Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

4.9  

Prof. Dr.Sadhana Nikam

Inspirational

आधार

आधार

4 mins
11.7K


अमावस्येची रात्र होती. बाहेर वादळी पावसाने थैमान घातल होत. त्या काळ्या कुट्ट अंधारात कल्पिता निघाली होती. पायवाटेवरच्या कच्च्या रस्त्यावर दगडाला ठेचाळत तिची पावलं रक्त बंबाळ झाली होती. कशीबशी ती त्या डोंगराच्या कडेला येवून पोहोचली. खाली खोल दरी होती. तिने आकाशाकडे पाहिलं देवाला दोन्ही हात जोडले आणि ती उडी घेणार एवढ्यात तिला कोणीतरी मागे खेचले. एका दणकट हाताने तिला सावरले. नकळत ती त्याच्या बाहुपाशात विसावली. क्षणभरात तिने स्वतः ला त्याच्या मिठीतून सोडवल. तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघळणारे अश्रू अलगद टिपले.

डोंगरावरच्या एका दगडावर त्याने तिला बसवल. त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले “वेडी आहेस तू काय करायला निघाली होतीस”. तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. तो म्हणाला, “ फुटू दे बांध तुझ्या अश्रूंचा तरच तुझ्या दुःखाचा निचरा होईल”.त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला खरोखर हिने किती सोसलंय. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होता.

लहानपणापासून एकाच चाळीत राहणारा तिचा बालपणीचा मित्र विशाल. एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघ होते. तसे दोघही अभ्यासात हुशार. बी एस्सी पदवी पर्यंत दोघे बरोबर होते. तिला पुढे शिकण्याची इच्छा होती पण घरात वडीलधार्या मंडळीसमोर तीच काही चालल नाही. तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाच स्थळ तिच्यासाठी आणल आणि अधिक तपास न करता घाईघाईने तीच लग्न उरकण्यात आल. तिचा नवरा महेश तसा दिसायला चांगला होता. पण श्रीमंत बापाच लाडावलेला एकुलता एक मुलगा असल्याने घराबाहेरच तो जास्त रहात होता. रात्री तो पिऊन यायचा. तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझोड करायचा. तिच्या आईवडिलांची परिस्थीती जेमतेम होती. ती सर्व मुकाटपणाने सहन करत होती. तिला दोन लहान गोंडस अशी एक मुलगा आणि एक मुलगी होते. मुलगा श्रेयस आणि मुलगी स्नेहा तिचे जीव कि प्राण होते.घरात म्हातारे सासू सासरे माई व आबासाहेब, दोन दीर संजय व सुजय आणि एक नणंद आरती अस भरलेल संयुक्त कुटुंब तीच होत. घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. खानदानी श्रीमंती असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हत. माई व आबासाहेब एका खोलीत तर संजय आणि सुजय दिवसभर घरात टी व्ही आणि डी जे च्या तालावर नाचत राहायचे तर आरती वेडसर असल्याने दिवसभर भातुकलीचा खेळ खेळत पसारा करून ठेवायची.

कल्पिता सोशिक होती लाजरी बुजरी होती. लग्नाला जेमतेम दहा वर्ष झाली होती. पण परीस्थीतीने तिला प्रौढ बनवल होत. दिवसभर घरातल्या कामाचा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देवूनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे. महेश तर घरात नसायचा पण संजय,सुजय व आरती तिला वेड्यातच काढायचे. महेश रात्री पिऊन आला का त्याच्यासमोर तिच्या चुका काढायचे. माई आणि आबासाहेबांना तिचा कळवळा यायचा पण मुलांच्या विषारी नजरेसमोर ते दोघही थांबत नव्हते. दिवसामागून दिवस जात होते आता तरी सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील अस कल्पिताला वाटू लागल पण नियतीला ते मान्य नव्हत एक दिवस रात्री अचानक माईना हृदय विकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. महेशला आईविषयी जिव्हाळा होता. आई अचानक गेल्याने तो अधिकच दुखावला आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असा त्याचा गैरसमज झाला आणि तो कल्पितावर अधिकच राग काढू लागला. आईच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही तो अधिकच संशयाने तिच्या कडे पाहू लागला. घरात दररोज कोण येत, कोणते पदार्थ घरात शिजवले जातात. त्याच्या सततच्या पाळतीने कल्पिता वैतागली त्यात संजय आणि सुजयने व आरतीने अधिकच भर टाकली आता तिला घर तुरुंगासारखे वाटू लागले. माईच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनी डोळे मिटले. आता घरात वडिलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू लागले. एका कोपर्यात जावून ती रडायची आणि तिचे चिमुकले त्यांच्या इवल्याशा हातानी तिचे अश्रू पुसायचे .

