेदना झाल्या पण त्या वेदना पुढे सुख खूप मोठं होतं गणपतीचे रूप तसे माझ्या पिलाचे रूप माझ्या गोड च राजाचे नाव गणपती चे दुसरे नाव म्हणजे प्रथमेश ठेवले.

माझ्या दादाचा जन्म 15/9/ 2009 मंगळवारी झाला. त्याला जन्म ताज 12दिवस आयसीयूमध्ये ठेवले. त्याला न्यूमोनिया झाला घरातले बाहेरचे लोक म्हणत होतात की हा मुलगा जन्मताच दुःख रीआहे . मोठेहोऊन सुद्धा असाच किडका राहील, त्यांच्या बोलण्याने माझे मन खूप दुखायचे, पण झाले असे की परत असे कोणतेही मोठे दुःख त्याच्या जवळ फिरकले सुद्धा नाही .त्या माझ्या दादाच्या चेहर्‍याकडे बघून मनातल्या मनात मी स्वप्न बघितले की तुझ्या चेहऱ्यावर स्माईल जी ही परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत सुदृढ रहा खुश राहा कधी कोणतेही दुःख आजार तुझ्या पहिले माझ्याजवळ आले पाहिजे .आम्हाला या दादाकडून इतके प्रेम मिळू दे की माझा दादा किती मोठा झाला तरी त्याचे त्याच्या आई-वडिलांचे प्रेम कधीही फुटू नये ,त्याला वकील बनण्याचे स्वप्न त्याच्या बाबाचे आहे व त्याचे ते स्वप्न पूर्ण करण्याची आवड बालवयापासूनच त्याच्यात आहे, सर्वांचा लाडका घरात खूप मस्ती करणारा त्याच्या बालवयापासून त्याच्यात खरे बोलण्याचा गुण आहे. तो खोटे नाही बोलत तो लहान असताना शाळेतील मोठ्या मुलांनी दुसऱ्या लहा न मुलाची पेन्सिल घेतली व माझ्या या पिलानेबघितली व त्याने टीचर्स ला सांगून त्याची पेन्सिल परत दिली. त्याचा हा बिनधास्त वागणूक खरे बोलण्याचा एक प्रखर पणाने मॅडमला खूपच भारावून टाकले व त्याचे खरे बोलण्याचा या गुणावर माझ्या पिलाला नवीन पेन्सिल बक्षीस म्हणून दिली, त्यापासून त्याचे अजून पक्के मत झाले व कधी ही खरे बोलायचे हा पक्का गुण त्याला लागला आहे. तो खूप मस्तीखोर तसाच खोडकर आहे त्याने तिच्या दीदी च्या बॅग मधून बुक काढून घेऊन त्यात पेपर टाकून दिले. त्या दिवशी मात्र तिला स्कूलमध्ये सर रागवले, व तीने घरी येऊन त्याला, चार वर्षाचा असताना त्यांनी नाकात शेंगदाणा टाकला पुन्हा आठ दिवसात डांबर गोळी चा तुकडा या दोन्ही वेळेस मात्र त्याने खूप घाबरून दिले .नटखट कृष्ण माझा त्याच्या छोट्या छोट्या खोड्या कायम चालू असतात माझ्या दादाला क्रिकेट खूप आवडते तोआता दहा वर्षाचा आहे दोन वर्षा अगोदर त्याला क्रिकेटचा क्लास लावून दिला त्याचा आवडता खेळाडू विराट कोहली आहे व त्या ला क्रिकेटर होण्याचे स्वप्न आहे. त्याच्या या मेहनतीला व क्रिकेट विषयी असलेले प्रेम या दोन्ही गुणांमुळे माझ्या पिलाचे स्वप्न पूर्ण हो तसेच एखादी वस्तू त्यांना पाहिजे असेल तर मंग माणसाची स्तुती करण्यात इतका मग्न करतो की आपल्याला कुठेतरी वाटते खरच आपल्याला ही वस्तूघेऊन द्यायला पाहिजे आपल्याला त्याच्याकडील त्याची गोष्ट समजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. माझ्या पिलाला सगळे मस्तीखोर गुण असले तरी तो स्कूलमध्ये त्याच्या क्लासमधे टॉप वरच आहे. तो कोणाशी बोलायचे झाले तर तो खूप नम्रपणाने बोलतो रोज सकाळी देवाचे दर्शन घेऊन मोठ्यांना नमस्कार करतो. शिक्षकांचे व्यवस्थित ऐकतो हा आज्ञाधारकगुण माझ्या खोडकर पिल्या मध्ये आहे माझ्या पिलांमध्ये स्वतःला एखादी वस्तू किंवा त्याचे म्हणणे पटवून देणे, प्रत्येकाला त्याच्या गोष्टीवर विचार करण्यास भाग पाडतो .तो दहा वर्षाचा असताना सुद्धा मोठ्या गोष्टी करतो तेवढी हुशारी बघून माझ्या दादा कोणतीही गोष्ट कोणत्या हीअभ्यास कोणतेही काम तो मन लावून करतो तो अभ्यासात खूप हुशार आहे त्याला नवीन शिकण्याचा व तो आत्मसात करण्याचा त्याचा अभ्यासू स्वभाव सगळ्यालाच मोहनी टाकतो तो खरे बोलणाऱ्या मुलांना आपले टिफिन सुद्धा खाऊ घालतो. त्यांनी एखाद्या खाण्याची नवीन पदार्थ केला तरी तो क्लासमध्ये वाटून खातो व घरी येऊन सांगतो आई मुलांना माझा खाऊ वाटून टाकला इतक्या आनंदी पणाने सांगतो की तो चक्क विसरुन जातो की आई मला रागवेल तू खात नाही व मुलांना देतो त्या गोष्टीवर थोडे हसू येते त्याचा हा देवान घेवान चा स्वभाव असल्यामुळे मी दे त्यावेळेसच जास्त पदार्थ देते व त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद कायम ठेवते कोणतीही गोष्ट तो इतरांसोबत मोठ्या आनंदाने करतो ते काम करताना त्याच्या इतका उत्साह निर्माण होतो की त्याच्याकडे एक टक लावून बघावे असे वाटते तो लहान आहे त्यामुळे त्याची नवीन नवीन शरारत मस्ती बघून व त्याच्या पुर्णपणे रमून जो आनंद मला मिळतो त्याचे शब्दात रूपांतर करणे खरोखरच अवघड. या माझ्या पिलाला त्याच्या या खोडकरपणाला व त्याच्यात असलेल्या गुणांना व त्याच्या हर खुशी ला देवाने इतके मोठे करावे की त्याला आभाळ छोटे पडेल. माझ्या पिल्लाला जगातील हर खुशी त्याला मिळो व तो घरातल्या सारखा समाजात देशात सगळ्यांचा लाडका होऊनच वागो.

सगळ्यांच्या मनावर प्रेम करणारा माझा राजा बेटा ,

सुखी ठेव देवा माझ्या या गोजिर्वण्या पिल्लाला ,

हसू दे खेळू दे पंख याला येउदे ,

उंच भरारी घेऊन स्वप्न या ला गाठू दे.


Rate this content
Log in