भाषा शिकणे
भाषा शिकणे


खेड्यात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना ---
तेथे मराठी भाषा छान शिकवतात, पण इंग्लिश भाषा ही पाचवी पर्यंत एबीसीडी टू झेड बाकी काही पाचवीच्या पुढे इंग्रजी काही मुलांना पालक घरी घेऊन शिकत होते. त्यामुळे त्यांना इंग्रजी हे अवघड वाटत नसेल. पण खरं सांगू मला इंग्रजी भाषा खूप शिकावे वाटत होते. पण मला घरी शिकवण्यासाठी कोणी शिक्षित नव्हते.
आई-वडील शेतात काम करणारे त्यांना माझ्याजवळ बसण्यात वेळ हि नव्हता.. तेव्हा कुठे ट्युशन क्लासेस नव्हते. जर असताही तर देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे दोन-तीन वर्ष समजण्यात गेले इंग्रजी वाचायचे कसे तिडके तिडके इंग्रजी येथेच तोपर्यंत दहावीच्या क्लासमध्ये गेले.
इंग्रजी सोडली तर बाकीच्या विषयात मी खूप हुशार होते. दहावीचे पेपर छान गेले इंग्रजी चा पेपर सोपा गेला.
इंग्रजी पेपर छान गेला म्हणजे आता मला भाषा थोडी येतेच. तोच माझे लग्न झाले संयुक्त परिवारात लग्न झाले.
मग काय इंग्रजी भाषा शिकण्याचे राहूनच गेले.. जून मध्ये दहावीचा निकाल लागला त्यावेळी 65 गुण मिळाले. मला इंग्रजीसुद्धा 51 मार्क मिळाले घरात खूप कडक वातावरण कोणी समजून घेतले नाही त्यावेळीही प्रथम महत्व हे घराला दिले संसार चालू झाला.
तेव्हा बाहेरच्या जगात इंग्रजी ही भाषा ऐकण्यास मिळत होती.
तेव्हा ती जखम पुन्हा ताजी व्हायची तेव्हाच ठरवले की मुलांना इंग्रजी मीडियम मध्ये टाकायचे .मी माझ्या दोन्ही मुलांना सीबीएससी स्कूल मध्ये टाकले मुलांना छान क्लासेस लावले .
माझे मुले आता छान इंग्रजीतून बोलतात आता मुले मोठी झाली घरांमध्ये वातावरण छान झाले .सर्व काही ठीक असताना आता मी इंग्रजी का नको शिकू त्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी मी इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न करते. मला मुलेसुद्धा शिकवण्यात मदत करतात माझ्या पतीने सुद्धा मला इंग्रजी चे काही पुस्तके आणून दिली .त्यामुळे अवघड अशी इंग्रजी भाषा थोडी का होत नाही मी तर शिकण्याचा प्रयत्न करणारच.