तिच मन अनेकदा बंड करू लागल पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते.पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळच आखून ठेवलं होत. महेशच्या डोक्यात सैतानी कल्पना थैमान घालत होत्या. या घरात तुझी बायको देखील बरोबरीचा हिस्सा मागेल अशी एक शंका महेशच्या मनात उतरवण्याच काम महेश च्या भावांनी संजय व सुजय ने आणि आरतीने केले. एक दिवस असा उजाडला. कल्पिता सकाळी लवकर उठून बाकीच घरकाम आटोपून किचन मध्ये नाश्ता बनवत होती. तिची दोन्ही मुल अंगणात खेळत होती ती संधी महेशने साधली. महेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले तर एका दिराने अंगावर रॉकेल ओतले दुसरा काडी लावणार इतक्यात कल्पिता सावध झाली तिने महेशच्या हाताना जोरात झटका दिला घराच्या मागच्या दरवाजातून ती जोरात पळाली. पाठलाग होईल म्हणून घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला. जीव मुठीत धरून एका कोपर्यात ती लपली. अंगावरच्या एका साडीवर ती बाहेर पडली होती. घरी जाव तर तिची वाट पाहणाऱ्या तिच्या चिमुकल्यांशिवाय दुसर कोणी नव्हत. दिवस कसाबसा तिने घालवला सांजवेळी ती निघाली गावाबाहेरच्या खोल दरीकडे. तिने मनाशी निश्चय केलेला होता ती उडी घेणार तेव्हा मजबूत हातानी तिला मागे ओढलं आणि सावरल ते हात विशालचे होते. विशालने तिला समजावलं कि तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या मुलांसाठी. तो समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली. त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम. विशालच्या रुपात तिला मिळाला होता मैत्रीचा आधार. पदवी पर्यंत शिक्षण घेताना ते दोघ बर्याच वेळेला अभ्यासाच्या निम्मिताने एकत्र यायचे पण फक्त मैत्री एव्हढच दोघांच्याही मनात होत. अचानक कल्पिताच लग्न ठरल आणि झालही त्यावेळी मात्र विशालला हुरहूर वाटू लागली होती तो एकाकी पडला पण अनेक चांगले स्थळ येवून देखील त्याने लग्न केल नाही.

आज अचानक गावाबाहेरच्या डोंगराकडे फिरायला जात असताना त्याला कल्पिता भेटली भेदरलेल्या अवस्थेत. तिला वाचवता आल याच समाधान त्याच्या चेहर्यावर होत पण डोळ्यात मात्र निस्वार्थी भाव होता मैत्रीचा. त्याने तिचा हात धरला आणि ते दोघ निघाले एका वेगळ्या पाउल वाटेकडे जिथे थोड्या अंतरावरच श्रेयस आणि स्नेहा तिची वाट पहात होती. एका चौकोनी कुटुंबाला विशालचा आधार मिळाला होता.

प्रा. डॉ.साधना शामकांत निकम,शिंगटे नगर,चाळीसगाव,भ्रमणध्वनी ९४२२२२२११२


Rate this content
Log in